डाग..!!

Author: Share:

नीपने पेनाच्या, खूप गिरगटले… गोलगोल…

की सगळा गुंता दिसून येतो कागदावर..  शाईचे डागही..

उलट्या पेनाने गिरगटले..  तर मात्र

ना दिसत शाई, ना गोल गुंता….

तरीही, मन मात्र होत जातं,  हलकं.. हलकं,

जितकं जास्त गिरगटू,.. तितकं….!!

जगणेही जर.. असेच जमवले माणसाने,

आयुष्याचा पृष्ठभाग, न डागाळून घेता…

तर….!??

@मनीषा वायंगणकर,

ठाणे

Previous Article

अत्र्यांची खरीखुरी श्यामची आई : शिरीष पै

Next Article

निगलीजन्स!!

You may also like