उलटा चोर कोतवाल को दाटे

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


उलटा चोर कोतवाल को दाटे अशी समाजाची अवस्था झाली आहे. समाज जागविणा-या समाजसेवकाला अलिकडे विचार येतो आहे की समाजासाठी काहीच करु नये अशी येथील अवस्था. आज भर रस्त्यावर, घरादारात खुन होतात. कधी बलत्कार, तर कधी इतर गुन्हे घडतात.भर रस्त्यावर दलित विटंबनाही होते. चांभार, मांगानी शेतातुन जावु नये. पाणवठ्यावर पाणी भरु नये, मंदीरात नवरदेव बनल्यावर पुजा करण्यासाठी जावु नये. नव्हे तर आम्ही सांगितलेल्या कोणत्याही कामांना नकार देवु नये. एवढेच नाही तर दलितांनी घरे बांधु नये, नोकरी करु नये म्हणुन दलितांना त्रास देण्याचा अघोरी प्रकार आजही सर्रास सुरु आहेत. पोलिस प्रकरणाची शहानिशा करतात. ह्या सा-या घटना देशात सामान्य झाल्या.

अलिकडे तर लोकांची तहान एका गुन्ह्याने भागत नाही. त्यांना अजुन जास्त गुन्हे करावेसे वाटतात. त्यांचा स्वभावच तसा बनलेला असतो.खरं तर ते सायको स्वभावाचे असतात. आपल्यातच वावरतात. पण आपल्याला ते जाणवत नाहीत. अशांची तक्रार केली तरी ते पुराव्याअभावी अटकेतुन सुटतात. परत गुन्हे करण्यासाठी सिद्ध होतात.

नागपुर मध्ये आराधनानगरात अशीच एक घटना. क्रुरतेचा नुसता धिंगाणा. सायको किलर.. कोणाचा जीव घेईल सांगता येत नव्हते. एकाच कुटूंबातील पाच जीव मारल्याची घटना. खरं तर ह्या गृहस्थाने आपल्या पत्नीला संशयावरुन जाळुन ठार केलं. मात्र उच्च न्यायालयानं पुराव्याअभावी त्याला मोकळं केलं. पण या खटल्यात ज्याने वाचवले अर्थात सोडवुन आणले. त्यालाच या पत्नीला मारणा-या खुन्याने सोडले नाही.ठार केले. घटनेवरुन सहज लक्षात येते की आता रस्त्यावर, घरादारात कोणताही गुन्हा घडो अगर घडवो. मग तो नातेवाईक का असेना त्याला कोणीच सोडवू नये.वा ग्वाही देखील देवु नये.

नात्याला काळीमा फासणारा प्रकार. ज्या कमलाकरने आपल्या साळ्याला वाचवले तोच आज देवाघरी. पत्नी लेकरं आणि म्हाता-या आईसह….. काय गुन्हा होता त्यांचा. तरीही. अशी समाजाची अवस्था…. दुसरी एक घटना सांगतो. त्या घटनेत आरोपीला पुराव्याअभावी न्यायालयानं सोडलं. यात पुराव्याचा अभाव. आता पुरावे मिळत नसल्याने भरपुर खटले खारीज होतात. याचा अर्थ गुन्हा घडला नसेल असा होत नाही. पण न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर महाशयांनी सबब केस पीडीत व्यक्तीवर आक्षेप घेत न्यायालयात दायर केली. त्यात पक्षकारावर तर खटला दाखल केलाच केला. उलट साक्षीदार व गुन्ह्यांचा तपास करणा-या पोलिस अधिकारी वर्गावरही मुकदमा दाखल केला.

साक्षीदार तसेही मिळत नाहीत. कारण साक्षीदारांनाही भीती असते की मी जर साक्ष दिली तर माझाही हा खुनी जीव घेवुन टाकेल. तरीही काही साक्षीदार पीडीतांना न्याय मिळायला हवा म्हणुन साक्ष देतात. पण जर साक्ष सफल न झाल्यास त्याची साक्ष खोटी असेल असे म्हणता येत नाही. खटला दाखल करणा-या अधिका-यावरच जर ते खटले खोटे नोंद केले म्हणुन बदल्याच्या भावनेने अधिका-यावरच खटले दाखल केले गेले तर पुढे हे अधिकारी इतरांचे खटले दाखल करतील काय? अन् यामुळे सामान्यांना न्याय मिळेल काय?

मग तब्बल पाच खुन करणाराही आरोपी मोकाटच सुटेल. तसेच हे खटले जर न्यायालयातुन सिद्ध होत नसतील आणि आक्रामक मागील पीडीतां वर खटले टाकुन अजुन प्रताडीत करीत असतील तर पुढे पीडीतांना न्याय मागण्याचा अधिकार राहणार नाही. पीडीत निमुटपणे सगळा अन्याय सहन करेल. कोर्ट किंवा पोलिस स्टेशनच्या दिशेने कोणीही जाणार नाही. म्हणुन खटले दाखल करणा-या अधिका-यावर खटले दाखल होणे…. साक्षीदारावर खटले दाखल होणे ही बाब केवळ बदला काढणारी आहे.

सुडाच्या भावनेने पेटुन उठलेला समाज. प्रत्येकच वेळी खटले जिंकता येतील असे नाही. काही काही खटल्यात पुराव्याअभावी निकाल लागत नाही. पुरावा नसेल तर माणुस बा इज्जत बरी होतो. कारण साक्षीदार मिळत नाही. काही काही खटले हे न्यायालयापर्यंत जातच नाहीत. ते पोलिस स्टेशनमध्येच समाप्त होतात. कधी सामान्यांना न्याय मिळत नाही. कधी गुन्ह्याचा बरोबर तपास होत नाही म्हणुन पुरावे मिळत नाही. त्यातच पुराव्याअभावी खुनी सुटतात आणि पाच खुन करायला मोकळे होतात.

आज न्यायालयाने आपली भुमिका बदलली आहे. जहाल भुमिका न घेता मवाळ भुमिका घेवुन आरोपी आणि पक्षकार या दोघांचाही विचार करुन न्यायदान करण्याकडे न्यायालय तीक्ष्ण लक्ष देत आहे. कोणावरही अन्याय व्हायला नको म्हणुन सामंजस्याचा न्याय.

गुन्हेगार हा मुळात आईच्या गर्भातुन गुन्हा शिकुन येत नाही. तर येथील परिस्थीती त्याच्या हातुन गुन्हा घडवते. म्हणुन त्याला माफ केलं पाहिजे.ही रास्त भुमिका. पण आरोपी तो गुन्हा वारंवार करीत असेल तर त्याला काय समजावे? आज कमलाकरच्या घरी गुन्हा घडला. आपणही सुटणार नाही. नियती केव्हा डाव साधेल हे काही सांगता येत नाही. कारण नियतीसमोर सगळे समान असतात. खरं तर विवेकने आपल्या पत्नीला जीवंत जाळुन तिची हत्या केली होती. पण त्यातुन कमलाकरनेच त्याला बाहेर काढले होता. यात विवेकच्या पत्नीला न्याय मिळाला नाही. हे सर्व स्वार्थी माणसाचं कारस्थान. नियती या कमलाकरच्या पैशापुढे हारली.पण नियती ती. तिने अशी बाजू उलटवली की ज्या माणसाने नियतीला आव्हान केलं. त्या माणसाचाच नियतीने सफाया केला. यात स्वार्थपण हारलं आणि पुन्हा एकदा नियतीचा विजय झाला.

जीवन जगत असतांना माणसाने चांगले कर्म करावे. नियती तुमचे कर्म मोजत असते. तुमच्या ब-या वाईट कर्माचा हिशोब नियतीजवळ असतो. न्यायालयातुन आरोपी पुराव्याअभावी सुटतो. कारण हे माणसाचं बनवलेलं न्यायालय आहे.तिथे सारंच लपतं. पण नियतीपुढं काहीच लपत नाही. ती जेव्हा पलटी मारते. तेव्हा तुम्ही काय करत आहात हे तुम्हालाही माहीत नसतं. म्हणुन नियतीला लक्षात ठेवुन चांगले कर्म करा. यश तुमच्या पदरात नक्कीच पडेल. पण चांगले कर्म न केल्यास एक ना एक दिवस त्याचे वाईट फळ तुम्हाला चाखायलाच मिळेल. अपयशाचा मार्ग चोखंदळ होईल. ह्यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. महत्वाचं म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे अशी समाजाची अवस्था होऊ देऊ नका. सतर्क राहा. नियतीवर विश्वास ठेवा. आपोआप चांगल्याचं चांगलं फलीत व वाईटाचं वाईट फलीत दिसणारच आहे.

लेखक: अंकुश शिंगाडे
संपर्क: ९३७३३५९४५०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

‘बबन’ चं भाऊराव कऱ्हाडे यांस पत्र

Next Article

रश्मिन दिवाळी अंक २०१८ साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन

You may also like