Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

“हॉर्न नको” यासाठी आज विशेष क्रिकेट सामना

Author: Share:

ध्वनी प्रदूषण कमी व्हावं, यासाठी जनजागृती करण्यासाठी “हॉर्न वाजवू नका” हा संदेश पोहचवण्यासाठी आज , शनिवारी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा ट्वेंटी-ट्वेंटी सामना होणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरु होणार आहे. “नो हाँकिंग ११”  विरुद्ध  “रोड सेफ्टी ११” या संघात हा सामना होणार आहे.

परिवहन विभागातर्फे गेल्या काही महिन्यांपासून “हॉर्न नॉट ओके प्लीज” ही मोहीम राबवली जात आहे. यासोबतच रस्ते सुरक्षा मोहीम राबवली जात आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी या सामन्याच आयोजन केलं आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन व टाटा समूहाने सहकार्य केले आहे.

“नो हाँकिंग ११” या संघात के. एल. राहुल, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, युवराज सिंह, दिनेश कार्तिक, आर्यमन बिर्ला, कुणाल पंड्या, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, शिवम मावी, शार्दुल ठाकूर या खेळाडूंचा समावेश आहे. “रोड सेफ्टी ११” या संघात इशन किशन, शिखर धवन, सुरेश रैना, मनोज तिवारी, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, अभिषेक नायर, यजुवेंद्र चहल, कमलेश नागरकोटी, विनय कुमार व प्रवीण तांबे या खेळाडूंचा समावेश आहे.

या सामन्याचे उद्घाटन मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सामन्याला परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, परिवहन खात्याचे प्रधान सचिव मनोज सौनिक व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या विशेष सामन्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपला पांठीबा दर्शवला आहे. अनेकांनी ट्विटरवर व्हिडीयो शेयर करुन या सामन्याला पांठीबा दिला आहे.

Previous Article

एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोला प्राधान्य

Next Article

राज्यात ३ वर्षात ६ हजार चिमुरड्यांचा मृत्यू

You may also like