उघडा डोळे… बघा नीट…

Author: Share:

आक्षेप एक:-  होळी-धुळवड या सणांना पाणी खूप वाया जातं. पर्यावरणाची हानी होते.

                 ईदेला बळी दिलेल्या बकऱ्यांचे रक्त-मांस धुण्यासाठी किती पाणी लागते?-  असहिष्णू

आक्षेप दोन:-  गणेशोत्सव, गुढीपाडवा, नवरात्रोत्सव मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण- पर्यावरणाची हानी

                 मशिदींवरचे भोंगे वाजून त्रास होतो- असहिष्णू

  आक्षेप तीन:-  दसऱ्याला सोने लुटू नका- आपट्याची पाने तोडून पर्यावरणाचा –हा

                              ख्रिसमसला सुरुची झाडे तुटतात- असहिष्णू

 आक्षेप  चार :-  दिवाळीत फटके फुटतात-ध्वनी व वायुप्रदूषण

                      न्यू इयरला फटके फुटून प्रदूषण होत नाही का?  – असहिष्णू

                      शेकडो गाड्या, AC, कारखाने त्यातलं सांडपाणी यांनी प्रदूषण होत नाही का? – प्रगतीच्या आड

   आक्षेप ५ :-  दहीहंडी प्राणघातक- थर लावू नका-

                    मोहरम मधील जखमी- मृत्यूंच काय?- असहिष्णू

हिंदू संघटन व्हावे यासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक संघटना, धार्मिक पीठे, व्यक्ती यांवर कट्टरतेचे आणि अनक आरोप.

जोधा-अकबर,PK, बाजीराव मस्तानी, पद्मावती इ. सारख्या सिनेमाची वाढती संख्या.  वाढते ‘सेक्युलर’ साहित्य

याचवेळी जातीय आरक्षणे, मोर्चे, मंदिरप्रवेश इ. इ, गोष्टींवरून वाढते आणि धुमसते राजकारण आणि समाज.

लव्ह जिहाद आणि त्यावरून पेटते समाजमन.

या आणि असंख्य लहान-मोठ्या घटना,  ज्या वरवर पहाता फार सरळ आणि समाजसुधारक वाटतात. मात्र एखाद्या कोड्याच्या तुकड्याप्रमाणे ते एकमेकांशी जोडून पहिले, तर? भारतीय संस्कृतीचा पाया असणाऱ्या हिंदू परंपरांचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचे हे सगळे प्रयत्न आहेत हे लक्षात येतंय का?

 प्रदूषणाची समस्या ही काही एका  रात्रीत आणि केवळ याच सणांमुळे निर्माण झालेली नाही. असं असताना प्रदूषणाचा दोष फक्त हिंदू सणांवर लादण्यात काय उद्देश आहे? ज्या ज्या सणांवर पर्यावरण प्रदूषण इ. च्या नावाखाली आक्षेप घेतेले गेले आहेत, ते सगळे सण प्रामुख्याने समूहाने साजरे केले जाणारे आहेत. त्यानिमिताने मोठ्याप्रमाणावर हिंदू समाज एकत्र येत असतो. एका श्रद्धेने, एका उद्देशाने, एका ठिकाणी एकत्र येणाऱ्या समूहाची ताकद खूप मोठी असते. तिचे रुपांतर एका मोठ्या शक्तीमध्ये करणे अजिबातच अवघड नसते.  आणि म्हणूनच हिंदू धर्माच्या विरोधात काही करायचे असेल, तरी या शक्तीचे विघटन करून समाज खिळखिळा केला पाहिजे.

 त्याचवेळी हिंदू धर्मासाठी, त्यातील भेदभाव, जाती-पाती, अन्य समस्या नाहीशा होण्यासाठी ज्या संघटना, संस्था, व्यक्ती अखंड कार्यरत असतात, त्यांच्यावर सातत्याने कट्टरतेचे आणि असहिष्णुतेचे आरोप करून त्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन करायची जेणेकरून त्यांचा जनाधार व लोकाश्रय नष्ट होईल. आणि त्यंचे विधायक काम नष्ट होऊन हिंदूंची प्रगती खुंटेल. या संस्था धर्मांतरणातला सगळ्यात मोठा अडथळा आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे!

 भारतीय इतिहासाचा मानबिंदू असणारे बाजीराव, शिवाजीमहाराज, संभाजी महाराज  ज्यांच्या स्मरणमात्रेच प्रत्येकाला स्फूर्ती आणि लढाऊ वृत्तीची चेतना मिळते अशा सर्व ऐतिहासिक व्यक्तींचे विविध सिनेमे, नाटके, कादंबऱ्या यांद्वआरे विकृतीकरण करून जाणीवपूर्वक खोटा आणि चुकीचा इतिहास पसरवणे ज्यायोगे पुढील पिढ्यांना त्यांच्या मूळ इतिहासाचे आणि क्षात्रधर्माचे विस्मरण व्हावे.

आणि या सगळ्याबरोबरच, जातीय मोर्चे, आरक्षणे, स्त्रियांवरील अन्याय, या आणि अशा मुद्द्यांद्वारे विविध जातींना चिथावणी देऊन समाजात सतत असंतोष धुमसत राहील याची काळजी घेणे, जेणेकरून मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि धार्मिक अशा सर्वच बाबतीत हिंदू मन सदैव गोंधळलेले, भरकटलेले राहील. आणि मग अशा अस्थिर, अशांत, भरकटलेल्या, स्वताची कोणतीही अस्मिता किंवा परंपरा शिल्लक नसलेल्या समाजाचे धर्मानतरण घडवून आणून त्याला संपवण्यासाठी कितीसा वेळ लागणार आहे!! आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने जर हे घडून आलं, तर Subversion या युद्धप्रणालीचा हा सर्वित्तम अविष्कार मानावा लागेल!  आपल्या धर्मातल्या त्रुटी, अयोग्य प्रथा मोडून काढायच्या आहेतच, त्यात आजवर हिंदू समाज पुढाकार घेत आला आहे आणि यापुढेही घेऊ.. मात्र ते करत असताना कुणी आपल्या अस्तित्वालाच संपवायचा डाव रचत असेल तर.. त्यासाठी आपल्याला अतिशय सावध राहणं गरजेचं झालं आहे. आपलं अस्तित्व आणि स्वत्व टिकवूनच प्रगतीपथावर पुढे जायचं आहे. त्यासाठी संघर्ष अटळ आहे!

राजा! रात्र वैऱ्याची आहे! जागा आणि सावध राहा!!

लेखिका : मैत्रेयी जोशी

Previous Article

शारीरिक साईड इफेकट्स

Next Article

दिवेआगरच्या सुवर्णगणेश दरोडा प्रकरणी ५ गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप

You may also like