मला दोन कुटुंब आहेत; एक म्हणजे माझी मातृभूमी आणि माझं स्वत:चं कुटुंब- ले. कर्नल पुरोहित

Author: Share:

मुंबई: कर्नल पुरोहित यांना कालच सुप्रीम कोर्टाने ९ वर्षांनी जामीन मंजूर केला गेला आहे. त्यामुळे इतकी वर्षे जामीन का मंजूर झाला नाही यावरुन सर्वत्र प्रतिक्रीया होत आहे.

कर्नल पुरोहित आपली देसभक्ती प्रकट करत म्हणाले की मला दोन कुटुंब आहेत. एक म्हणजे माझी मातृभूमी, माझी लष्करी सेवा. कर्नल पुरोहित पुन्हा आर्मीमध्ये रुजु होणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना कोर्टाच्या आदेशाची पत्र लष्कराला पुरवावी लागणार आहे. सप्टेंबर २००८ मधील मालेगाव स्फोटानंतर कर्नल पुरोहित यांना लष्करी सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा गुन्हा सिद्ध झाला नव्हता, म्हणून त्यांना आजही ७५ टक्के पगार आणि भत्ते मिळत आहेत.

आता लवकरच ते नोकरीत रुजू होतील. पुरोहित हे १९९४ साली सैन्यामध्ये रुजू झाले. मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांनी आपली कामगिरी बजावली. देशभक्ती ही त्यांच्या नसानसात भिनली असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरुन वाटते.

Previous Article

तलाक़

Next Article

तीन तलाकवर काय म्हणाले ओवेसी? वाचा…

You may also like