Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

चिं.वि. जोशी

Author: Share:

जन्म १९ जानेवारी १८९२

मृत्यू २१ नोव्हेंबर १९६३

चिंतामण विनायक जोशी हे विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते. पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता. शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले.

त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते. त्यांनी आगरकर यांच्या ‘सुधारक’ या वृत्तपत्राचे काही काळ संपादनही केले होते.

एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. चिं.वि. जोशी यांच्या कथेवर सन १९४२ मध्ये ‘सरकारी पाहुणे’ नावाचा चित्रपट निघाला होता. त्याचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले होते. चिमणरावांची भूमिका दामुअण्णा मालवणकर यांनी केली होती. चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्रच असे मानले जात असे.

चिं.वि.जोशींच्या संध्या बोडस-काणे व अलका जोशी-मांडके या नातींनी संकलित केलेले ’चि.वि. जोशी – साहित्यातले आणि आठवणीतले हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. अक्षरधारा प्रकाशनाने ‘विनोदाचे बादशहा चिं. वि जोशींचे निवडक विनोद’ नावाचे एक अतिशय छोटे पुस्तक प्रकाशित केले आहे.

चिं.वि. जोशी यांचे प्रकाशित साहित्य

आणखी चिमणराव

आमचा पण गांव

आरसा

एरंडाचे गुऱ्हाळ

ओसाडवाडीचे देव

घरबसे पळपुटे

चार दिवस सुनेचे

चिमणचारा

चिमणरावांचे चऱ्हाट

चौथे चिमणराव

जातकातील निवडक गोष्टी, बौद्धकथा

तिसऱ्यांदा चिमणराव

थोडे कडू थोडे गोड

ना मारो पिचकारी

निवडक गुंड्याभाऊ

पाल्हाळ

बोरी बाभळी

बुद्ध संप्रदाय आणि शिकवण

मेषपात्रे

मोरू आणि मैना

रहाटगाडगं

राईस प्लेट

लंकावैभव

वायफळाचा मळा

विनोद चिंतामणी

संचार

संशयाचे जाळे

सोळा आणे

स्टेशनमास्तर

हापूस पायरी

हास्य-चिंतामणी

Previous Article

बाळासाहेब ठाकरे

Next Article

१९ जानेवारी 

You may also like