चीन नावाचा ससा आणि जग नावाचं कासव.

Author: Share:

चीनचा महत्वाकांक्षी असा, प्रामुख्याने व्यापाराद्वारे जगातील नैसर्गिक संसाधनांवर, भूभागावर मालकी हक्क मिळवण्यासाठी सुरु केलेला OBOR- One Road One Belt हा प्रकल्प आपल्या सर्वाना माहीतच आहे. काही महिन्यांपूर्वी यावर लिहिणार होते. पण अनेकांनी यावर बरच लिखाण केलं. म्हणून मग मी ते केवळ share केलं. पण आता या प्रकल्पाचा पुढचा चरण येऊ घातला आहे. आणि तो अधिक interesting आहे. त्याचा अभ्यास करताना केलेला चिंतन इथे मांडत आहे.

वसाहतवादाचच हे थोडंसं वेगळं रूप आहे. एकंदरीत ३ ट्रिलियन डॉलर्स, ६० विविध देशांमध्ये पायाभूत सुविधांसाठी म्हणून गुंतवून, भले मोठे व्याजदर लावून उत्तम परत फेड मिळवायची किंवा कर्जाचा परतावा करू शकत नसल्यास त्या त्या देशामधल्या तेल विहिरी, विविध खनिजांच्या खाणी इत्यादी मालमत्तेवर स्वामित्व मिळवायचे, असा हा चिनी धंदा आता त्यांच्याच अंगाशी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. Belt Road Initiative( BRI ) या नावाऐवजी Debt Chain Initiative ( DCI ) हे नावच या Mammoth कार्यक्रमासाठी योग्य आहे अशी टीकाही गेली काही वर्षे जगभरातुन केली जात आहे.

साधारण २००० सालच्या सुरुवातीपासूनच चिनी सरकारने आपल्या देशातील गुंतवणूकदारांना परदेशी गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. परदेशात गुंतवणूक केल्याने जागतिक स्पर्धेत चीन पुढे राहील, देशांतर्गत रोजगारावरचा ताण कमी होईल; असा दुहेरी हेतू या प्रोत्साहनामागे होता. तसच गुंतवणूक केलेल्या देशांमध्ये आपण आपला तयार माल विकू शकू; असा अजून एक फायदा चिनी कंपन्या आणि बँकांना दिसत होता. त्यामुळे चिनी कंपन्यांना चिनी बँकांकडून अगदी स्वस्तात आणि सहज भरपूर कर्जांची उपलब्धता झाली. पण यामुळे अनेकांनी धोकादायक(परताव्याची खात्री नाही) अश्या प्रकल्पांत मोठ्या रकमा गुंतवल्या. साहजिकच या गुंतवणुका चुकीच्या सिद्ध होऊ लागल्या. आणि याचा मोठा परिणाम आता चीनी अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे.

डेव्हिड श्वार्ट्सचं एक बेस्टसेलर (पुस्तक) आहे. मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. क्सि जिनपिंग यांनी या पुस्तकातील थिंक बिग, गो फर्स्ट क्लास, युअर attitudes युअर allies, सेट युअर गोलस इत्यादी धडे आपल्या ‘OBOR या प्रकल्पात’ किंवा ‘गो आऊट’ या धोरणात चांगल्या प्रकारे प्रत्यक्षात आणलेले दिसतात. पण ‘थिंक right towards people’ हे प्रकरण त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमात नजरेआड केलेलं लक्षात येतं. कारण चीनने ना त्या कर्जदार देशांचा विचार केला, नाही त्या चिनी सामान्य जनतेचा.! ज्यांच्या छोट्या छोट्या गुंवणूका, त्यांनी दिलेले कर, इ. यासाठी वापरले गेले!. .

आणि त्यामुळेच इतकी मोठमोठी कर्जे वाटूनही आज जगभरात त्यांची विश्वासार्हता जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. इंग्रजांनी जगावर राज्य केलं, तेही व्यापारी म्हणूनच आले, पण त्यांचा हा विजय दीर्घकाळ टिकू शकला नाही. आज इंग्लंडची जगावर किती पकड आहे? त्यांच्या पावलावर पाऊल जिनपिंग यांनी टाकले असे काही वेळा वाटते. इंग्रजानी आपला पसारा आवरता घेताना निदान आपल्या मुख्य देशाला काही क्षती पोचणार नाही याची तरी दक्षता घेतली होती. चीनच्या बाबत मात्र ती गोष्टही आता दुरापास्त वाटू लागली आहे.

घेरून आलेली आर्थिक मंदी आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेशी घडू पाहत असलेले व्यापारी, आर्थिक युद्ध चीनला परत रसातळाला तर नेवून ठेवणार नाही ना!? अशी शंका चिनी अर्थशास्त्रींना भेडसावू लागली आहे. कोणत्याही व्यवसायात नुकसान सोसायची तयारी किंवा ताकद (deep पॉकेट्स) हा त्या व्यावसायिकाचा महत्वाचा आधार किंवा plus point असतो. अव्वाच्या सव्वा असला तरी चिनी पैशालाही मर्यादा आहेत.

कोणतीही संस्था चालवताना काही विशिष्ट टक्के liquidity सांभाळावी लागते,मोठ्या गुंतवणूका करताना याबाबतचे चिनी तज्ज्ञांचे अंदाज चुकले असावेत. चीनकडे असणारा अतिप्रचंड पैसा चीनने लिमिटेड किंवा मर्यादित प्रकल्पांमध्ये वापरून तिथला किल्ला मजबूत केला कि नवा देश, नवा प्रकल्प हाती घ्यायचा अशी policy वापरली असती तर आता उभे ठाकलेले हे आर्थिक संकट आले नसते.
परंतु एखाद्या क्षेत्रात प्रथम काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला जे लाभ मिळतात ते लाभ जास्तीत जास्त ठिकाणी मिळवण्याच्या लोभापायी जिनपिंग यांनी मोठमोठ्या गुंतवणुका अनेक देशांत, अनेक प्रकल्पात केल्या.

तसेच यात विविध प्रकारे गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे प्रमाणही खूप आहे, होते. त्यामुळे एकतर ज्या इंटेग्रिटीने हे प्रकल्प चालवले जायला हवे होते त्या सचोटीने ते चालू शकले नाहीत. तसंच चीनचा या गुंतवणूक कारण्यामागच्या वर सांगितलेल्या उद्देशाला ठिकठिकाणी स्थानिक जनता सतत आव्हान देत राहिली आहे.

काँगो या आफ्रिकन देशाशी सिकोमाईन्स या नावाने चीनने केलेला करार पुढच्या भागात केस स्टडी म्हणून पाहू.

@अमिता आपटे



असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline



Previous Article

पहिली आणीबाणी आठवावी !

Next Article

पीएचडी – अजून खूप काही भाग १

You may also like