‘चला, वाचू या’च्या ३१ व्या पुष्पामध्ये अश्विनी मुकादम व ‘अथांग आवली’

Author: Share:

मुंबई – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हिजन संचालित‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे ३१ वे पुष्प रविवार १५ जुलै रोजी सायं. ५ वाजता साजरे होत असून यामध्ये प्रसिध्द अभिनेत्री अश्विनी मुकादम अतिथी अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे या पुष्पामध्ये दीपक मंडळ, नाशिक यांचा सुरेश गायधनी दिग्दर्शित ‘अथांग आवली’ या कार्यक्रमाचेही अभिवाचन होणार आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.

     दीपक मंडळ, नाशिक निर्मित ‘अथांग आवली’ या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश गायधनी यांचे असून कैवल्य जोशी, केतकी कुलकर्णी व गिरीष जुन्नरे अभिवाचक कलावंत आहेत. संहितालेखन गिरीष जुन्नरे यांचेच आहे.  तुकारामाच्या आवलीचे एक वेगळेच रुप या लेखनातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

     जून २०१५ पासून सुरु झालेला ‘चला, वाचू या’ हा अभिवाचन उपक्रम दर महिन्यात सातत्याने होत असलेला मुंबईतील पहिला उपक्रम असून त्याला साहित्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, संगीतकार सलील कुलकर्णी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, अविनाश नारकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, प्रतीक्षा लोणकर, राजन ताम्हाणे, अनंत भावे आदींसह अनेक नामवंत व अनेक नवोदित कलावंतही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

Previous Article

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक गावाची निवड

Next Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ३

You may also like