Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रमाचा तिसरा वर्धापनदिन १७ जूनला !

Author: Share:

सलील कुलकर्णी आणि प्रतीक्षा लोणकर यांचा सहभाग

मुंबई – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हिजन संचालित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने रविवार १७ जून रोजी होणारे उपक्रमाचे ३० वे पुष्प प्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी आणि प्रसिध्द अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर गुंफणार आहेत. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये संध्याकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

जून २०१५ मध्ये हा उपक्रम सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला साहित्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला अभिवाचनाचा अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिलाच उपक्रम आहे. आणि विशेष म्हणजे या उपक्रमासाठी येणारी सर्व अभिवाचक मंडळीदेखील आपले विनामूल्य सहकार्य संस्थेला देतात. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, अविनाश नारकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, राजन ताम्हाणे, संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष, शर्वाणी पिल्ले, शुभांगी लाटकर, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक अनंत भावे, राज्याच्या तत्कालीन भाषा संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी, प्रसिध्द कवी डॉ. महेश केळुसकर, पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक दत्ता टोळ आदींसह अनेक नामवंत आजवर या उपक्रमात अभिवाचक म्हणून सहभागी झाले आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने पु. शि. रेगेंच्या साहित्यावरील‘सृजनरंग’ हा कार्यक्रमही नुकताच या उपक्रमाअंतर्गत साजरा झाला.

साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

Previous Article

स्वगत

Next Article

शिवसेना-भाजप युती झाली नाही तर…

You may also like