केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार: काही जुने काही नवे

Author: Share:

केंद्राच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर जाहला. नऊ नवीन मंत्र्यांचे आगमन झाले असून, ४ मंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली आहे. सहा मंत्र्यांनी ‘स्वेच्छेने’ मंत्रिपद सोडले आणि अनिल दवे यांचे निधन, व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड  आणि मनोहर पर्रीकर गोव्यात गेल्याने रिक्त अशा तीन मंत्रिपदाच्या जागा रिक्त, या पार्शवभूमीवर नऊ नवीन मंत्री आज मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत.

राजनाथ सिंग यांच्याकडे गृहमंत्रीपद राहिले असून, निर्मला सीतारमन भारताच्या नवीन केंद्रीय संरक्षण मंत्री असतील.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रिपद भूषविणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला ठरणार आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या गोवागमनाने हे पद फार दिवस रिक्त होते, ज्यासाठी शासनावर टीकेची झोड उठत होती. सीतारमन यांच्याकडे आधी वाणिज्य मंत्रालय होते.

 रेल्वे अपघातांमुळे राजीनाम्याची मागणी झालेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग खाते दिले गेले असून, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद दिले गेले आहे. याआधी पियुष गोयल यांच्याकडे ऊर्जा व कोळसा मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार होता. त्यांच्या कामावर पंतप्रधान मोदी समाधानी होते.

‘कैफियत एक्स्प्रेस’ आणि ‘उत्कल एक्प्रेस’ या दोन अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच सोपवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांना “थोडे थांबा” सांगितले होते आणि राजीनामा स्वीकारला नव्हता.

२००४ साली भारताला ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे नेमबाज रायवर्धन राठोड यांना क्रीडा मंत्रीपद (राज्यमंत्री-स्वतंत्र कार्यभार) देण्यात आले आहे. क्रीडा खात्याचा पदभार सांभाळणारे राज्यवर्धन राठोड हे पहिलेच ‘खेळाडू’ ठरले आहेत.

नवीन राज्यमंत्रिपदामध्ये शिवप्रताप शुक्ला, अश्विनीकुमार चौबे,गजेंद्रसिंह शेखावत, डॉ. वीरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे यांना स्थान मिळाले आहे.

याशिवाय राजकुमार सिंह (माजी सनदी अधिकारी. माजी गृहसचिव आणि आता बिहारचे आमदार), हरदीपसिंग पुरी (१९७४च्या बॅचचे माजी आयएफएस, सुरक्षा व परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक) आणि  (खासदार – राजस्थान) डॉ. सत्यपाल सिंह (मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि खासदार उत्तरप्रदेश) आणि अल्फन्स कनाथमन (१९७९च्या बॅचचे माजी आयपीएस अधिकारी) या चार सनदी अधिकाऱ्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला.

बाहेर पडणाऱ्या सहा मंत्र्यांमध्ये कविराज मिश्रा, राजीव प्रताप रुडी, बंडारू दत्तात्रेय, महेंद्र नाथ पांडे, संजीव बाळ्या आणि फग्ग्न सिंग कुलसते यांचा समावेश आहे.

नवीन कॅबिनेट खालीलप्रमाणे:

नरेंद्र मोदी: पंतप्रधान, मनुष्यबळ, पब्लिक ग्रीव्हन्सेस आणि पेन्शन, एटोमिक एनर्जी, स्पेस, महत्वाचे पॉलिसी इश्यू आणि इतर मंत्र्यांना न दिलेले विषय

राजनाथ सिंग : गृहमंत्री

निर्मला सिथारमन: संरक्षण

सुषमा स्वराज : परराष्ट्र खाते

अरुण जेटली: वित्त आणि कंपनी मंत्रालय

पियुष गोयल: रेल्वे आणि कोळसा

नितीन गडकरी:रोड वाहतूक आणि हायवे, शिपिंग, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा सुधार

सुरेश प्रभू: वाणिज्य आणि उद्योग

डीव्ही सदानंद गौडा: सांख्यिकी आणि प्रोग्रॅम

उमाभारती: पेयजल आणि सांडपाणी व्यवस्थापन

रामविलास पासवान: ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण

मनेका संजय गांधी: महिला आणि बाल

अनंतकुमार: संसदीय कामकाज आणि केमिकल व फर्टिलायझर्स

रवी शंकर प्रसाद: कायदा, इलेक्ट्रॅनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

जगत्प्रसाद नायडू: आरोग्य, कुटुंबकल्याण

अशोक गजपती राजू पुस्पती: नागरी उड्डयन

अनंत गीते : अवजड उद्योग आणि सार्वजनिक आस्थापने

हरसिमरत कौर बादल: अन्नप्रक्रिया

नरेंद्र सिंग तोमर: ग्रामीण विकास, पंचायत राज आणि खाणी

चौधरी बिजेंदर: स्टील

जुयल ओरम: ट्रायबल अफेअर्स

राधा मोहन सिंग: शेती आणि शेतकरी कल्याण

थावर चांद गेहलोत: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

स्मृती इराणी: टेक्सटाईल आणि माहिती प्रसारण

हर्षवर्धन: विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल

प्रकाश जावडेकर: मनुष्यबळ

धर्मेंद्र प्रधान: पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस

मुख्तार अब्बास नक्वी: अल्पसंख्यांक मंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र)

Rao Inderjit Singh

Ministry of Planning; and Minister of State in the Ministry of Chemicals and Fertilizers

Santosh Kumar Gangwar

Ministry of Labour and Employment

Shripad Yesso Naik

Ministry of Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy (AYUSH)

Jitendra Singh

Development of North Eastern Region; Minister of State in the Prime Minister’s Office; Minister of State in the Ministry of Personnel, Public Grievances and Pensions; Minister of State in the Department of Atomic Energy; and Minister of State in the Department of Space

Mahesh Sharma

Ministry of Culture; and Minister of State in the Ministry of Environment, Forest and Climate Change

Giriraj Singh

Ministry of Micro, Small and Medium Enterprises

Manoj Sinha

Ministry of Communications; and Minister of State in the Ministry of Railways

Rajyavardhan Singh Rathore Minister of State (Independent Charge) of the Ministry of Youth Affairs and Sports; and Minister of State in the Ministry of Information and Broadcasting

Raj Kumar Singh

Ministry of Power; and Minister of State (Independent Charge) of the Ministry of New and Renewable Energy, Hardeep Singh Puri Minister of State (Independent Charge) of the Ministry of Housing and Urban Affairs

Alphons Kannanthanam

Ministry of Tourism; and Minister of State in the Ministry of Electronics and Information Technology

राज्यमंत्री

Shri Vijay Goel

Ministry of Parliamentary Affairs; and Minister of State in the Ministry of Statistics and Programme Implementation.

Shri Radhakrishnan P.

Ministry of Finance; and Minister of State in the Ministry of Shipping.

Shri S.S. Ahluwalia

Ministry of Drinking Water and Sanitation.

Shri Ramesh Chandappa Jigajinagi

Minister of State in the Ministry of Drinking Water and Sanitation.

Shri Ramdas Athawale

Ministry of Social Justice and Empowerment.

Shri Vishnu Deo Sai

Ministry of Steel.

Shri Ram Kripal Yadav

Ministry of Rural Development.

Shri Hansraj Gangaram Ahir

Ministry of Home Affairs.

Shri Haribhai Parthibhai Chaudhary

Ministry of Mines; and Minister of State in the Ministry of Coal.

Shri Rajen Gohain

Ministry of Railways.

General (Retd.) V. K. Singh

Ministry of External Affairs.

Shri Parshottam Rupala

Ministry of Agriculture and Farmers Welfare; and Minister of State in the Ministry of Panchayati Raj.

Shri Krishan Pal

Ministry of Social Justice and Empowerment.

Shri Jaswantsinh Sumanbhai Bhabhor

Ministry of Tribal Affairs.

Shri Shiv Pratap Shukla

Minister of State in the Ministry of Finance.

Shri Ashwini Kumar Choubey

Ministry of Health and Family Welfare.

Shri Sudarshan Bhagat

Ministry of Tribal Affairs.

Shri Upendra Kushwaha

Ministry of Human Resource Development.

Shri Kiren Rijiju

Ministry of Home Affairs.

Dr. Virendra Kumar

Ministry of Women and Child Development; and Minister of State in the Ministry of Minority Affairs.

Shri Anantkumar Hegde

Ministry of Skill Development and Entrepreneurship.

Shri M. J. Akbar

Ministry of External Affairs.

Sadhvi Niranjan Jyoti

Ministry of Food Processing Industries.

Shri Y. S. Chowdary

Ministry of Science and Technology; and Minister of State in the Ministry of Earth Sciences.

Shri Jayant Sinha

Ministry of Civil Aviation.

Shri Babul Supriyo

Ministry of Heavy Industries and Public Enterprises.

Shri Vijay Sampla

Ministry of Social Justice and Empowerment.

Shri Arjun Ram Meghwal

Ministry of Parliamentary Affairs; and Minister of State in the Ministry of Water Resources,

River Development and Ganga Rejuvenation.

Shri Ajay Tamta

Ministry of Textiles.

Smt. Krishna Raj

Ministry of Agriculture and Farmers Welfare.

Shri Mansukh L. Mandaviya

Ministry of Road Transport and Highways; Minister of State in the Ministry of Shipping; and

Minister of State in the Ministry of Chemicals and Fertilizers.

Smt. Anupriya Patel

Ministry of Health and Family Welfare.

Shri C.R. Chaudhary

Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution; and Minister of State in the Ministry of Commerce and Industry.

Shri P.P. Chaudhary

Minister of State in the Ministry of Law and Justice; and Minister of State in the Ministry of Corporate Affairs.

Dr. Subhash Ramrao Bhamre

Ministry of Defence.

Shri Gajendra Singh Shekhawat

Ministry of Agriculture and Farmers Welfare.

Dr. Satya Pal Singh

Ministry of Human Resource Development; and Minister of State in the Ministry of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation.

Previous Article

दादाभाई नौरोजी

Next Article

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे

You may also like