Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव-मुळडोंगरी येथे मुलांनी रोखून धरली बस

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव – मुळडोंगरी येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी नेहमी उशिरा येणारी बस रोखून धरली. शाळेला जायला नेहमीच उशीर होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करत नांदगाव बस डेपो ची बस रोखून धरली व जोपर्यंत बस दररोज  नियमित वेळात येण्याचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बस जाऊ देणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.

बस उशिरा आल्याने शाळेतील विधर्थ्यांचा वेळ वाया जाऊन मोठे नुकसान होत आहे साकोरा. नांदगाव येथिल विद्यार्थ्यांना बससाठी नेहमीच ताटकळत बसावे लागते मूळडोंगरी हा अतिशय ग्रामीण भाग असल्याने खाजगी वाहनांचीही संख्या कमी असल्याने ग्रामस्थांना काही महत्वाचे काम असल्यास वाहनांची वाट बघत बसावी लागते रोज बस वेळेवर येत नसल्याने साकोरा नांदगावला रोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तास बुडतो. तर कधी बस येतच नाही अशा सर्व ञासाला कंटाळून विद्यार्थी व नागरिकांनी आज बस रोखुन धरली. पासधारक विद्यार्थ्यांना नियमित पास काढूनही वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने एस टी महामंडळावर नाराजी व्यक्त केली आहे.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

रिझर्व्ह बँकेचा अहवाल: ९९% जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

Next Article

२९ ऑगस्ट: आसनगाव ‘दुरांतो’ अपघात: डॉ विनय देवलाळकरांच्या अनुभवातून

You may also like