ओझं

Author: Share:

दोन भाऊ होते. दोघेही वयाने तसे लहान. मोठा १३ वर्षांचा तर लहान भाऊ ७ वर्षांचा. वडील वारले, त्यामुळे गरीबी आली होती. आई घरकाम करायची. मोठ्या भावाचे लहान भावावर पुष्कळ प्रेम. अगदी जीवापेक्षाही जास्त. दिवस गरीबीत जात होते.

तरीही मुलांनी कधी आईजवळ हट्ट केला नाही. गरीबी असली तरी ते सुखी होते. एके दिवशी त्यांच्या मामाचं म्हणजेच आईच्या भावाचं लग्न ठरलं. प्रवास लांबचा होता. आई जाऊ शकत नव्हती. मुलांनी हट्ट धरला.

आई म्हणाली की आपल्याकडे एवढे पैसे नाही. त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. या गावातून मामाच्या गावी जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे टेकडी चढून जाणे. आईचे गुडघे दुखत, म्हणून आईला टेकडी चढून जाऊ शकत नव्हती. मुलांनी आईकडे हट्ट धरला की आम्ही टेकडी चढून जातो. आईने आधी नाहीच म्हटचे. काळजाच्या तुकड्यांना असं एकटं पाठवणं अशक्यच होतं तिच्यासाठी. पण मुलांच्या लाडीक हट्टापायी आईला नमावे लागले. मुलं टेकडी चढू लागली.

लहान भावाचे पाय दुखले की मोठा बहऊ त्याला खांद्यावर उचलून घेत. शेवटी ते मामाच्या गावी पोहोचले. लग्न उरकले व काही दिवसांनी पुन्हा परतण्यासाठी टेकडी चढू लागले. लहान भाऊ चालून चालून थकला. मोठ्या भावाने त्याला खांद्यावर उचलून घेतले. समोरुन एक बाई येत होती. त्या बाईला मुलाची दया आली.

तिनं विचारलं, “अरे बाळा तू थकशील, त्रास होईल तुला.. एवढं ओझं उचलून टेकडी चढू नकोस” मुलगा थांबला व बाईला म्हणाला “काकू हे ओझं नाही, माझा भाऊ आहे” आणि पुन्हा टेकडी चढू लागला…

तात्पर्य : कोणत्याही कामाला ओझं समजून करु नका. कामावर प्रेम करा. काम सोपं होतं.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

दर्जेदार शिक्षण असे देता येईल.

Next Article

पंडिता रमाबाई सरस्वती

You may also like