ब्राह्मण लक्षण

Author: Share:

विचारी व विवेकी माणस हि मागचा पुढचा विचार करतात. पटकन असहिष्णु होत नाहीत. मागचापुढचा सारासार विचार करुन पावले उचलण , आपल्या आयुष्याच्या नफ्यातोट्याचा ताळेबंद मांडुन कोणत्या प्रसंगाला किती महत्व द्यायच, विचाराला प्राधान्य द्याव का विकाराला हे तो ठरवत असतो.

सर्वसाधारण ब्राह्मण माणूस हा विचारी असतो, विचारीपणा व विवेकासाठी फार मोठी बुध्दीमत्ता असायची गरज नसते. पण त्यात ब्राह्मण समाज हा सरासरीने जास्त बुध्दीवान सुध्दा असतो. जातपात तोडक मंडळासमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतात बुध्दीमत्ता याचेच समानार्थी नाव जणु ब्राह्मण असे आहे.

याच गुणांमुळे वैयक्तिक स्वार्थात ब्राह्मण माणूस हा नक्कीच भित्रा असल्याचा आभास निर्माण होतो. होता होईल तो तडजोड करणे आणि प्रगती करणे यास तो दुबळेपणा समजत नाही. भित्रेपणाचा शिक्का बसला तरी होता होईल तो, तो अन्य समाजाशी तडजोड करत असतो. समजुतीने रहात असतो. अल्पसंख्य असल्याने त्यास झुंडशाही माहित नाही. त्यामुळे तो रस्त्यावर उतरणारा नाही. वेगळ्याच लेव्हल वर तो आपले प्रश्न सोडवत असतो. तो सहसा कायदा हातात घेत नाही. कोणास त्यास भित्रेपणा म्हणायचा तर म्हणु देत.

पण हाच ब्राह्मण माणूस सामाजिक वा सार्वजनिक प्रश्नात सर्वस्व गमावायला सिध्द असतो असा ऐतिहासिक दाखला आहे. स्वत:च्या स्वार्थ पुर्ती साठी साधी टाचणी पण न उचलणारा ब्राह्मण समाज व स्वातंत्र्य यासाठी खुशाल शस्त्रे उचलतो, क्रांतीकारक होतो, निर्भयपणे समाजासाठी लढतो. याची यादी काढली तर पानेच्या पाने भरुन मजकुर लिहावा लागेल. तो लढतो कारण त्याला स्वार्थापेक्षा मोठा असा “सोशल कॉज” मिळालेला असतो. क्रांतीकारकांमध्ये ब्राह्मणांची संख्या लक्षणिय आहे. सैन्यात सुध्दा ब्राह्मण जातात आणि पोलिस खात्यात सुध्दा जातात. व्यापारात सुध्दा ब्राह्मण समाज धडाडीने उतरतो आणि जोखिम घेताना दिसतो.

श्री. दिलिप कांबळे या महाराष्ट्राच्या मंत्र्याने ब्राह्मण समाजाविषयी काही अनुद्गार काढले असे ऐकतो. प्रत्यक्ष भाषण ऐकल्याशिवाय नेमके काय म्हटले ते पाहिल्या वाचून निष्कर्ष काढता येत नाही. कारण जे छापुन येते जे वृत्तवाहिन्यांवर सांगितले जाते त्याविषयी विश्वासार्हता १०% पण उरलेली नाही. ९०% प्रकरणात अर्थाचा अनर्थ करुन वार्तांकन केले जाते. त्यामुळे कांबळे यांना असे काही म्हणावयाचे नसावे अशी शक्यता नाकारता येत नाही.

तरीही असे काही दिलिप कांबळे यांना म्हणायचे असेल तर त्यांनी समजुन असावे की ब्राह्मण माणूस हा क्रिमिनल / गुन्हेगारी दृष्ट्या कधीच धाडशी नाही व तो त्याविषयी भ्याडच राहील. पण जेव्हा देव धर्म किंवा राष्ट्र यांच्या साठी त्यागाची वेळ येईल तेव्हा ब्राह्मण वर्गा सारखा धाडसी व शौर्यवान दुसरा मिळणार नाही.

वरील विवेचन हे अर्थातच लोकसंख्येच्या प्रमाणात केले आहे. तसेच  प्रत्येक ब्राह्मण त्यागी व शूर असतो किंवा इतर समाजात त्यागी किंवा शूर लोकांची संख्या कमी आहे असा याचा अर्थ अजिबात नाही. पण कोणाच्या मनात ब्राह्मण समाजाविषयी गैरसमज असेल तर तो राहु नये. ब्राह्मण हि सुध्दा राज्य केलेली आणि रणांगणात लढलेली जमात आहे. खरतर जातीगत गुण याला मुळातच अर्थ नाही, अनुवंश परंपरा केव्हाच मोडीत निघाली आहे, मात्र अजुन ती काहींच्या मनात दडुन राहिलेली असते तिला उत्तर देणे भाग पडते म्हणून जातीचा उल्लेख नाईलाजाने करावे लागतात.

लेखक: चंद्रशेखर साने

Previous Article

मुंबईतील सर्वात मोठा नवरात्रौत्सव; “रुपारेल नवरात्री उत्सव २०१७”साठी “दांडिया क्वीन” फाल्गुनी पाठक सज्ज

Next Article

पॅन कार्ड आधारला लिंक करण्यासाठी आज यासाठीचा शेवटचा दिवस आहे

You may also like