वांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची प्रवासातील सुरक्षा

Author: Share:

दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची गर्दी अन् त्या गर्दीत होरपळून निघालेला सर्वसामान्य माणूस. डोळ्यांनी पाहता येऊनदेखील अनेक सर्वसामान्य माणसांना रोजचं छोट्यामोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. कधी कधी हा अपघात एवढा मोठा असतो कि आयुष्यालाचं कायमचा लगाम बसतो. अंध लोकही रेल्वेने नित्यनियमाने प्रवास करत असतात. एकंदरीत समोरचं काहीही दिसत नसताना केवळ काठीच्या आधारे प्रवास करणं किती कष्टप्रद आहे याचाचं आढावा या लेखातून घेण्यात आला आहे.

वांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची प्रवासातील सुरक्षा.

वांगनीते दादर प्रवास करताना अंध व्यक्तींना सुरक्षाविषयक येणाऱ्या समस्या चा मागोवा आमचा संशोधनामध्ये करीत आहोत एकंदरीत आमच्या टीमने घेतलेल्या मुलाखती गटचर्चा तसेच रेल्वे प्रशासनाची भूमिका वर काम करणाऱ्या विविध संस्था त्यांच्याशी एकत्रित चर्चा केल्यानंतर सुरक्षितेचे विविध पैलू (प्रश्न) त्यांना भेडसावत आहेत यामध्ये पहिली समस्या रेल्वे प्रवास करीत असताना रेल्वे स्थानक आणि स्थानक यामधील अंतर कमी अधिक असल्याने याची शक्यता अधिक दिसतात रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूने इतक्या टिपक्याच्या टाइल्स नसल्याने प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक यामधील अंतर माहित होत असल्याने अंधांचा तोल जाऊन अपघात होण्याचीही दाट शक्यता असते. तसेच रेल्वे डब्यामध्ये अंध व्यक्ती व्यतिरिक्त इतर प्रवासी चढल्याने चोरी धक्काबुक्की होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागते.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


रेल्वे पोलिस प्रशासनाकडून अंधांना दिला जाणारा त्रास त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने उपासमारीची वेळ येऊन पडते अपंगाच्या रोजच्या जगण्याच्या कार्यक्रमांमध्ये रेल्वे स्थानकांमध्ये अंधांचा डबा शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते कारण अध्यायाच्या डब्याच्या ठिकाणे ठिकाणी विपर्स नसल्याने बऱ्याचवेळी तोल जाण्याची जाण्याची शक्यता अधिक असते तसेच अंधांच्या रेल्वे रेल्वे अंधांच्या डब्यामध्ये विपर्स नसल्याने रेल्वे प्लेटफॉर्म कोणत्या बाजूला येते हे कळत नसल्याने अपघात होतात.

रेल्वे डब्यामध्ये ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्म त्या-त्या ठिकाणी लावावेत जेणेकरून अपघात होणार नाहीत. रेल्वे मधील सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद असल्याने अंधांच्या डब्यांमध्ये चोरांचा शोध घेता येत नाही. हा मोठा फटका अंधांना बसतो. लैंगिक सुरक्षेच्या दृष्टीने अंध प्रवास करत असताना दररोज एकमेकांत स्पर्श होत असतो त्यामुळे स्वतःला सावरून बस न हा त्यावरचा उपाय आहे असे मुलाखतीतून माहिती होते.

रेल्वेमध्ये प्रवास करताना अंधांच्या डब्यामध्ये अपंग असल्याचे एक्टिंग करून चढतात त्यामुळे अंधांना धक्काबुक्कीला सामोरे जावे लागते याप्रसंगी खरचटणे चोरी होणे अशा घटना घडताना दिसतात रेल्वे हेल्पलाइन संदर्भात बराच वेळा वेळेवर मदत पोहोचत नसल्याने अंधांना सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच ठिकाणी रेल्वे ब्रीज नसल्याने अंधांना आपला जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅक पार करावे लागतात. तसेच, गर्दीच्या ठिकाणी रेल्वे ब्रीज गर्दीमुळे अंधांना ते चालण्यासाठी त्रास होतो परिणामी चेंगराचेंगरीचा प्रसंग अंधांसाठी घडू शकतो यासाठी स्वतंत्र लेन असावी.

रेल्वे मध्ये सर्वसामान्य महिलाना मोठ्या प्रमाणत लैंगिक त्रासाला सामोरे जावे लागते.अनेक वेळेला या प्रश्नांवर ठाम पने बोलण्यास महिला टाळाटाळ करतात परिणामी लैंगिक सुरक्षा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे वास्तव आहे. अशा परीस्थित अंध महिला प्रवाशांना हि अशाच प्रकारचे अनुभव आलेले असतात.पण त्या यावर कोणत्याही प्रकारे बोलत नाहीत असे जाणवते. विशेषकरून रात्रीच्या वेळेला अपंगांचा डब्बा जास्त असुरक्षित असल्याचे जाणवते.

आमच्या संशोधनाच्या मुलाखतीदरम्यान” दोन अंध महिलांनी वरील प्रकारचा लैंगिक त्रास झाल्याचे सांगितले.पण त्यांनी बदनामीच्या भीतीने आवज उठवला नसल्याचे सांगितले “वरील मुद्द्यावरून असे स्पष्ट होते कि महिला अंध प्रवासी आणि त्याच्या सुरक्षा विषयक बाबी महत्वाच्या आहेत.

मुंबई अंध जण मंडळ या संस्थेने सदस्य श्री हर्षद जाधव यांच्याशी आम्ही या विषयावर संवाद साधला तेव्हा ते म्हणाले कि,”अंध व्यक्तींची रेल्वे प्रवासातील सुरक्षा महत्वाची आहे कारण मुळात त्यांना दिसत नसल्यामुळे प्रवासत त्यांना असुरक्षित वाटू शकत” गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे बऱ्याच वेळेला धक्काबुक्की होते.यातून शारीरिक इजा होते. कारण सर्वानाच गाडी पकडायची घाई असल्यामुळे जातो. पळत असतो.त्यातच काही रेल्वे स्थानकांवर बीप यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे नेमका अपंगांचा डब्बा शोधायला वेळ लागतो.त्यामुळे अधिक प्रमाणात गैरसोय होते.

बऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही त्यामुळे लांबच्या प्रवासात शारीरिक त्रास जास्त होतो. लैंगिक त्रास या विषयावर बोलताना ते म्हणाले कि बऱ्याच अंध महिलांना वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक त्रासाला सामोरे जावे लागते.स्वतः अंध असल्याने त्यांना नेमका याचा अंदाज घेणे कठीण जाते. पण समाजातील अशा वाईट लोकांमुळे असुरक्षितता कायम जाणवते विशेषकरून रात्रीच्या वेळेला जेव्हा अपंगांचा डब्बा रिकामी असतो. अनेक महिला अंध प्रवासी बदनामीच्या भीतीने याची वाच्यता करत नाहीत पण असा अनुभव त्यांना नक्कीच येतो यात शंका नाही.
“नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड” या संस्थे चे जनसंपर्क प्रमुख संतोष गायकर म्हणाले कि,”अंधत्व हि एक प्रकारची व्यक्तीला आलेली मर्यादा आहे” कारण सामाजिक पातळीवर वावरताना प्रत्येक अंध माणसाला इतरांवर अवलंबून राहावं लागत.

रेल्वे प्रवास करताना सुद्धा अशाच प्रकारे लोकांची मदत घावी लागते. लोक मदत करतातही पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला घाई असते.त्यामुळे सर्वच लोक मदत करतातच असं नाही. जर मदत नाही मिळाली तर अंध व्यक्ती स्वतः अंदाज घेऊन प्रवास करते अशा वेळेला त्यांना शरिरिक इजा होणं स्वाभाविक आहे. गर्दी खूपच असल्याने ज्याला त्याला स्वतः ला सावरून प्रवास करणे खूप महत्वाचे असते. आमच्या संस्थेमार्फत आम्ही प्रवासात अंधांनी कशी सुरक्षितता बाळगावी यावर प्रशिक्षण देतो जेणेकरून अंध बांधवांचा प्रवास सुरक्षित होईल.

(पुढील भागात अंध व्यक्तींचे व्यवसाय व अडचणी)

@टिम परिवर्तन, पुकार संस्था मुंबई


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

अभिराम भडकमकर यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहिर

Next Article

अंध बांधवांची शैक्षणिक स्थिती आणि आव्हान

You may also like