व्यावसायिक अंध त्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनाची भूमिका.

Author: Share:

अंधांचा रेल्वेप्रवास जितका जोखमीचा आहे त्याहीपेक्षा जास्त त्रास रेल्वेप्रशासनाकडून त्यांना होतो. बर्‍याचदा भिकारी समजून त्यांना तुरुंगातही डांबले जाते. अंधांना रेल्वेकडून असणाऱ्या अपेक्षा अन प्रत्यक्षात रेल्वेप्रशासनाची भुमिका यावरती या लेखात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

व्यावसायिक अंध त्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनाची भूमिका.

वांगणी ते दादर प्रवास करताना अंध व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या च्या दृष्टीकोनातुन रेल्वे प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरते. आमच्या या विषयाच्या अनुषंगाने वांगणी ते दादर अंधाना प्रवास करताना येणाऱ्या सुरक्षाविषयक अडचणी या विषयावर रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अंधांची सुरक्षा आणि व्यवसाय करताना अंधांना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा केली. त्यांच्या मते रेल्वे परिसरात व्यवसाय करणे बेकायदेशीर आहे. तरीही मोठ्या प्रमाणात अंध बांधव रेल्वे परिसरात धंदा करतात ज्याचा सामान्य प्रवाशांना त्रास होतो परिणामी आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागते. एलफिस्टन पुलाच्या अपघातानंतर विशेष धडक कारवाई फेरीवाल्यांवर करणे अपरिहार्य होते.सदर मुलाखती मध्ये अंध महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले कि प्रत्येक स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल तैनात करण्यात आले असून महिलांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य प्रशासन देते.तसेच रेल्वे परिसरात भीक मागणे हा गुन्हा आहे.

मुंबई तरतूद कायदा 1886 काहींचे कायद्याचे उल्लंघन होते.त्यामुळे सदर व्यक्ती कारवाईस पात्र होते.रेल्वे प्रशासनाने अंध व्यक्तींसाठी विविध सोई सुविधा केल्या आहेत यामध्ये विशेष अपंगांचा डबा,सोबत बीप म्हणजेच अलार्म यंत्रणा,स्थानकांवर बैठक व्यवस्था,सेफ्टी टाइल्स,हेल्प लाईन सुविधा,स्वयंचलित घोषणा सिस्टिम सुविधा उपलब्ध आहेत.सोबतच विशेष सवलतीचा पास पण रेल्वे त्यांना पुरवते. वेळोवेळी सेमिनार घेऊन दिशानिरदेश देण्याचे काम हि आम्ही करत असतो. सुविधेला आम्ही विशेष प्राधान्य देतो. या सर्व सुविधांचा पुरेशा प्रमाणात फायदा अंधाना होतो असे त्यांचे मत आहे.असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnlineअंधबांधवांच्या सुरक्षित आणि सुखकरप्रवासासाठी किमान अपेक्षा.

रेल्वे प्रवास हा तर दिवसेंदिवस प्रत्येकासाठीच एक खडतर समस्या बनत आहे.रेल्वतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रेल्वे प्रशासन व इतर संबंधीत घटकांकडून काही अपेक्षा असतात. या सर्व प्रवाशांमध्ये अंध प्रवासी प्रवास करत असतील तर त्यांना कोणत्या प्रकारच्या सुरक्षेसंदर्भात अडचणी येतात व अशा अंध व्यक्तींच्या रेल्वे प्रशासन व सह प्रवाशांकडून त्यांच्या रोजगार, धंदा करण्यासंदर्भात तसेच इतर कारणासाठी केल्या जाणाऱ्या प्रवासात किमान अपेक्षा काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.रेल्वेने प्रवास करणाऱ्या अंधव्यक्तींच्या एकूण 25 मुलाखती व दोन गटचर्चा आम्ही घेतल्या, यातील बहुतेक प्रवासी हे वांगणी ते दादर या पट्टीवर प्रवास करणारे होते. वांगणी हे ठिकाण मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे पट्ट्यातील अंध व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहत असलेले महत्त्वाचे स्थानक आहे. वांगणी मध्ये राहणाऱ्या या अंध बांधवांपैकी 175 ते 200 अंध बांधव रेल्वे अपघातात जखमी झाले आहेत असे एका अभ्यासू अंध व्यक्तीने सांगितले, म्हणूनच या अंध बांधवांच्या सुरक्षेसंदर्भात अपेक्षा महत्वच्या आहेत. अंध बांधवांना रेल्वे प्रशासनाकडून तसेच इतर प्रवाशांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत यावर सुद्धा चर्चा झाली. सदर

चर्चेत काही मुद्दे समोर आले, त्यांपैकी काही मुद्दे पुढील प्रमाणे:
सुरक्षित प्रवासा संदर्भात रेल्वे हेल्पलाइन कडून अपेक्षा:

अंध व्यक्तीचे सुशिक्षित असल्याचे प्रमाण कमी असल्याने रेल्वे हेल्पलाईनचा वापर कमी करतात. मात्र जे सुशिक्षित आहेत असे अंध बांधव रेल्वे हेल्पलाईनचा वापर करतात मात्र त्यांना काहीसा चांगला अनुभव रेल्वे हेल्पलाइन कडून आला नाही. असं मत यावेळी एका अंध बांधवांना व्यक्त करताना ते म्हणाले “रेल्वे हेल्पलाइन आमच्या अंध बांधवांना एवढी मदतीची ठरत नाही कारण सर्व काही बांधव शिकलेले नसल्यामुळे फोन करणे जमत नाही मात्र काही अंध बांधव हेल्परच्या लाईनला संपर्क करतात.तर दुसऱ्या एका मुलाखत देणाऱ्या व्यक्तीने “कधीकधी रेल्वे हेल्पलाइन सतत बिझी दाखवत असते. त्यामुळे अडचण किंवा अतिप्रसंगाचा वेळी रेल्वे हेल्पलाइनची मदत होत नाही” असे सांगितले तर एका मुलाखत देणाऱ्याच्या मते “कधी कधी रेल्वे हेल्पलाइन कडून रिस्पॉन्स मिळतो मात्र त्याला खूप उशीर झालेला असतो.” अशाप्रकारे रेल्वे हेल्पलाइन कडून अपेक्षित असलेली सेवा पुरवली जात नसल्याचा आरोप काही अंध व्यक्तींनी व्यक्त केला.

अडचणीच्या काळात अंध व्यक्तींसाठी हेल्पलाईन महत्त्वाची भूमिका बजावू शकते,यासाठी मदत करणे अपेक्षित आहे. रेल्वे हेल्पलाइन बद्दल मत व्यक्त करताना काही सकारात्मक अनुभवही काही सुशिक्षित अंध संदर्भबांधवांना आल्याचे जाणवले. विशेषत जे नियमित प्रवास करतात, रेल्वे हेल्पलाइनचा अधिक वापर करतात त्यांना याबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे असे यावेळी चर्चेतून स्पष्ट झालं. एका अंध बांधवांनी त्याचा अनुभव सांगताना एका प्रसंगात मदतीची गरज असताना.“मी ठाण्याला फोन केला होता तेव्हा मला डोंबिवलीच्या crpf पोलिसांनी सहकार्य केले.” असे आवर्जून सांगितले. यावरून रेल्वे हेल्पलाइन अंधांना कशाप्रकारे सहकार्य करते हे समजले तसेच अंध व्यक्तींना जास्तीत जास्त रेल्वे हेल्पलाइनचा वापर करण्यासाठी संबंधित हेल्पलाईन ने सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आम्हाला वाटत.
मदतनीस संकल्पना अमलात आणावी. प्रत्येक डब्यात अपंग व्यक्तींसाठी एक मदतनीस असावा जो अंध बांधवांना पुढील स्टेशनची माहिती पुरविली तसेच अंध बांधवांना चढता उतरता यावे त्यासाठी सहकार्य करेल. तसेच येणारी पुढील स्टेशन कोणत्या बाजूला येईल त्यांना सहकार्य करील असे मदतनीस dreamसरकारकडून नेमले जावेत. अशी अपेक्षा काही अंध बांधवांना व्यक्त करताना “सरकारने आम्हा अंध-अपंगांना मदतनीस म्हणून काही लोकांना आमच्या डब्यात स्थान द्यावे” असे मत व्यक्त केले. तर दुसऱ्या एका बांधवांनी या संदर्भात आपले मत व्यक्त करताना “मदतनिसांचे अंध बांधवांना व इतर अपंग व्यक्तींना सुद्धा सहकार्य होईल” नवीन प्रवासी प्रवास करत असताना खूप अडचणी निर्माण होतात म्हणून एका नवीन प्रवासाने ही सूचना मांडली. अशाप्रकारे या अंध व्यक्तींचं बांधवांनी मदतनीस संदर्भात सूचना मांडताना काही संदर्भ दिले.

रेल्वे प्रशासन, टी सी आणि पोलीस यांकळून अपेक्षा :

प्रवास करत असताना अंध बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी ते कमी होण्यासाठी या अंध बांधवांची टी सी व पोलीस तसेच इतर यंत्रणांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. एका अंध बांधवांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त करताना सांगितले कि,’’गर्दीच्या वेळी तरी पोलिसांनी अपंग डब्याच्या जवळ उभे राहून इतर प्रवाशांना डब्यात जाण्यास मज्जाव करावा.’’ त्यामुळे अंध बांधवांना त्रास होणार नाही.” असे सांगितले. तसेच दुसर्‍या एका अंध व्यक्तींने आपल्या मुलाखतीत “इतर प्रवाशांकडून होणारा त्रास कमी व्हावा असे जर वाटत असेल तर टी सी गर्दीच्यावेळी आम्हाला सहकार्य करून त्या अंध बांधव कसे अपंगांच्या डब्यात जातील या बद्दल सहकार्य करावे” अशी भूमिका मांडली. त्यामुळे अंध बांधवांना रेल्वे प्रशासनाकडून व पोलिसांकडून सुरक्षेसंदर्भात प्रत्यक्ष काम करण्याची अंध बांधवांना त्यांच्या आरक्षित डब्यात चढण्याचा मार्ग सुखकर व्हावा यासाठी मदत करावी असे माझ्या निदर्शनास आले.

सह प्रवाशांकडून अपेक्षा:

गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर आमच्या अंध बांधवांना सामान्य प्रवाशांचा कधी कधी त्रास होतो. या त्रासांसंदर्भात एका अंध व्यक्तींने सहप्रवाशा बद्दल आपले मत व्यक्त करताना “अन्य प्रवाशांकडून आम्हाला सहकार्याची भावना अपेक्षित असते कारण गर्दीच्या वेळी सामान्य प्रवाशांना अपंग डब्यात चढता येते, मात्र आमचा अंध बांधवांना त्यांच्या डब्यात जाता येत नाही. मात्र सामान्य प्रवाशी डब्यात चढतात त्यामुळे अंध बांधव डब्याबाहेर राहतात’’असे मत व्यक्त केले. तसेच एका अंध बांधवांनी “सामान्य प्रवाशांनी त्यांच्या डब्यात जावे जेणेकरून आमचे अंध बांधव त्यांचा डबा शोधून त्यांच्या आरक्षित जागेवर बसतील. त्यामुळे आम्हाला त्रास होणार नाही” असे मत व्यक्त केले. तर एका अंध बांधवांना “आम्ही काठीच्या साह्याने प्लॅटफॉर्मवरील अंतर शोधता येते मात्र गर्दीच्यावेळी तेही जमत नाही त्यामुळे सामान्य प्रवाशांनी सहकार्य करावे” अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुलाखत व गटचर्चेवरून एकंदरीत सामान्य प्रवासी ज्या प्रमाणे प्रवास करतात त्या प्रमाणे अंध व्यक्तींना सुखकर प्रवासाचा लाभ मिळत नाही अस समजले. त्यांच्यासाठी अपंग डब्बा आरक्षित केला, प्लॅटफॉर्म वर टाईल्स बसवल्या, बीप व्यवस्था(अपंगांचा डब्बा ओळखण्यासाठी) केली म्हणजे अंध व्यक्तींचा प्रवास सुखकर व सुरक्षित झाला असे नाही. तर त्यांना मुख्यत्वे प्रवास ज्या कारणास्तव करावा लागतो त्या त्यांच्या रोजगाराच्या प्रश्नावर रेल्वे प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज असल्याचे समजते. तसेच सामान्य प्रवाशी जसे गर्दी नसताना सौजन्याने वागतात तसेच गर्दीच्या वेळी ही त्यांनी सहकार्याची भावना दाखवून आमच्या डब्यातील प्रवास टाळावा व आमच्या बांधवांना त्यांच्या आरक्षित जागेवर बसण्यास मदत करावी. आणि हे शक्य नसल्यास रेल्वे प्रशासनाने टी.सी. व पोलिसांच्या सहकार्याने अंध व्यक्तींना मदत करावी. असाही सूर या चर्चेतून आळवला गेला. रेल्वे प्रशासनाकडून यामध्ये विशेष अपंगांचा डबा, सोबत बीप म्हणजेच अलार्म यंत्रणा,स्थानकांवर बैठक व्यवस्था,सेफ्टी टाएल्स,हेल्प लाईन सुविधा, स्वयंचलित स्थानक आल्याचे घोषणा करणारी सिस्टिम सुविधा उपलब्ध करून द्यावेत.

अंध बांधवांच्या धंदा – रोजगार यासंबंधी अपेक्षा:

आमच्या संशोधन ग्रुप तर्फे अंध व्यक्तींच्या मुलाखत व गट चर्चेतून अंध बांधवांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अंध व्यक्तींचा रेल्वेने प्रवास करण्याचे मुख्य कारण म्हणजे पोटापाण्यासाठी करावा लागणारा धंदा होय. मग त्यात कोणी शैक्षणिक साहित्य, फोल्डर फाईल तसेच खेळणी, लॉटरी टिकिट, चैन, टाळे उषा विकणे, पास कवर, शोभेच्या वस्तू विकन्याचा धंदा हे बांधव करत असतात. परंतु हा धंदा करत असताना अंध बांधवांना रेल्वे प्रशासनाकडून त्रास होत असल्याचं समजलं एका अंध व्यक्तीने “रेल्वे प्रशासन तसेच टी सी व पोलिस आम्हा अंध बांधवांना त्रास देतात. कधीकधी धंदा होत नाही तरी हे लोकं आमच्याकडून दंड वसूल करतात. पावती फाडतात त्यानंतर आम्हाला कोर्टात नेले जाते. कोर्टात केसेस दाखल केल्या जातात सदर केसेसमधील आम्हाला भिकाऱ्यासारखे वागणूक दिली जाते. अशावेळी कधीकधी आम्हाला दोन दोन दिवस पोलीस सोडत नाहीत.” त्यामुळे अंधांना असुरक्षित वाटते धंद्याबद्दल रेल्वे प्रशासनाने काहीतरी निर्णय घेऊन त्यांना रेल्वे प्रशासनाने त्यांचा धंदा अंधिकृत करण्यासाठी सहकार्य करावे जेणेकरून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटेल. यावर मत व्यक्त करताना ” धंदा, व्यवसायाला परवानगी दिली तर बऱ्यापैकी आमची समस्या सोडवली जाईल.

रेल्वे प्रशासन तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेऊन सहकार्य करावे . तसेच ज्या बांधवांना अंध असल्याचे प्रमाणपत्र आहे अशांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी जेणेकरून उपजीविकेचा प्रश्न कायमचा सुटला जाईल. यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने पाऊल उचलायला हवे अशी अपेक्षा आम्ही अंध बांधव म्हणून करतो” असे मत व्यक्त केले. रेल्वे मध्ये आम्हाला धंदा करताना सुरक्षित वाटते असे मत अंध व्यक्ती असलेल्या व त्यांच्या समस्येवर अभ्यास करणाऱ्या एका तज्ञ व्यक्तीने एका मुलाखती दरम्यान केले. इतर ठिकाणी धंदा करताना कोणी आम्हाला फसवू शकतो म्हणून आम्ही रेल्वेत धंदा करतो.

(पुढील भागात नव्या संशोधकांची मांदियाळी…)

@टिम परिवर्तन, पुकार संस्था मुंबईअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 

Previous Article

पीएचडी – अजून खूप काही भाग १

Next Article

मनमाड शहरात अतिक्रमणे जमीनदोस्त

You may also like