अंध बांधवांची शैक्षणिक स्थिती आणि आव्हान

Author: Share:

पहिल्या भागात मोठ्या प्रमाणात अंध लोक वास्तव्य करत असलेल्या वांगणीचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. लेखनमालेच्या या दुसर्‍या भागात अंध लोकांच्या शिक्षणावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ते प्यायल्यानंतर कुठलाही माणुस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अंध लोकही शिक्षणाने समृध्द होतं आहेत. परंतू अंध लोकांसाठी फारश्या शैक्षणिक सुविधा नसल्याकारणाने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अंध बांधवांची शैक्षणिक स्थिती अन् त्यासाठी त्यांना येणारी आव्हान याचाच हा परामर्श…


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


वांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची शैक्षणिक स्थिती आणि आव्हान.

शिक्षण हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. शिक्षणाने माणूस सशक्त होतो. जगाकडे तो डोळसपणे बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शिक्षण हे ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांसाठी पोषक ठरते. त्याचप्रमाणे ते अंधांनाही समाजाकडे डोळस पणे बघायला शिकवते शिवाय जगण्यासाठी पूरक ठरते.

बदलापूर जवळील वांगणी परिसराला विशेष महत्त्व आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेली कमी असले, तरी शिक्षणाचं प्रमाण येथील अंध व्यक्ती मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षण हे त्यांच्या रोजच्या जगण्याला सकारात्मक बनवत आहे. यासोबतच अंध बांधवाना शिक्षण घेताना विविध समस्या येतात यात प्रामुख्याने पुस्तक ब्रेल भाषेत मिळत नाहीत,संगणक वापरण्याचे तंत्र वापरण्याचे प्रशिक्षण नसल्याने अडचण येते.परिणामी शैक्षणिक अडचणी येतात.

विशिष्ट शिक्षण साधनांचा तुटवडा-

ब्रेल ही अंधांसाठी लिपी, दिसत नसल्यामुळे ठिपक्यांच्या सहाय्याने बनवलेल्या या लिपीला स्पर्शाच्या माध्यमातून अंध विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. ब्रेल लिपी हा पर्याय अंधांसाठी उपलब्ध असला तरी सर्वच महाविद्यालयांत वा शाळांत हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण घेण्यास अंध व्यक्तींना अडचणी येत आहेत. ऐकीव(ऑडिओ) स्वरूपातील साहित्यही अंधांना महत्त्वपूर्ण उपयोगी ठरत आहे. परंतु अशा साहित्याची उपलब्धता कमी असल्यामुळे अंध विद्यार्थ्यांना अडचणी येतात.

ब्रेललिपी व ऑडीओ स्वरूपातील साहित्य अंध विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असले तरी त्यांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे अंध विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.यावर प्रकाशटाकताना एका अंध व्यक्तींचं म्हणणे होते कि,”ब्रेल लिपीत जास्त साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे ब्रेल लिपीतील साहित्य कमी आहे.ऑडिओ स्वरुपातील साहित्याची आम्ही वारंवार मागणी करूनही ते आम्हाला उपलब्ध करुनदिलं जात नाही. आम्ही हे साहित्य फुकट नाही घेत. पण तरीसुद्धा ते आम्हाला उपलब्ध होत नाही…”

प्रगत तंत्रज्ञान:

तंत्रज्ञानाबरोबर स्वतःतही बदल अपेक्षित असतात. माहिती तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. सर्वसाधारण लोक उपलब्ध साधनांच्या आधाराने स्वत:मध्ये बदल घडवून आणतात. उदारणार्थ ब्रेल कीबोर्ड वापरणे,टोकिंग सोफ्ट्वेअर हाताळणे. रेकॉर्डिंग यंत्रणा वापरणे अश्या विविध प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे आव्हान आहे. परंतु अंधांसाठी असणारी साधने अल्प प्रमाणात असल्याने त्यांना लगेच या बदलांबरोबर बदलता येत नाही.

शिक्षणासाठी वसतिगृहांचा वापर:

शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अंधांसाठी शिक्षणाच्या सोयी मोठ्या प्रमाणातनसल्या कारणाने अंध विद्यार्थी शासकीय वप्रशासकीय वसतीगृहांचा आधार घेत आपले शिक्षण पूर्ण करत आहे. चेंबूर येथील वसतिगृहं वरती हे विद्यार्थी राहून आपलं शिक्षण पूर्ण करीत आहेत. येथील एक विद्यार्थी म्हणतो,“बदलापुर ला आमची संस्था आहे. कुर्ल्याला सध्या मी शिक्षण घेत आहे. त्यामुळे वसतिगृह आम्हाला फार उपयोगी पडतात.”

शिक्षण व रोजगार-

शिक्षण घेण्यात अंध व्यक्ती मागे राहिलेले नाहीत. आपल्या आंधळेपणाचा बाऊ न करता ते निर्भीडपणेशिक्षण घेत आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि व्यवसायाभिमुख शिक्षण आणि देणाऱ्या संस्था अंधांना रोजगाराभिमुख शिक्षण देत आहेत. शिवाय प्रशिक्षण घेतलेल्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधीही प्राप्त करून देतात.

त्यामुळेअशाप्रकारचे देणाऱ्या संस्था अंधांना रोजगाराभिमुख शिक्षण देत आहेत.प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या अंधांची संख्या लक्षवेधी असली तरी माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या अंधांची संख्या कमी आहे. शिवाय पदवीपर्यंतव पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांची संख्या याहीपेक्षा कमी आहे. शिक्षणाच्या सुविधांच्या तुटपुंजेपणा हे त्यामागचं महत्त्वपूर्ण कारण आहे.रेल्वे व बँकिंग क्षेत्रात अनेक अंध व्यक्ती काम करतायत रोजचा प्रवास करून आलेला अनुभव यामुळे ते आता निर्भीडपणे प्रवास करत आहेत.

शिक्षण घेण्यामध्ये अंध लोक अग्रेसर आहेत. अंध लोकांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात. काहीजण पूर्णतः अंध असतात तर काहींना मात्र अंशतः दिसत असतं. बऱ्याचदा व्यावसायिक क्षेत्रात प्रशिक्षण  घेऊन देखील प्रत्यक्ष रोजगार मिळवताना अंधांना डावलले जाते. औद्योगिक प्रशिक्षण घेऊन रोजगारासाठी परिपूर्ण झालेल्यांना प्रत्यक्ष कामकरताना मात्र रोखलंं जातं.

अंशतः अंध लोकांना कामाच्या ठिकाणी संधी मिळत असली, तरी देखील योग्यता असून देखील कौशल्यप्राप्त असतानाही पूर्णतः अंध लोकांना मात्र संधीतून डावलले जाते. यावर भाष्य करताना एक अंध व्यक्ती म्हणतो की,‘बारावीनंतर मी अंध लोकांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या आयटीआय मधून प्रशिक्षण घेतलं. आमच्यामध्ये पास होणारे आम्ही तिघेजण. पूर्ण ब्लाइंड होतो. पण त्यानंतर कामाला घेताना आम्हाला डावललं गेलं. जे नापास झाले होते व ज्यांना थोड्याफार प्रमाणात दिसत होतं त्यांना कामावती घेतलं. जर आम्हाला घ्यायचेच नव्हतं तर हे प्रशिक्षण दिले तरी कशाला?’’

शासकीय व प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना किंबहुना कधीकधी निवड झाल्यानंतर त्यांना त्यांचा
अंधपणा त्यांच्या प्रगतीच्या व योग्यतेच्या आड येत आहे. त्यांना डावलले जात शिवायत्यांच्या अंधपणामुळे त्यांच्या योग्यतेवर ती ही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात.

शालेय शिक्षणाचा रोजगारावर परिणाम:

रेल्वेने प्रवास करत असताना अनेक वेळा अंध व्यक्ती जीवनावश्यक सामान विकत असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य लोकांमध्ये वावरताना अंधव्यक्तींना शिक्षणाचा फायदा होत असतो. अनेक अंध व्यक्ती रेल्वेगाड्यांमध्ये गाणी बोलून समोरच्याचं मनोरंजन करून आपल पोटभरतात त्यांचे हे कौशल्य त्यांच्या पोटापाण्याचे साधन झाले आहे.रेल्वेगाड्यांमध्ये धंदा करणाऱ्या अंधांचे शिक्षण हे प्राथमिक स्वरूपाचे झाले आहे.आणि शिक्षणाचा त्यांच्या स्वतःच्या जीवनात उपयोग होतो.हे एका अंध व्यक्तीच्या बोलण्यावरून दिसून येतं.

तो म्हणतो कि,”आमच्यापैकी जवळपास सगळ्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आहे.तर काही जणांनी अमर्याद शिक्षण घेतलं आहे.”म्हणजेच,काही निरक्षर तर काही उच्चशिक्षित आहेत.शिक्षणाने माणूस सुदृढ होतो, परिपक्व होतो, व समोरच्या व्यक्तीकडे,विश्वाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याचा प्रयत्न करतो.अंध लोकही शिक्षण आणि समोरच्या जगाकडे डोळसपणे बघण्याचाप्रयत्न करतात.परंतु शिक्षणाच्या सोयी परिपूर्ण नसल्यामुळे किंबहुना त्या उपलब्ध न झाल्यामुळे तर कधीकधी अंधत्वामुळे मर्यादा आल्या मुले उच्च शिक्षण घेता येत नाही.परंतु स्वतः व्यवसाय करताना वा आपलं दैनंदिनजीवन जगत असताना त्यांना शिक्षणाचा उपयोग होत आहे. शिक्षणाने ते परिवर्तनाच्या वाटेवरती चालत आहेत.

(पुढील भागात वांगणी अन् मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधांची प्रवासातील सुरक्षा यावर लेख असेल)

@टिम परिवर्तन, पुकार संस्था मुंबई


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

वांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची प्रवासातील सुरक्षा

Next Article

भूक

You may also like