सेना भाजप युती महत्वाची

Author: Share:

शिवसेनेच भाजप बरोबरच संबंध मैत्रीचे होते. २७ वर्षांपासूनची मैत्री बाळासाहेबांच्या काळात खूपच घट्ट होती. गोपीनाथ मुंडे,प्रमोद महाजन यांच्या काळात हि भाजप सेनेची मैत्री सर्वांनाच माहित आहे. त्या काळी बाळासाहेबांचा शब्द सर्वमान्य असायचं. पण आज परिस्थितीवेगळी आहे.एक नेतृत्वच सेनेत उरलेले नाही. उद्धव एक बोलतात तर राऊत एक बोलतात.भाजप आणि शिवसेनेतील मैत्री आज सत्ता असून हि खूप ताणली गेली आहे.सत्ता उपभोगायचे आणि भाजपावरच कुरघोडी करायची.खरा शिवसेनेचा हा माजोरडेपणा म्हणावं लागेल.संसदेतही शिवसेना अविश्वास प्रस्तावाच्या विरोधातहि नाही आणि मतदानात सहभाग हि नाही.याला काय म्हणावे ? हे असल शिवसेनेचं वागणं बर नव्ह.याविषयी सविस्तर लिहीन खरंतर गरजेचं आहे.

शिवसेनाने मराठीच्या मुद्द्यांवर प्रतिभाताईंना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान केले.त्यावेळीही शिवसेनेने माजोरडेपणा करत भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदान नाही केलं.२००७ च्या राष्ट्रपती निवडणुकीत हि संजय राऊत म्हणाले होते कि” पाटील यांना महाराष्ट्रातल्या होत्या. तिचे कुटुंब गेल्या 300 वर्षांपासून इथे रहात होते. “राज्य स्थापन झाल्यापासून गेल्या 50 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कोणीहीच राष्ट्राध्यक्ष नाही आणि ही एक संधी आहे. तसेच हीच प्रथमच स्त्रीची नियुक्ती झाली होती.”हे खर जरी असल त्यावेळेला शिवसेनेने आपण कुणाबरोबर आहोत ? भाजप हा आपला मित्र पक्ष त्याला आपण साथ देत नाही.प्रतिभाताई मराठी जरी असल्या तरी त्या काँग्रेसकडून लढत होत्या. असो बाकी सेनेचा विषय होता.शिवसेना असे बरेच वेळेला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसले आहे.मित्र हा नेहमी संकट काळी मदत करतो. मग शिवसेना कसला मित्र बऱ्याच वेळेला भाजपला साथ दिली नाही. राष्ट्रपतींची निवडणूक असो कि विधानसभेत सुरुवातीचे काही महिने विरोधी बाकांवर बसले होते. नांतर सेनेने भाजप पाठिंबा दिला.शिवसेनेलाही माहित आहे कि सत्ता आता मिळालीय अन आपल्याला भाजप बरोबर सत्ता उपोभोगायची आहे अन्यथा आपले आमदार सेनेत नसतील. हे सेना चांगलाच समजून आहे.

सध्याच्या परिस्थीतीचा विचार केला तर आज सेना भाजपला बऱ्याच वेळेला म्हटलं आहे मी कि आम्ही सत्ता सोडू पण काही सत्येचा मोह सेनेकडून सुटत नाही.लोकसभेत हि सेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. आज आपण महाराष्ट्रात आणि लोकसभेतहि मंत्री पद उपोभोगात आहोत मग आपण सत्तेत असून हि सत्तेत नसल्यासाखे का वागत आहोत याचा सेनेने आणि पक्षाध्यक्षांनी विचार करावा. नाहीतर स्वाभिमान दाखवून राजीनामे तरी द्यावेत. पण आपण सेनेत फूट पडेल म्हणून सत्ताही सोडत नाही. अन इकडे भाजपलाही सत्तेसाठी सेनेची गरज आहेच त्यामुळे हा सारा प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.ह्यात भाजपचीच संयमी भूमिका घेतली जात आहे.

सामानातून राहुल गांधींचे कौतुक केल गेलं. सामना मुखपत्रातून “भावा तू जिंकलस” ह्या भावाने काय जिंकलं ते भावा म्हणाऱ्यालाच माहित असावं. यातून असच दिसून येते कि भाजपाला काहीही करून डिवचण्याचा हा काय तो प्रकार असावा.इकडे महाराष्ट्रात खरा भाऊ लांब आहे. परका झाला आहे आणि उपऱ्याला भाऊ म्हटलं जाण यातून काय सिद्ध होतंय कुणाचं ठाऊक. ? लोकसभेत झालेल राहुल साहेबांचं भाषण सर्वांनी ऐकलं आणि जो काय विनोद झाला अख्या जगाणं बघितलं.खरं तर त्या मिठीच कौतुक सामनातून झालं. खरंतर मिठी मारण्याला काहीच चूक नाही.पण नंतर न डोळा मारणं हे चूक. राहुलजींनी डोळा मारला त्यातूनच हे सार बनावटी खेळ होता हेच सिद्ध होत.पण शेवटी भाजपने ३२५ मतांनी ठराव जिंकला. सेनेने मतदान न करता मग सेना सत्तेत कुठल्या नैतिक मुद्द्यांवर सत्तेत आहे? ते सेनेने स्पष्ट करावं.हजार वेळेला सत्तेतून बाहेर पडू मग सत्ता का नाही सोडली जात.

२०१९ मध्ये भाजप बरोबर सेना जाईल असे वाटत नाही. सेनेने या अगोदरच स्वबळाचा नारा देऊन झाला आहे. लोकसभेत सेना स्वबळावर लढली तर काय होईल हे सेना जाणून आहे.कळत पण वळत नाही अशा स्थितीत सेना आहे.२०१४ मध्ये आपल्याला मोदीलाटेमुळे आपले १७ १८ खासदार निवडून आले आपण स्वबळावर किती खासदार निवडून आणू हे उद्धव साहेबांना कळत नसल तरी सेनेच्या नेत्यांना मात्र चांगलाच ठाऊक आहे.संजय राऊत आणि काही बाकी सेनेतील लोक आहेत त्यांनी काही महिने तरी गप बसलेलंच सेनेच्या फायद्याचं आहे.विधानसभेतहि ६३ आमदार निवडले. २८८ जागा लढऊनही ६३ आमदार निवडत असतील तर सेनेचे नेते कुठल्या हिशोबात स्वबळाचा नारा देत आहेत.एवढ्या वर्षांनी आपला आमदारांचा एकडा ६३ पर्यंत पोहचला.

बाकी सारे बाजूला ठेऊन मागील वैर विसरून भाजपबरोबर राहिले तर काहीतरी सेनेच्याही आणि त्यांच्या नेत्यांनाच फायदा आहे नाहीतर तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला अशी परिस्थिती होऊ शकते. २०१९ ला जर पुन्हा सत्ता हवी असेल तर सेना भाजप युती खूपच महत्वाची आहे.

लेखक: वीरेंद्र सोनावणेअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 

Previous Article

मालवाहतूक संपामुळे चार लाख क्विंटल कांदा जिल्ह्यातच पडून…

Next Article

स्पर्धेच्या माध्यमातून झुंजने साधला चिमुकल्यांशी संवाद…

You may also like