भास्कर कदम यांचा एकसष्टी समारंभ संपन्न

Author: Share:

नांदगाव-( प्रतिनिधी ) आज देशासमोर अनेक समस्या आहे. देश बिकट परिस्थितीशी सामना करत आहे या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी म.फुले, शाहु, आंबेडकर व साने गुरूजींच्या विचारांची गरज आहे यां महान मानवानी समतेच्या विचारांचा संदेश समाजाला दिला या विचारांवर पाऊल ठेवुन भास्करभाऊ आपण समाजात समाजसेवेचे कार्य करत आहात व भारतीय राज्यघटनाचा आदर्शांचे पालन करणे आजची गरज आहे ती तुमच्या या कामात सौ.संगीता वहीनींचाही हातभार आहेन अभिष्ठचिंतन सोहळ्यामध्ये ते दिसुन येत आहे याचे कौतुक करावेसे वाटते असे प्रतिपादन प्रमुख अतिथी आ.सुधिर तांबे यांनी केले नांदगाव येथे सावता कंपाऊंडला येथील जेष्ठ पत्रकार व माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांच्या एकसष्टी समारोह त्यांच्या मित्र परिवार गौरव समिती द्वारे आयोजित केला होता या कार्यक्रमास तालुक्याचे जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे, विश्वशिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे, माजी शिक्षक आ.नानासाहेब बोरस्ते,माजी आ.संजय पवार,माजी आ.अनिल आहेर,शिवसेना जिल्हाप्रमुख सुहासआण्णा कांदे,नगराध्यक्ष राजेश कवडे, जेष्ठ नेते साहेबराव पाटील, पत्रकार श्रीकांत बेणी, जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस यशवंत पवार, गंगाधर बिडगर,पंचायत समिती सभापती सुमनताई निकम,जि.प.सदस्य अश्विनी आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, मनमाड नगरपालीका अध्यक्ष भिमराव जेजुरे, नामको बँकेचे संचालक सुभाष नहार, दिलीप इनामदार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य शं.त्र. आंबेकर, जळगाव येथील डी.बी.महाजन आदि माव्यवरांच्या हस्ते भास्कर कदम यांचा एकसष्टीलपूर्ती गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव समितीचे अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा पुरस्कार विजेते विष्णू निकम यांनी केले तर जयंत निकम यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला तर  जिल्हा शिवसेना नेते सुहासआण्णा कांदे, मा.आ.अनिल आहेर, मा.आ.संजय पवार यांनी भास्कर कदम यांच्या सामाजिक व राजकिय तसेच पत्रकार क्षेत्रातील आठवणींना मनोगतातुन उजळा दिला बापुसाहेब कवडे यांनी अध्यक्षीय भाषणातुन भास्कर कदम यांच्या कार्याचा गौरव करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भास्कर कदम व सौ.संगीता कदम यांचा सन्मानपत्र व विजय चव्हाण यांनी रेखाटन केलेला फोटो देवुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार व गौरव करण्यात आला या प्रसंगी भास्कर कदम यांनी उपस्थितांकडुन शाल व भेट वस्तु न स्विकारता शिर्डी येथे विश्वशाहीर डॉ.विजय महारज तनपुरे यांनी दिव्यांगासाठी व जेष्ठ नागरिकांसाठी उभारत असलेल्या व शिवाश्रम प्रकल्पास एकसष्टीपुिर्ती निमित्ताने एकसष्ट हजार रूपयांची देणगी मान्यवरांच्या हस्ते डॉ.विजय तनपुरे यांना देण्यात आली तसेच यावेळी परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्याचा सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला यात ह.भ.प.तुकाराम महाराज जेऊरकर, शकुंतलाताई कवडे, अश्वीनी आहेर, रामदास भालेराव,नागसेन चव्हाण,अशोक परदेशी, संजीव निकम,डॉ.रोहण बोरसे, मीना जाधव, मिनाक्षी बैरागी, फिरोज शेख,आनंद कासलीवाल, पारस जैन,विजय चव्हाण, निकीता काळे,शिवानी इघे,जेष्ठ नागरिक संघ,नांदगाव व सामाजिक कार्यासाठी युवा फाऊंडेशन ,आकाश रोहम ,कवी रविंद्र मालुंजकर, कवी संदिप देशपांडे या मान्यवरांचा गौरव समिती द्वारे सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भास्कर कदम यांच्या जीवनावर आधारीत विजय चव्हाण यांनी व विजय भावसार यांनी तयार केलेली चित्रफीत अँड.सचिन साळवे यांच्या आवाजात सादर करण्यात आली कार्यक्रमाची सुरवात साने गुरूजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे व हमे शक्ती देना दाता या गीताने झाली या गीताचे गायन मनोज निकम यांनी केले तर सचिन पगारे व संदेश कसबे यांनी संगीत दिले या प्रसंगी विश्वशिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांचा शिवगर्जना पोवाडे व प्रबोधनपर गीतांचा अप्रतिम व उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध कवी रविंद्र मालुंजकर यांनी केले संतोष गुप्ता यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौरव समितीचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले .
शब्दांकन -प्रा.सुरेश नारायणे
फोटो ओळी:- माजी नगराध्यक्ष व जेष्ठ पत्रकार भास्कर कदम ,संगीता कदम यांचा सत्कार करतांना विश्वशाहीर डॉ.विजय तनपुरे,श्रीकांत बेणी,राजेश कवडे, नानासाहेब बोरस्ते,सुहास कांदे,साहेबराव पाटील,बापुसाहेब कवडे,अँड अनिल आहेर,संजय पवार ,शं.त्र्य.आंबेकर,सुभाष नहार आदी.

Previous Article

संकोचुणी काय झालासे लहान..!

Next Article

पवित्र रमजानचे महत्व – शकील जाफरी

You may also like