चिमुरडींना पोट भरण्यासाठी करावी लागते दोरीवरची कसरत; हाच फरक आहे भारत आणि इंडियामधला.

Author: Share:

वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कोणी शासकीय सेवेत, कोणी खाजगी कंपनीमध्ये, अस्थापनांमध्ये, वेटबिगारी, तर विवीध कष्टाची कामे करतात, तर कोणी आपला स्वताःचा छोटामोठा व्यवसाय करतात. परंतु याच वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी व परिवारातील सदस्यांचा ऊदरनिर्वाह करण्यासाठी गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून नव्हे तर थेट छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात गावागावमध्ये दोरीवरची कसरत करुन प्रेक्षकांकडून मिळालेल्या बक्षीस रुपी पैश्यांवर ऊदरनिर्वाह करत आहे.

बारा वर्षाची कोमल व दहा वर्षाची शितल ह्या दोन्ही मुली जमिनीपासुन आठ ते दहा फुट ऊंच व पन्नास फुट लांब दोरीवर हातामध्ये दहा फुट लांब बांबू घेऊन डोक्यावर लहान कलश ठेवून, अनवणी पायाने व चप्पल पायात घालून, एक पाय लहान स्टीलच्या ताटलीमध्ये ठेऊन सायकलच्या चाकाच्या रींगमध्ये आणि श्टीलच्या मोठ्या ताटामध्ये आपल्या पायाचे दोन्ही गुडघे टेकवून पायाच्या बोटांमध्ये दोरी धरुन एका पायावर गाण्याच्या तालावर पंन्नास फुट लांब दोरीवर कोणाचेही सहकार्य न घेता वेगवेगळ्या गाण्यावर नाचत नाचत कसरत दाखवते.

मध्येच ऊलट्या दिशेने चालत विविध कसरत करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते आणि त्यांच्या कडून मिळेल त्या बक्षीस रुपी देनणीमध्ये धन्यता मानते आणि निघते नवीन गाव नवीन खेळासाठी.. जो दे उसका भी भला जो ना दे उसका भी भला… असे ऊद्गार काढून पुढील गावात रवाना होतात. वरील दोन्ही मुली सकाळ पासून सायंकाळपर्यंत चार ते पाच गावांमध्ये असे सकरतीचे खेळ करुन आपल्या परीवारातील सहा सदस्यांचा ऊदरनिर्वाह चालविण्यास मदत करतात.

त्यांचा दोरी वरील खेळ संपल्या नंतर ऊपस्थित प्रेक्षकांना विचारतात भाऊ पुढचे गाव कोणते आहे? आम्हाला त्या गावात आमचा खेळ दाखविला तर काही बक्षीस रुपी पैसे मिळतील का? असे विचारुन पुढील गावात आनंदाने रवाना होतात. आपण मुंबई सारख्या शरहात राहून मेक इन इंडियाची स्वप्ने पाहतो. पण आजही अनेक लोकांना पोट भरण्यासाठी मिळेत ती कामे करावी लागतात. आता या चिमुरडींचेच पाहा ना; ह्यांना वाट नसेल का आपण शाळेत जावं? शिकून खुप मोठ व्हावं? पण ह्यांची स्वप्ने कोण पूर्ण करणार? अशा घटना आपण पाहिल्या की आपल्याला जाणीव होते की आपण आज दोन देसात राहत आहोत. एका देशाचे नाव आहे इंडिया आणि दुसर्‍या डेशाचे नाव आहे भारत…

माहिती: ए.एस. हिंगमिरे

Previous Article

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जे पी ड्यूमिनीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Next Article

डॉ. शांताराम कारंडे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा संघटक पदी नियुक्ती

You may also like