Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

बाईपण बाईचं…

Author: Share:

आज सगळं घर सुधाला आवडेल अस सजवलेलं आणि घरी काही बायका मुली आलेल्या सगळ्यांनी सुधासाठी काही ना काही भेटवस्तू आणलेल्या. थोडक्यात सांगायचं तर आज सुधाचा दिवस होता. वाढदिवस नाही पण एक नवीन वळण जे तिला पुढल्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव घेऊन येणार होत. म्हणून मीरा आणि मिहिर दोघांनी तीचा आजचा दिवस म्हणजे सुधाचं  नव्यानेच सुरु झालेलं “बाईपण” साजर करून तिला खुश करायचं ठरवलं होत…म्हणून मिहिर तिच्यासाठी नवीन परकर पोलका ड्रेस घेऊन आला होता. आणि मीराने तिच्या आवडीच सगळं घरी सजावट आणि गोडधोड केल होतं.

    बाईचं “बाईपण” हा खरंतर तिच्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि आनंदाचा क्षण..तिच “बाईपण” हाच तिला आईपण देणारा असतो पण तरीही आपला समाज अजूनही तिच्या त्या दिवसात तिला हीनतेची वागणूक देतो. तिला जणू अशा नजरेने पाहिलं जात की तिच बाईपण म्हणजे मलिन, अपवित्र आणि लाजिरवाणी गोष्ट आहे.

    वैद्यकीय आणि शास्त्रीय दृष्टीने पहिले असता. या काळात मुलींच्या, बायकांच्या शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही झीज होत असते त्यामुळे त्यांची होणारी चीड चीड आणि दुखणे खुपणे चालू असते. खरं पाहता तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक पुरुषाने तिच्या या काळात तिची काळजी घेणं तिला आराम करू देण अपेक्षित असत. पण आपल्याकडे यातलं काहीच होत नाही उलटपक्षी भाऊ बहिणची मजा उडवतो, नवरा बायकोच हे दर महिन्याचं रडगाणं म्हणून दुर्लक्ष करतो. तर बाबा हे दिवस म्हणजे लेकीचं अतिलाड करण्याचे दिवस असं म्हणून टाळण्याचा प्रयत्न करत असतो.

    दुःख एवढचं की नरक यातना भोगून आलेलं आईपणाचा आनंदोत्सव करतो. पण त्या आईपणासाठी बाईने भोगलेल्या बाईपणाचा मात्र किळस आणि तिरस्कार केला जातो….कधी बदलणार आपली ही मानसिकता कधी स्वीकारणार आपणं “बाईचं बाईपण…”

जपा बाईचं बाईपण…

फळा येईल तिच आईपण…

लेखिका : नंदिनी

Previous Article

६ सप्टेंबर

Next Article

दहा हजारांपेक्षा अधिक बार पुन्हा सुरू होणार

You may also like