दहा हजारांपेक्षा अधिक बार पुन्हा सुरू होणार

Author: Share:

सर्वोच्च  न्यायालयाने दिलेल्या आदेशाद्वारे महामार्गांच्या ५०० मीटर अंतरावरील बार बंद करण्याच्या आदेशानंतर, बारबंदीचे संकट ओढवलेल्या आणि नंतर या आदेशातुन महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती आणि कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्ग वगळल्याने, बंद असलेल्या १० हजाराहून अधिक दारू दुकाने व बीअरबार ना परवाने देण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी घेतला.

१ एप्रिल २०१७ पासून अशा दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले नव्हते. १६ हजारपैकी १० हजाराहून अधिक दुकाने सुरू होणार असून, त्यांच्या मद्यविक्री परवान्याचे नूतनीकरण शुल्क व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर केले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Previous Article

बाईपण बाईचं…

Next Article

अत्र्यांची खरीखुरी श्यामची आई : शिरीष पै

You may also like