Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

आज पोळा 

Author: Share:

पोळा म्हणजेच बैलपोळा हा श्रावण अमावस्या (किंवा भाद्रपद अमावास्या) या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो; शेतात पीक/धान्य कापणीला आलेले असते;सगळीकडे हिरवळ असते; श्रावणातले सण संपत आलेले असतात; एकूण आनंदाचे वातावरण असते. भारतासारख्या शेतीप्रधान देशातव तेथील शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.

शेतीच्या कामात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून घाम गळणारे आणि त्यामोबदल्यात फक्त दोन वेळ अन्न आणि प्रेमाची अपेक्षा करणारे, बैल शेतकऱ्यांसाठी देवाहून कमी नाहीत. नांगरणीच्यावेळेस चिखलामध्ये पाय बुडविरून मातीमध्ये अडकून कठीण झालेला फाळ दिवसभर ओढत, शेतकऱ्याला त्याची जमीन ते उपजाऊ करून देतात. शेतीच्या कामात मोलाची मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही प्रथा खरंच किती महान आहे. 

आज बैलांना कामापासून आराम असतो. पराणी (काठी, जिच्या टोकासबैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) आज वापरली जात नाही. त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते.बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपकेशिंगांना बेगडडोक्याला बाशिंगगळ्यात कवड्या  घुंगरांच्या माळानवी वेसणनवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे असे शाही सजवले जाते. बैलांना गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. एवढेच नाही तर बैलाची निगा राखणा्र्‍या बैलकरी‘ घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

शेतकर्‍यांमध्ये आज उत्साह असतो. आपला बैल सर्वांमध्ये उठून दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) एक आंब्याच्या पानाचे मोठे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्यावाजंत्रीसनयाढोलताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस झडत्या‘ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, ‘मानवाईक‘ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा फुटतो‘. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. 

 

बैल नेणार्‍यास बोजारा‘ (पैसे) देण्यात येतात. 

असा हा पोळ्याचा सण, शेतीप्रधान मराठी संस्कृतीचे एक मानाचे पान आहे. 

संदर्भ: विकिपीडिया

 

Previous Article

नारायण… नारायण…

Next Article

मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा?

You may also like