Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पंचतारांकित हॉटेल्स टाळा: पंतप्रधानांची मंत्र्यांना तंबी

Author: Share:

नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील मंत्र्यांना त्यांच्या दौऱ्यादरम्यान पंचतारांकित हॉटेल्स मध्ये मुक्काम न करता सरकारी निवासस्थानात मुक्काम करण्याची तंबी दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर सगळ्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबायला सांगून त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये न उतरण्याचे आदेश दिल्याचे समजते.

त्याचप्रमाणे केंद्रातील मंत्री त्यांच्या खात्यातील सुविधांचा गैरवापर करतात या तक्रारींवरही पंतप्रधान नाराज आहेत. वाहने तुमच्या वैयाक्तिक वापरासाठी नाहीत, असे कडे बोल मोदी यांनी सुनावल्याचे समजते.

स्वतःच्या सरकारच्या प्रतिमेविषयी अतिशय सजग राहून त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत. २०१९ साठी तयारीसाठी ही प्रतिमा मालिन होऊ न देणे आवश्यक आहे.

Previous Article

इन्फोसिस चा समभागधारकांना बायबॅकचा सुखद धक्का

Next Article

प्रभू कोपले

You may also like