Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

जिल्हा परिषद शाळा अजूरफाटा येथे साजरा होणार ऑगस्ट क्रांति पंधरवडा

Author: Share:

भिवंडी प्रतिनिधी – मिलिंद जाधव: भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने ऑगस्ट महिन्याचे स्थान अलौकिक आहे याचं महिन्यात स्वातंत्र दिन,9 ऑगस्ट क्रांती दिन, अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, आदिवासी दिन हे दिनविशेष येत असतात.

शालेय जीवनात देशभक्ती, देशप्रेम,स्वातंत्रलढ्याचा इतिहास समजावा तसेच स्वातंत्र हे केवळ सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी भारतभूच्या सुपुत्राने प्राणाचे बलिदान केले आहे याची जाणीव व्हावी याकरिता या पंधरवाड्याचे आयोजन मुख्याध्यापिका पुष्पलता गायकवाड यांच्या प्रेरणेतून 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आला आहे.

विध्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक पुण्यतीथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गीते, भाषणे, पोवाडा सादर करून या उपक्रमाची सुरुवात केली असून विकास पाटकर सरांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. याप्रसंगी शिक्षक विजयकुमार जाधव यांनी वि ना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित माहिती कथन केली.

या पंधरवाड्याच्या आयोजनामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत निर्माण आहे.

Previous Article

जिजामाता विद्यालयातील विद्यार्थिनींनी गिरवले सुरक्षिततेचे धडे

Next Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ८

You may also like