आशिफा प्रकारणामधील तिसरी बाजू

Author: Share:

आशिफा प्रकारणामधील दुसरी बाजू मांडल्यावर दोन्ही बाजुनी प्रतिक्रिया आल्या.. समर्थक बाजूने याही आधी आणि वर्तमान काळात अशा घडलेल्या घटनांचा दाखला देऊन आताही अगदी अशाच घटना घडत असताना देखील फक्त या घटनेत मंदिर आणि हिंदू हा शब्द आल्यानेच आम्हाला झोडपल जातंय असा सूर लावला.. बऱ्याचप्रमानात ते वास्तव आहेच, आणि त्याच अनुषंगाने लोकांची मानसिकता बनविण्यासाठीच तो प्रकार सुरू होता.. पण “त्यांना काहीच बोलला नाही मग आम्हालाच का बोलता?” असा प्रचार देखील त्यांचं चालत तर आमचंही चालवून घ्या, या पद्धतीचा वाटतो, त्यामुळे जास्तच गोंधळ आणि नकारात्मक भावना वाढीस लागते.. सदर प्रॉपगंडाचा मुख्य उद्देश तोच आहे, त्यामुळे घाईघाईने किंवा भावनेच्या भरात हे प्रकरण असे सादर करणाऱ्यांचा जो उद्देश आहे, तो तडीस जाईल असे काहीच करू नये..

विरोधी बाजूही अगदीच मजेशीर होती, फक्त लेखाचा रोख जे सुरू आहे, आणि जे त्यांना वाटतंय त्याच्या विरोधी आहे, या इतक्याच भांडवलावर त्यांनी आरोप सुरू केले.. म्हणजे हा प्रकार म्हणजे आरोपीना निर्दोष ठरवण्याचा प्रकार, भाजपची बाजू घेणे, किंवा एकाने विचारले की समजा आशिफाच्या ऐवजी तुमच्याच घरातील एखाद्या लहान मुलीवर असा प्रकार घडला असता तर तुम्ही असेच मत मांडले असते का? तर काहींनी यालाही या परिस्थितीला हिंदुत्ववादीच जबाबदार असल्याचा शोध लावून भारतात विनोदवीरांची कमतरता नसल्याचे दाखवून दिले..

काहींच्या बाबतीत उत्तर देणे गरजेचे म्हणून आधी तेच सांगतो, समजा ती मुलगी आशिफा नसती, माझ्या घरातीलच एखादी अल्पवयीन मुलगी असती तर?तरीही मी हीच बाजू मांडली असती.. राजकीय अथवा सामाजिक स्वार्थासाठी मुद्दामहून गोवल्या गेलेल्या व्यक्तींना या प्रकरणात कठोर शिक्षा झाली, आणि खरा आरोपी मोकाट राहून तेच दुष्कर्म करण्यासाठी मोकळाच राहिला तर त्या निष्पाप पोरीला मिळालेला न्याय हा खरंच न्याय थोडीच असेल? मग मी हे मांडतो आहे ते सत्यच आहे कशावरून? यात भाजपचे समर्थन होतच नाही कशावरून? यासाठी तिथली परिस्थिती आणि आधी घडलेल्या घडलेल्या घटनेची माहिती असणे जास्त गरजेचे.. त्यातील एकच घटना सांगतो.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


दिनांक 29 मे 2009 रोजी बोनगाव, शोपिया जिल्हा येथून निलोफर जान आणि असिया जान नामक दोन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे मृतदेह बोनगाव पासून काही अंतरावर मिळाले, आरोप झाला की सैन्यातील जवानांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या केली.. प्रकरण पोलिसांनी हाताळून त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय चाचणी करून अहवाल दिला की दोघींचा मृत्यू तर झालाय पण हत्या किंवा बलात्कार यापैकी काहीही घडलेलं नाही. याविरोधात मग हिंसक प्रदर्शने आणि जाळपोळ झाली, कर्फ्यू लावण्यात आला जो चाळीस दिवस सुरूच होता, या काळात 900 हुन अधिक लोक जखमी झाले, मग तत्कालीन ओमर अब्दुल्ला सरकारने याप्रकरणी नवीन चौकशी पथक या प्रकरणाच्या चौकशीसाठी निर्माण केलं, आधी ज्यांनी उत्तरीय तपासणी केली त्या डॉक्टरांना निलंबित केलं आणि नवीन समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला, त्या अहवालानुसार त्या दोन्ही मुलींवर बलात्कार होऊन त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झाल आणि पुन्हा सैन्य विरोधी आंदोलन सुरू झाली..

तेव्हा तिथल्या स्थानिक बार असोसिएशनने हे प्रकरण CBI कडे हस्तांतरित करावे अशी जोरदार मागणी लावून धरली आणि CBI चौकशी झाली, CBI अधिकाऱ्यांनी पुन्हा मृतदेह बाहेर काढून DNA आणि लैंगिक चाचणीसाठीचे नमुने देशातील चारही लॅबना पाठवले, साधारण दोन महिन्यांनी त्यांचा अहवाल आला की त्या दोघींवर ना लैंगिक अत्याचार झाला ना त्यांची हत्या झाली,त्यांचा मृत्यू पाण्यात पडून झाला..

याचप्रकारणात पुढे खुलासा झाला की दुसर्यावेळी जी चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली होती, त्यात बरेचसे तपास अधिकारी हे फुटीरतावादी संघटनेशी संबंधित होते, आणि उत्तरीय तपासणी करणारे डॉक्टर हे मजलीस मशावरात उपाध्यक्ष मुहम्मद शफी खान यांच्या संपर्कात होते, ही संघटना स्वतंत्र काश्मीर होण्यासाठी कार्यरत आहे.. त्यांच्याच दबावाखाली दुसऱ्या चौकशीत डॉक्टरांनी त्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होऊन त्यांची हत्या झाल्याचा रिपोर्ट सादर केला होता.. ही गोष्ट जेव्हा हे प्रकरण CBI कडे हस्तांतरण होऊन त्या मुलींच्या अवयवाचे नमुने CBIने तपासणीसाठी लॅबला पाठवले होते तेव्हा त्यातील डॉक्टर आणि मुहम्मद शफी खान यांच्यातील संभाषण जे पोलिसांनी हस्तगत केलं त्यातून निष्पन्न झालं की मुहम्मद शफी खानने हवे तसे रिपोर्ट मिळवण्यासाठी डॉक्टरांशी संगनमत केलं होतं.. ( हे पूर्ण प्रकरण, चार्जशीट आणि ते संभाषण नेटवर मिळू शकेल)

थोडक्यात सांगायचे झाले तर 2009 साली केंद्रात आणि काश्मीरमध्ये दोन्हीही ठिकाणी भाजप सत्तेत नव्हती, तरीही अशी प्रकरणे हाताशी धरून त्यावेळेस लष्कराला बदनाम करून फुटीरतावादी शक्ती आपले हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला गेलेल्या.. तत्कालीन इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील आधी हे प्रकरण उघड झाल्यावर सैन्यावर जोरदार आगपाखड केली होती त्यात ND टीव्ही आघाडीवर होतीच.. वृत्तपत्रे देखील हेच वृत्त देत होते, पण जे CBI चौकशीत निष्पन्न झाले त्याचा मात्र ओझरता उल्लेख करून आधी आपण जे शेण खाल्लं, सैन्याला बदनाम केलं त्याबद्दल मात्र एका शब्दाने देखील माफी मागितली नाही..

हे जम्मू काश्मीरमधील पोलीस प्रशासनाचे वास्तव आहे.. स्थानिक तपास यंत्रणेवर आमचा विश्वास नाही हे जेव्हा स्थानिक हिंदू ,हिंदू एकता मंच सांगतो,हे प्रकरण CBI ला हस्तांतरित करण्याची मागणी करतो,आणि मग त्यातून भले कोणीही दोषी ठरो, त्याला कठोरातील कठोर शिक्षा करा असे सांगतो तेव्हा त्यांच्या मागणीत निश्चितच काही तथ्य असते.. पन मीडिया वाक्यम प्रमाणम मानणाऱ्या आपल्याच देशातील काही बुद्धिजीवी लोकांनी अशी मागणी म्हणजे आरोपींचा बचाव असा कांगावा सुरू केला.. का? कारण यातून वास्तव समोर आले तर यांनी आजवर घेतलेली मेहनत वाया जाईल म्हणून? मग आता सांगा, निष्पक्ष CBI चौकशीची मागणी करणे म्हणजेच आरोपींचा बचाव करणे म्हणजे भाजपला अनुकूल मागणी करणे कसे असू शकते?

तरीही पाच मिनिटे अस मानू की होय ते असेच आहे,स्थानिक तपास यंत्रणा दिशाभूल करत आहेत, मुद्दामच जातीय तणाव निर्माण होईल असे वर्तन करत आहेत, याची CBI किंवा निष्पक्ष चौकशी होऊन जो खरा आरोपी असेल त्यालाच शिक्षा व्हावी अशी मागणी करणारे आशिफाचे काका देखील हिंदू आहेत की भाजप भक्त?


मंदिरात एका मुलीला लपवणे शक्य नाही. ही बातमी वाचा: https://m.hindustantimes.com/india-news/kathua-rape-case-not-possible-to-hide-the-girl-in-temple-say-village-women/story-LgcNgyNrMgYArVcPcZ6B2H_amp.html


एबीपीचा हा रिपोर्ट सुद्धा पाहा: https://www.facebook.com/yogesh3633/videos/10215519933649363/


सोबतच एक व्हिडिओ जोडलेला आहे, जो जम्मूतील स्थानिक मीडियाने मागील महिन्यात प्रदर्शित केला होता, ज्यात पीडित मुलगी आशिफाच्या काकांची प्रतिक्रिया आहे.. आणि हो, त्यांच्या बाबतीत पण दोन्हीबाजुनी चुकीची माहिती पेरणे सुरू आहे.. एक गट म्हणतो की स्थानिक हिंदू समुदायाच्या दहशतीमुळे त्यांना गाव सोडून जाणे भाग पडले, तर हिंदुत्ववादी म्हणत आहेत की ते काका आधीच हत्या झाल्याचे समजताच गायब झाले.. अर्थातच याबाबतीत दोन्हीही बाजू पूर्णतः खोटं बोलत आहे,ते कसे? आणि कशावरून? याबाबतीत त्यांचीच प्रतिकिया बोलकी आहे, ती नक्कीच ऐकावी..

त्यात ते म्हणतात की “हिंदू गुजरात करणार म्हणतात आणि मुस्लिम पाकिस्तान झिंदाबाद म्हणतात अशी अफवा फैलावली जात आहे, याला कुठलाही संदर्भ नाही, दोन्ही बाजूना भडकवण्याची रणनीती सुरुय,आणि स्थानिक पोलिसांच्या तपासावर आमचा काडीमात्र विश्वास नाही.. *त्यांना गोठ्यात पडलेला आशिफाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सात दिवस लागले* ” हे मनाची गोष्ट नाही, ते स्पष्ट बोलले आहेत.. आणि पोलिसांनी चार्जशीट काय केलीय? तर त्या मुलीला 8 दिवस मंदिरात डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केला आणि मृतदेह जंगलात फेकला, मग तिचे काका तिचा मृतदेह गोठ्यात सात दिवस पडलेला म्हणतात, स्थानिक लोकही हेच सांगतात, मग आशिफा बेपत्ता झाली 10 जानेवारीला, तिचा मृतदेह सापडला 17 जानेवारीला आणि पोलीस चार्जशीट मध्ये नोंदवतात की तिला आठवडाभर मंदिरात बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केला.. तिच्या काकांचे आणि स्थानिक गावकऱ्यांचे ऐकले तर तिची हत्या ती सापडलेल्याच्या आठवड्यापूर्वीच झाली होती सांगतात, मग नेमका बलात्कार झाला कुठं आणि कसा? जर तिचा मृतदेह आठवडाभर गोठ्यातच होता तर?


सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा: https://www.facebook.com/yogesh3633/videos/10215514402631091/


आता पोलीस चार्जशीट मध्ये नोंदवतात ते मंदिर, ज्याच्या तळघरात त्या मुलीला बंधक बनवलं होत आणि ज्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार झाला, त्या मंदिराला मुळातच तळघर नाही, जेमतेम 300 स्क्वेअर फूटच हे मंदिर आहे, ज्याला तीन दरवाजे आहेत, त्याच मंदिराच्या अगदी जवळ झाडाला लागूनच पीरबाबांची समाधी आहे, जिथं हिंदू मुस्लिम दोन्हीही नतमस्तक होतात, सायंकाळी तिथे हिंदूच दिवाबत्ती करतात..

बिना देवी, आणि अंजना शर्मा या त्याच भागात राहणाऱ्या भाविक रहिवासी आहेत, ज्या दररोज त्या मंदिरात जातात, त्यातील बिना देवी म्हणतात की मी रोजच सकाळ सायंकाळ मंदिरात दर्शन करण्यासाठी जाते, माझ्याप्रमाणेच कित्येक महिला रोज त्या मंदिरात जातात, जेमतेम 300 स्क्वेअर फुटच्या मंदिरात मुळात कोणाला लपवता येईल अशी जागाच नाही, तर मग तिथे कोणाला लपवता कसे येईल?आणि जिथे सतत वर्दळ असते तिथे बलात्कार कसा होईल?

या प्रकरणात मुद्दामच मंदिराचा उल्लेख करून हिंदू मुस्लिम वाद जम्मूत पण पेटवण्यासाठी जम्मू बाहेरील लोक मुद्दाम अशी चुकीची माहिती पसरवत आहेत असे स्थानिक गावकरी सांगतात, ज्यात हिंदूही आले बकरवाल मुसलमान देखील आले..

लेखक: श्री. योगेश देशपांडे


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

गणेशविद्या

Next Article

ती

You may also like