आशीष शेलार यांनी शिवसेनेला फटकारले; मीरा-भाईंदरकरांनी “लबाडाघरचे आमंत्रण” नाकारले.

Author: Share:

मुंबई: मिरा-भाईंदरमध्ये विजयी झाल्यानंतर आशीष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेनेला फटकारले आहे. मीरा-भाईंदरकरांनी “लबाडाघरचे आमंत्रण” नाकारले, अशी टीका त्यांनी केली आहे.

वाचा आशीष शेलार यांची ट्विट

त्याचसोबत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत लिहिले की पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपचा दणदणीत विजय करून स्विकारले! मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!. मुंबईत दमछाक, पालघर,कल्याण-डोंबिवलीत अडले, पनवेलमधे भोपळा एमएमआरमधे पाचव्यांदा मतदारांनी उघडा केला “काहींच्या” ताकदीचा अस्सली चेहरा, अशा प्रकारची कडक ट्विट करत त्यांनी विरोधकांना धारेवर धरले आहे. मिरा-भाईंदरच्या विजयामुळे भाजपमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

Previous Article

मिरा-भाईंदर; मनसेचे इंजिन रुळावरुन घसरले, राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले

Next Article

मिरा-भाईंदर महापालिकेत कमळ फुललं

You may also like