असिफा बलात्कार: हिंदू असण्याची लाज वाटते का?

Author: Share:

गेले एकदोन दिवस एक प्रकरण फार गाजत आहे.. दोन्ही बाजूनी आरोपप्रत्यारोपांची राळ उडते आहे.. ते प्रकरण म्हणजे कठूआ येथे झालेले आशिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीवर सलग आठ दिवस सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली गेली..

सदर घटना घडली ती जानेवारीत, म्हणजे दहा जानेवारीला ती लहानशी पोरगी बकऱ्यांना चारायला म्हणून जंगलात गेली आणि बेपत्ता झाली, बारा जानेवारी रोजी तिचे वडील महंमद युसूफ यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सतरा जानेवारी रोजी तिचा मृतदेह रासम्मा नामक गावाच्या जंगलात आढळून आला. 23 जानेवारीला राज्य सरकारने हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करून विशेष अन्वेषण विभागाची स्थापना केली.. पहिली अटक सांझीराम नामक व्यक्तीला 20 मार्च रोजी झाली आणि 9 एप्रिलला आरोपपत्र दाखल झाले..

आता पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ही घटना नेमकी नोंदवली कशी आहे हे पाहू..

कठूआ परिसरात वास्तव्यात असणाऱ्या बकरवाल समाजात भीतीचे वातावरण निर्माण व्हावे, आणि त्यांनी हा भाग सोडून स्थलांतरित व्हावे म्हणून सांझीराम नामक एका देवस्थानचा प्रमुख असणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या अपहरणाचा आणि हत्येचा कट रचला, त्यासाठी त्याने आशिफाला हरवलेले घोडे शोधून देण्याचे आमिष दाखवून जंगलात नेले आणि तिथे आधीच असणाऱ्या लोकांनी तिला भांग पाजून मंदिरात बंदिस्त केले.. ती आरडाओरड करू नये म्हणून तिला मादक द्रव्य पाजण्यात आले.

त्यानंतर सलग पाच दिवस सांझीराम आणि सोबत्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर बाहेरगावी शिकत असणाऱ्या सांझीरामच्या मुलाला ‘कर्तव्य’ पार पाडण्यासाठी बोलावण्यात आलं. तो आल्यावर त्यानेही बलात्कार केला आणि नंतर तिला जंगलात फेकून दिले आणि ती जिवंत राहू नये यासाठी तिच्या डोक्यात एक मोठा दगड घालण्यात आला.. या प्रकरणात सांझीराम, विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरीया, सुरेंद्र वर्मा, प्रवेश कुमार ,सांझीरामचा मुलगा विशाल जंगरोटा आणि सांझीरामचा पुतण्या या सर्वांना अटक करून आरोपपत्र दाखल करण्यात आलेल आहे..

ही घटना घडली जानेवारीत फेब्रुवारीत आणि मार्चमध्ये आरोपीच्या विरोधात आणि तथाकथित (तथाकथितच का आणि कसे? हे पुढे येईलच) समर्थनार्थ मोर्चे निघाले, चक्का जाम करण्याचा इशारा दिला गेला आणि तेव्हापासून त्या परिसरात धारा 144 लागू करण्यात आलेली आहे..

इतका वेळ होऊनही याबाबतीत सजग मीडिया मात्र एप्रिलमध्ये जागी झाली,कारण साफ आहे जानेवारी फेब्रुवारी विद्यमान सरकारच्या विरोधात आगपाखड करायला कोरेगाव भीमा मुद्दा होता, मार्चमध्ये अट्रोसिटी कायदे बदलाविरोधात आंदोलन आणि दंगली हा मुद्दा होता.. ते संपल्यावर मग एप्रिल कसा काढावा? म्हणून हे प्रकरण लावून धरले.. मीडियाने प्रकरण लावून धरल्यावर मात्र कित्येकांना जाग आली, बॉलिवूड, बाकी प्रतिथयश व्यक्ती, सेलेब्रिटी, विचारवंत, सोशल मिडियावरील लोक यांना हे प्रकरण समजलं.. खरेतर त्याचवेळेस काही वृत्तपत्रात ही बातमी आलेली, आंदोलन, प्रतिआंदोलन यांचीही बातमी आलेली, जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचेही ट्विट होते.. मात्र तेव्हा या प्रकरणाला भाव द्यायचा नव्हता, कारण सरकार विरोधात त्यातल्यात्यात हिंदुत्ववादी लोकांच्या विरोधात आगपाखड करायला बराच मालमसाला होता..


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


मग त्यातून काहींना देवच अस्तित्वात नसल्याचा नव्याने जुनाच साक्षात्कार झाला, तर काहींना हे हिंदू रेपिस्ट कल्चर वाटले,काहींना यात प्रभू रामचंद्राना ओढण्याचा नालायकपणा सुचला.. असो…

बलात्कार हा भारतीय समाजाला लागलेला रोग आहे, त्या रोगाचा जाणतेअजाणतेपणी फैलाव करणारेच घटक याबाबतीत बलात्कार झाला त्याबतीत कमी पण हिंदुनी एका मुस्लिम अल्पवयीन मुलीवर तोही मंदिरात बलात्कार केला म्हणून वरून दुःखी पण आतून खुश दिसले..

आता या सर्वांच्याच समोर प्रामाणिक तथ्ये मांडण्याची म्हणूनच गरज निर्माण झाली.. आता इथून पुढं वाचताना हे लक्षात ठेवावे,की बलात्कार तो बलात्कारच मग तो कुणीही कुणावरही केलेला असो, तो निंदनियच असतो.. अगदी माझ्या जीवावर उठलेल्या माझ्या कट्टर शत्रुच्याही घराच्या कोणत्याही स्त्रीवर असा प्रसंग गुदरला, तरीही मी याचा निषेधच करेन.. त्याबाबतीत त्याला न्याय मिळावा, विकृत लोकांना शासन मिळावे यासाठी त्याची साथही देईन.. वयं पंचधीशतकम हीच शिकवण माझ्या हिंदू धर्माने, संस्कृतीने आणि माझ्या देवाने आणि त्यांच्या जास्त जवळ असणाऱ्या संत महात्म्यांनी दिलेली आहे..

पण सोबतच जे दिसत किंवा जे दाखवलं असत ते तसेच आहे यावर भाबडेपणाने विश्वास ठेवावा हेही सांगितले नाही.. कोणत्याही गोष्टीला, घटनेला दोनच बाजू असतात, एक चूक एक बरोबर, पण बऱ्याचदा चुकीच्या बाजूला बरोबर बाजू म्हणूनच दाखवलं जात, त्याप्रमाणे वातावरण निर्मिती केली जाते आणि बरोबर बाजू मात्र कोसो दूर जाते.. अशावेळेस मात्र हे सत्य शोधणे अत्यंत कठीण होते.. खरे तर हे सत्य देवबिव न मानणाऱ्या नास्तिक ज्यांचा बुद्धीवर विश्वास आहे त्यांनीच करायला हवं, पण त्यांचीच बुद्धी शेण खायला जात असल्याने त्यांचा दिसणाऱ्या गोष्टीवर लगेच विश्वास बसतो, मग ती गोष्ट त्यांना फसवते आहे, हेच त्यांच्या बुद्धीला समजत नाही. लपवलेले सत्य, बातमीमागील बातमी समोर आणण्याचे काम मग आमच्यासारख्या श्रद्धाळू, मन आणि बुद्धी दोन्हींचा वापर करून तर्कसंगत निष्कर्ष काढणाऱ्या लोकांना करावं लागतं..

आता एक एक मुद्दा पाहू..

  • पहिला मुद्दा : गुन्ह्याचे मोटिव्ह..

बकरवाल समाज आपल्या परिसरात राहू नये, त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले, काही लोकांच्या मतानुसार बकरवाल समाजाचा गोहत्येत सहभाग होता असा संशय स्थानिक हिंदूंना होता, म्हणूनच हिंदू गावकऱ्यांचा त्यांच्यावर राग होता.. यासाठीच त्यांनी बकरवाल समाजच्या विरोधात वातावरण पेटवले, त्यांची वीज आणि पाणी बंद केले,आणि अखेरीस त्या निष्पाप लहान मुलीची हत्या केली..

आता हे मोटिव्ह खरेच असू शकते का? बकरवाल समाज हा फिरता समाज आहे, हिवाळ्यात पावसाळ्यात काश्मीर गाठणे, तिथे लंगरमध्ये काम मिळवणे, अमरनाथ यात्रेकरूंना घोडे पुरवणे हे काम तिथं तो करतो, तिथून उन्हाळ्यात तो जम्मूला येतो आणि शेतात बकऱ्या बसवणे आणि इतर कामे करून गुजराण करतो.. चार महिन्यासाठी पण त्यांनी इथं राहू नये हे मोटिव्ह असू शकत? असेल तर का? कसे? त्याला काही आधीचे किंवा वर्तमानकालीन संदर्भ आहेत? गोहत्या हा मुद्दा देखील डाव्या मीडियाने शिताफीने यात घुसवला आहे.. कारण जेव्हा हे प्रकरण होऊन याबाबतीत मोर्चे प्रतिमोर्चे निघाल्यावर तिथल्या एका स्थानिक टीव्ही चॅनलने काहींची मुलाखत घेतली, त्यात त्या अल्पवयीन संशयित आरोपीची मामी, अत्याचारित मुलीची आई आणि काका तसेच शेजारी सोबतच गुज्जर बकरवाल समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अन्वर चौधरी तसेच हिंदू एकता मंचचे अध्यक्ष वकील विजय यांच्या प्रतिक्रिया घेतल्या..

त्यात आशिफाचे काका यांनी सांगितले की इथे कधीच हिंदू मुस्लिम हा वादच निर्माण झालेला नाही, कित्येकवर्षं आम्ही इथं एकत्र राहतो आहोत, आमच्या बकऱ्या हिंदूच्याच शेतात बसवल्या जातात, त्यांच्याच जमिनीवरील चारा खातात, एकमेकात तणावाचे वातावरण निर्माण होईल असं कोणतेही कृत्य दोन्ही समाजातील लोकांनी कधीही केलेलं नाही.. लोक म्हणतात की हिंदुनी आमची वीज पाणी बंद केली, पण जेव्हापासून आम्ही इथे राहतो आहोत तेव्हापासून आजवर आम्हाला कोणत्याही सरकारने वीज आणि पाणी दिलेलेच नाही तर ते बंद कस करणार? सरकारी अधिकारी आणि नेते हे प्रकरण झाल्यावरच इथं आले तोवर त्यांना या भागाची माहितीच नव्हती, तर वीज पाणी बंद कस होणार? पुढे ते म्हणले, बाहेरचे काही लोक मात्र येतात, ते हिंदूंना भडकवतात, आम्हालाही भडकवतात, हिंदू गुजरातसारखी अवस्था इथेही करू म्हणतात तर मुस्लिम पाकिस्तान इथेही बनवू म्हणतात, पण त्यातील कोणीही इथले स्थानिक नाही. सर्व लोक बाहेरूनच येतात.. यावरून लक्षात येईल की हिंदू आणि बकरवाल समाजात वैमनस्य आहे, त्यांनी हा भाग भयाने सोडून जावं म्हणूनच हे बलात्कार आणि हत्याकांड घडवलं असावं हा दावाच मुळात संशयास्पद वाटतो..

  • दुसरा मुद्दा: गुन्हेगार आणि गुन्ह्याचे स्वरूप..

FIR मध्ये अस लिहिण्यात आलेलं आहे की सांझीराम आणि साथीदारांनी त्यामुलीला जंगलातून पळवून आणले, तिला मंदिरात लपवून ठेवले, तिला मादक द्रव्ये दिली आणि पूजा वगैरे करून तिच्यावर बलात्कार करून तिला मारले.. आता यातील भले जरी मोटिव्ह संशयास्पद असले तरी विकृती म्हणून किंवा वासनांध वृत्ती म्हणून का होईना? पण अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या होऊ शकते,आपल्याच देशात घडलेल्या कित्येक घटना याला प्रमाण आहेत.. बर मंदिरात बलात्कार होऊ शकतो का?नक्कीच होऊ शकतो.. याही आधी अशीच एक घटना घडलेली आहे.. पण बलात्कार करण्याआधी पूजा? अशी कोणती पूजा कोणत्या शास्त्रात आहे, हे शोधायला गेल्यावर माझ्या आजवरच्या वाचनातून आणि तंत्रमार्गातील व्यक्तींशी झालेल्या बोलण्यातून इतकं समजत की शाक्त, कौलांतक, अघोर वगैरे पंथात काही तंत्र उपासनेत पंच मकार अर्थात मांस, मद्य,मदिरा, मुद्रा आणि मैथुन याला महत्व आहे.. पण आजकाल हा तंत्रमार्ग लुप्त झालेला आहे.. आणि यातही कुठेच मैथुन जरी असले तरी स्त्रीला बंधक बनवून तिच्यावर जबरदस्ती संभोग करून तिला ठार मारणे असला प्रकारचं नाही.. त्यामुळं पूजा केली, वगैरे गोष्टी निव्वळ प्रॉपगंडाचा भाग आहेत..

आता तिला मंदिरात ठेवण्याचा मुद्दा.. कॉमेंट बॉक्समध्ये एक व्हिडिओ देतो, ज्यात ती घटना घडल्याचे मानले जाते, पोलीस तपासात देखील नाव आहे ते मंदिर आणि त्याचा परिसर दिसू शकेल.. स्थानिक हिंदूंच्या भरवस्तीत ते मंदिर आहे, बर त्या मुलीला अपहरण करून आणलं जात, त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नाही, तिला तिथं आठ दिवस ठेवलं जातं, रोजच्या येण्याजाण्याच्या मंदिरात असे काही घडत हे आसपासच्या लोकांना समजत नाही, पुन्हा तिला ठार मारायला नेलं जात तेही कोणी पाहिलेलं नाही.. यालाही कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे अजूनतरी समजलेलं नाही.. विचार करा.. भरवस्तीत हे प्रकार घडतात पण वस्तीला समजत नाही याला दोन कारणे असू शकतात.. एक म्हणजे संपूर्ण वस्तीच महामुर्ख आहे अथवा या प्रकाराला सर्वच लोकांचा पाठिंबा होता म्हणूनच हे कोणीही पाहुन पहिल्यासारखे केलं.. ही दोन्ही कारणे कोनाकोणाच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटण्यासारखी आहेत? जाणतेअजाणतेपणी ही घटना मंदिरातच घडली हे ठामपणे सांगणारे आणि लिहिणारे तसेच त्यावर काहीही विचार न करता, पोलीस रिपोर्टमध्ये तसच नोंदवलं आहे किंवा मीडियाने तेच छापलं आहे म्हणून आंधळेपणाने त्यावर विश्वास ठेवून तिथल्या स्थानिक लोकांना असे लोळ एकतर ठार वेडे किंवा गुन्ह्याला पाठीशी घालणारे ठरवत नाहीत का? तेव्हा या मुद्द्यावर कितपत विश्वास ठेवावा ज्याचंत्यानं ठरवावं..

बाकी साध्वी प्रज्ञासिंग आणि बाकी लोकांच्या बाबतीत पण अशीच घटना घडलेली आहे, आरोपपत्रात वेगवेगळे आरोप ठेवले गेले,पण त्यातील एकही आरोप आजवर सप्रमाण सिद्ध करता आलेला नाही.. इतकं लांब कशाला जावं? आपल्याच आसपास बघा, कॉलेजमधील मारामारी, किंवा गल्लीतील मारामारी किंवा राजकीय वादातून झालेली मारामारी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते तेव्हा एक पक्ष किंवा दोन्हीही पक्ष विरोधी पक्षातील लोकांनी सोन्याची वस्तू किंवा पैसे काढून घेतल्याची पण तक्रार देते, त्याच्यावरून दरोड्याचा गुन्हा दाखल होतो,अर्थातच तो कोर्टासमोर टिकत नाही.. मग जे FIR मध्ये लिहल गेलेलं आहे, तेच अंतिम सत्य आहे मानून त्याच अनुषंगाने विचार करणार असू तर आपला विचार योग्य दिशेने जाण्याची शक्यता तशी कमीच आहे..

  • तिसरा मुद्दा :- गुन्ह्याच मोटिव्ह संशयास्पद आहे,

FIR संशयास्पद आहे, मंदिरामध्येच त्या निष्पाप पोरीला डांबून ठेऊन बलात्कार झाला याबाबतीत पण संशयाला वाव आहे,मग कोणत्या तर्काच्या आधारे आजवर जी अटक झाली ती झाली?

याबाबतीत हिंदू एकता मंच ज्यांनी आरोपींना सोडवण्यासाठी मोर्चे काढले अस म्हटलं जातं, त्यांचे अध्यक्ष विजय यांच्याशी झालेल्या चर्चेतून उत्तर मिळेल.. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आशिफाच्या बलात्कार आणि हत्येची घटना घडली, तेव्हा सर्वांनीच त्याचा निषेध केला.. त्यावेळी तिला न्याय मिळावा म्हणून जो पहिला मोर्चा निघाला तेव्हा त्यात त्या बालिकेला न्याय मिळावा ही मागणी घेऊन हिंदू एकता मंचदेखील सामील झाला होता.. पण आशिफाच्या हत्येच्या चौथ्या दिवशी काही बाहेरील लोक आले त्यांनी दीपक खजुरीया आणि सांझीराम हेच याचे सूत्रधार आहेत आणी त्यांना अटक करा अशी मागणी केली, त्यानंतर त्यांनी चक्का जाम आणि हिंसक आंदोलन केले, त्याचवेळेस स्थानिक मुस्लिम आमदारांनी देखील पोलीस प्रशासनावर दबाव टाकून याला वेगळे वळण दिले..

आधी पोलिसांनी ज्या अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते, त्याने दिलेल्या जबानीवर पोलीस दोन महिने आश्वस्त होते, की त्यानेच हे दुष्कर्म केलेय, आता ते मारुनमुटकून लिहून घेतलेलं आहे की वास्तव आहे, याबद्दल आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे.. पण स्थानिक राजकीय नेते आणि हिंसक आंदोलने यांच्या दबावामुळे बाकीच्या लोकांना अटक झाली..हे मात्र वास्तव आहेच..

  • चौथा मुद्दा : ‘हिंदू एकता मंचच्या लोकांनी आरोपींना सोडून द्यावे ही मागणी केली’

या आंदोलनाचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे, तोही कॉमेंटबॉक्समध्ये देईन.. त्यात त्यांनी स्पष्ट तीन मागण्या केलेल्या आहेत.. पहिली म्हणजे रोहींग्या मुस्लिमांना त्याभागात वसवू नका, दुसरी मागणी आशिफा केस CBI कडे सोपवा कारण स्थानिक पातळीवर सूडाच राजकारण होत आहे आणि तिसरी मागणी हिंदू समाजावरील अत्याचार रोखा.. पहिल्या आणि तिसऱ्या मागणीबद्दल पुढे बोलू.. पण ही जी मागणी आहे ज्यात त्यांचं मत आहे की पोलीस आणि तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली येऊन निर्दोष लोकांना अडकवत आहेत, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी निष्पक्षपाती व्हायला हवी.. ती CBI करुदे.. समजा त्यात आता ज्यांना आरोपी केलेलं आहे, तेच दोषी सिद्ध झाले तर थोडीच हे त्यांना विरोध करणार आहेत? तो व्हिडीओ महिन्यांपूर्वीचा आहे, त्यात त्यांची मागणी स्पष्ट समजते आहे. मग का म्हणून मीडियाने हिंदुत्ववादी संघटना आरोपींना पाठीशी घालताय असा दूषप्रचार सुरू केलाय? याच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करणे म्हणजे आरोपीना सोडण्याची मागणी करणे हे कोणत्या तर्काच्या आधारे योग्य ठरते? हीच मागणी अगदी आशिफाच्या घरचे करतात, बकरवाल समुदायासाठी काम करणारे समाज सेवक चौधरी पण करतात तेव्हा मात्र ती योग्य मागणी, पण हीच मागणी हिंदू एकता मंच करतो तेव्हा हिंदुत्ववादी गुन्हेगारांना पाठीशी घालतायत? बघा पटतंय का..

  • पाचवा मुद्दा:- मग हे बाहेरचे लोक म्हणजे नेमके कोण लोक?

अर्थात बाहेरचे म्हणजे नेमके कोण लोक हे कोणीच स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी थोडा विचार करून याचा अंदाज मात्र नक्कीच लावता येईल.. बाहेरचे म्हणजे एकतर पाकिस्तानी ISI एजंट किंवा काश्मीर मधील फुटीरतावादी किंवा रोहींग्या.. RAW च्या 2014 च्या रिपोर्ट नुसार त्या भागात ISI सक्रिय असल्याचे पुरावे आहेत, तसेच जे काश्मीरमध्ये घडलेलं आहे तेच जम्मूत घडवण्याच्या दृष्टीने काश्मीरमधील फुटीरतावादी देखील असू शकतात आणि हिंदू एकता मंचचा विरोध रोहींग्या मुस्लिमांच्या पुरताच मर्यादित आहे.. त्यांचं आणि बकरवाल समाजाचं काहीच वितुष्ट नाही, असे असताना मुद्दामच याप्रकारे दोन्ही समाजात आग लावून आपले बस्तान बसवण्याचा देखील हा प्रकार असू शकतो.. रोहींग्या मुस्लिमांची संख्या वाढल्यापासून तिथे हिंदू स्त्रियांना राहणे मुश्किल झाले आहे, तिथून हिंदूंचे स्थलांतर होत आहे, याबाबतीत असणारी माहिती मीडियातून क्वचित मिळेल, पण काश्मीरमध्ये सेवा बजावलेल्या जवानांना याबाबतीत जरूर विचारा,याहून भयंकर माहिती मिळू शकेल..

शेवटी.. अगदी थोडक्यात.. कठूआमध्ये एका निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली गेली हे सत्य आहे.. पण या संदर्भातील माहिती आणि पोलीस तपास हा संशयास्पद आहे, CBI चौकशी होऊन कोणीही गुन्हेगार असो, कोणत्याही धर्माचा असो, आणि त्यांचा उद्देश कोणताही असो.. निष्पक्षपाती चौकशी होऊन, गुन्हे नोंद होऊन खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी.. सोबतच या प्रकरणाचे राजकारण करणारे, याचा प्रॉपगंडा फैलावणारे आणि त्यायोगे जसे काश्मीर अशांत केले तसेच जम्मू देखील अशांत करून आपले ईप्सित साध्य करू पाहणारे पडद्यामागील चेहरे उघड व्हायलाच हवेत..शेवटी जिथे स्त्रीचा आदर सन्मान होतो, तिथेच देवता वास करतात हाही माझाच धर्म सांगतो,”यत्र नार्यांतू पुज्यते,रमंते तत्र देवता”

ज्यांना हिंदू रेपिस्ट कल्चर वाटते, ज्यांना हिंदू असण्याची लाज वाटते त्यानी हेही कधीतरी पहावं..

लेखक: श्री. योगेश देशपांडे.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

नृशंसतेचा कडेलोट!

Next Article

नांदगाव-येथील महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

You may also like