कुणी अप्सरा वा देवगणांची तू मुलगी.
बेभान होऊन गातो तुजसाठी कलगी.
अशी पदर झुलवित वार्यामध्ये चालू नको.
असे अल्लड अवखळ बोल तू बोलू नको.
वार्यालाही आस तुझ्याशी करण्याची सलगी.
कुणी अप्सरा वा देवगणांची तू मुलगी…
कळ्या फुलतात तू ओठांचा गुलाब फुलविताना.
दिवस मावळतो तू नयन तुझे झाकताना.
शीतल देवी वा तू रतीस्वरुप ठिणगी?
कुणी अप्सरा वा देवगणांची तू मुलगी.
कविता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री