द क्युरीयस केस ऑफ अपोलो टायर्स

Author: Share:

अपोलो टायर्स ह्या शेअरने मागच्या आठ वर्षात ४५०% रिटनर्स दिले आहेत. २०१७ च्या फेब्रुवारीपासून आजपर्यंत त्याने ५०% रिटर्न्स दिले आहेत. अपोलो टायर्स रेकमंडेड स्मार्ट बाय आहे.

अपोलो टायर्स टायर्स बनवणारी कंपनी आहे. २०१६-१७ वर्षासाठी, अपोलोचा सेल्स ९९२३.६ कोटी होता, तर नेट प्रॉफिट ८०२.७ कोटी होते. कंपनीचे नेट पप्रॉफिट मर्जींग (नेट प्रॉफिट/सेल्स) ८% आहे, तर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन १३% आहे.  एवढ्या मोठ्या सेल्स साईझसाठी ८% प्रॉफिट चांगली फिगर आहे. डिसेंबर २०१७ मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू २६३४ कोटी आणि नेट प्रॉफिट २०३ कोटी होते. डिसेंबर २०१६ शी तुलना करता (इअर व इअर बेसिस) कंपनीचे प्रॉफिट वर्षभरात १०% ने वाढले आहे.

डिसेंबर २०१७ साठी कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा १४% राहिले आहे. कंपनीचे अर्निंग पर शेअर (प्रॉफिट/शेअर्सची संख्या) रु १५.७७ रुपये येते. कंपनीचे प्राईज अर्निंग (किंमत/ प्रॉफिट गुणोत्तर) २०.५७ येते. ह्या इंडस्ट्रीज प्राईज अर्निंग २०.३७ आहे. ह्याचा अर्थ इंडस्ट्री बेंचमार्कच्याच बरोबरीचे हे आहे. याचा अर्थ हा होतो, की कंपनीच्या वाढत्या आर्थिक ताळेबंदसोबत शेअरची किंमत वाढत जाईल.

इतर टायर्स कंपनीसोबत तुलना:

अपोलो टायर्सच्या स्पर्धक कंपन्या म्हणजे एमआरएफ, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, सिएट, जेके टायर्स, टीव्हीएस इ. कंपनीची मार्केट कॅप १५४३१ कोटी आहे, जी तिच्या त्याच्या खालच्या सीएट च्या दुप्पट आहे. कंपनीचा सेल्स एमआरएफ च्या १३२४५ कोटी नंतर दुसऱ्या स्थानी आहे. नेट प्रॉफिट च्या बाबतीत सुद्धा इंडस्ट्री मध्ये कंपनी एमआरएफ नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

मार्च २०१७ च्या बॅलन्स शीट नुसार कंपनीकडे ५२८० कोटीचे रिझर्व्ह्स आहेत, ह्यातही कंपनी एमआरएफ नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.कंपनीवर सद्ध्या १६०० कोटींचे कर्ज आहे.  कंपनीची असेट साईज ६३२७ कोटी आहे, जी एमआरएफ (९५०९ कोटी) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

एमआरएफची मार्केट कॅप अपोलोच्या दुप्पट म्हणजे २९७६० कोटी आहे. कंपनी सध्या १३९ कोटींच्या  हेल्दी बँक आणि कॅश रिझर्व्हस वर आहे.ह्याबाबतीत एमआरएफ सोडून इतर पिअर्सच्या पुष्कळ पुढे आहे.  एमआरएफ च्या एका शेअरची किंमत ७०,१७१ कोटी आहे. थोडक्यात, टायर इंडस्ट्रीज मध्ये एमआरएफ नंतर उभे राहू शकेल अशी अपोलो कंपनी गुंतवणूकदारांसाठी २७० ह्या किमतीत उपलब्ध आहे. कंपनीची बुक व्हॅल्यू रु १०४ आहे म्हणजेच ती बुक व्हॅल्यूच्या २.५x (२.५ पटीत)  उपलब्ध आहे. एमआरएफची मार्केट प्राईज बुक व्हॅल्यूच्या ३.५ पटीत, बाळकृष्ण इंडस्ट्रीज ३.१ पटीत, जेके २.४ आणि सिएट २.७ पटीत उपलब्ध आहे .

त्यामुळेच ती स्मार्ट बाय ठरते.

मागच्या तिमाहीत ८७ म्युच्यूअल फंड स्कीम्सने अपोलो टायर्स विकत घेतलेला आहे. कंपनीच्या टॉप १% शेअरहोल्डर्स मध्ये ८ म्युच्युअल फंड कंपन्या असून  त्यांच्या कडे अंदाजे १० कोटी समभाग आहेत. कंपनीने २०१५ आणि २०१६ मध्ये २००% तर २०१७ मध्ये ३००% डिव्हीडंड दिलेला आहे.

माहिती स्रोत: मनिकंट्रोल आणि बीएससी वेबसाईट

 www.apollotyres.com

http://www.moneycontrol.com/company-facts/apollotyres/rights/AT14#AT14

Previous Article

८ फेब्रुवारी 

Next Article

गरम दिवसांनंतर थंड हवेची झुळूक: सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून ३४४१७ वर बंद

You may also like