“रागाचे व्यवस्थापन”

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

‘मी फार रागीट आहे !’. ‘मला फार लवकर राग येतो !’. ‘त्या परिस्थितीत मी रागावयचं नव्हतं तर काय करायचं होतं?’. ‘मी रागवू नको तर काय करू?. ‘रागावल्याशिवाय माझे कामच होत नाही’. या सारखी वाक्य बोलून प्रत्येकजण आपल्याला येत असलेल्या रागाचे समर्थन करीत असतो. रागाने आपलेच नुकसान होणार आहे व राग हा शरीरास हानीकारक आहे हे एकाद्यावेळेस माहित असूनसुध्दा तो रागाचे बोट सोडण्यास तयार होत नाही.

     रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागवता देखील आपण आपले जीवन जगू शकतो.  ते कसे साध्य करावयाचे हे आपण बघणार आहोत.

            सर्वप्रथम माणसास राग का येतो?. त्या मागची कारणीमिमांसा जर आपण नीट समजुन घेतली तर त्याचे व्यवस्थापन करणे आपल्याला सहज सोपे जावू शकेल. माणसाला राग खालील काही कारणामूळे  येतो.

  • माणसाला जसे हवे असते तसे जेव्हा घडत नाही तेव्हा त्यास राग येतो.
  • आपण इतर लोकांबद्द्ल आपल्या मनात एक प्रतिमा बनवलेली असते. इतरांनी कसे असले पाहीजे?. त्यांनी आपल्याशी कसे वागले पाहीजे?. पण   प्रत्यक्षात लोकांचे आपल्याशी वागणे, आपल्याशी असलेला त्यांचा व्यवहार  हा   आपण आपल्या मनात तयार केलेल्या प्रतिमेशी  मेळ  खात नाही. जेव्हा  असे  घडते तेव्हा  आपण अस्वस्थ होतो व आपणास राग येतो.
  • आपल्या संबंधीत असलेल्या व्यक्ती जेव्हा आपल्या इच्छेनूसार  वागत नाहीत तेव्हा आपल्याला राग येतो.

   ४. मागील काही अप्रिय घटनेबध्दल आपल्या मनात चाललेलं द्वंद्व/ युध्द

       ५. इतरांना बदलण्यासाठी चाललेला प्रयत्नात जेव्हा अपयश येते   तेव्हा आपल्याला राग  येतो.

   ६.इतरांना खुश करण्यासाठी एखादी गोष्ट आपण आपल्या मनाविरूध्द  करतो. तेव्हा देखील  आपल्याला राग   येतो.

     आपण राग येण्याची कारणे बघितली. आता याचे व्यवस्थापन कसे  करावयाचे व रागापासून स्वतःची कशी सुटका करून घ्यावयाची हे पाहूया.

१.     सर्व प्रथम आपल्याला हे मान्य करावयास हवे की मला राग येतो व ही एक घातक सवय  आहे.राग हा  एक नकारात्मक विचार आहे की जो आपली मन:शांती भंग करतो व आपल्या  आरोग्यास तो अपायकारक आहे. हे मान्य केल्याशिवाय आपल्याला त्यापासून सुटका करून घेता येणार नाही.

२.      जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा हे तपासले पाहीजे की राग कोणाला येतोय? त्यामुळे कोणाचे नुकसान होत आहे? व जे नुकसान होत आहे त्याची भरपार्इ कोणाला दयावी लागणार आहे? याचा जर आपण बारकार्इने विचार केला तर त्याचे उत्तर येर्इल,, “आपण स्वत:!”.किती वेळा आपण स्वत:चे नुकसान करून घेणार आहोत? राग ही एक   चुकीची सवय आहे व ती प्रयत्न केल्याने बदलता येते हे आपण लक्षात घेणे    गरजचे आहे.

३.   राग न येण्यासाठी आपल्याला एकच करावे लागेल कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जसं की इतरांनी वेळेवर यावे, मला फोन करावा, माझ्याशी प्रेमानेच वागावे, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात इ.

४.    काही घटनेमध्ये आपण म्हणतो माझ्याकडे रागावण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.  तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतंलं पाहीजे राग हा एक नकारात्मक विचार आहे व तो  करावयाचा का नाही हे सर्वस्वी माझ्या हातात आहे. राग हा माझ्या शरीराला हानीकारक      आहे तरी मी तो करतोय म्हणजेच मीच माझ्या शरीराची हानी करून घेतोय. हे चुकीचे आहे, हे एकदा लक्षात आले की आपण रागावणे सोडून देवू.

५.   काहींची अशी एक चुकीची समजूत असते की  रागावल्याशिवाय माझी कामे होणार  नाहीत.खरं तर रागाने इतर तुम्हाला घाबरू शकतात आणि घाबरून चांगली कामे कशी      होतील? रागाने तुमचे कनीष्ठ तुम्हाला घाबरतील पण त्यांच्याकडून तुम्हाला      मानसन्मान मिळू  शकणार नाही. राग हा काम करण्यासाठी प्रेरीत करू शकत नाही.      तुम्हीच सांगा ! तुम्हाला कोणी रागावले तर त्या वेळेस तुमची मन:स्थिती कशी असते?      ती एकदम तणावपूर्ण झालेली असते. अस्वस्थ असते. या परीस्थितीत आपण काम करू      शकतो का? नाही! तर मग इतर तरी ते कसे करतील?. तेव्हा लोक जसे आहेत तसे      स्वीकारा. त्यांना त्याच्या क्षमतेनुसार काम दया. त्यांना प्रेमाने कामासाठी प्रेरीत करा      रागाने नव्हे. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमची विचार करण्याची क्षमता ही     संपलेली      असते. या परीस्थितीत तुम्ही इतरांकडून कसे चांगले काम करून घेवू शकाल?

६.        आपण रागाला स्वाभाविक किंवा नैसर्गिक समजतो. जे की चुकीचे आहे. राग हे वीष      आहे. ते नैसर्गिक किंवा स्वाभाविक कसे असू शकते? राग आपल्याला दु:ख देतो. तो      आपल्याला असुरक्षित करतो पण आपण असुरक्षितेलाच सुरक्षितता समजुन त्याला      कुरवाळत बसलेलो आहोत. रागामुळे नातेसंबंध बिघडतात. राग आणि शांती एकाच      ठिकाणी नांदू शकत नाही.

७.        आपण या जगात इतरांना कायम खुष ठेवण्यासाठी आलेलो नाहीत, हे लक्षात घ्या.तेव्हा      तुमच्या मनाविरूध्द कराव्या लागर्णाया गोष्टीला ठाम पणे नकार दया. ज्यामुळे तुम्हाला      मनाविरूध्द करत असलेल्या कामामुळे  व त्यामुळे  येर्णाया रागापासून तुमची सुटका होवू      शकेल.

८.        आपल्या जीवनाचे लक्ष शांती व आनंद आहे. त्यावर आपले लक्ष केंद्रीत करा.    लोकांना      आहे तसे स्विकारा. त्यांना बदलायचा प्रयत्न करू नका. ते आपल्या हातात     नाही.      तुमच्या चांगल्या वागण्याने ,व्यवहाराने, प्रेमाने ते प्रभावीत होतील व त्यांची      बदलण्याची शक्यता वाढेल.

९.        बाहेरची परीस्थिती बदलणे हे आपल्या हातात नाही. आतली आपली मन:शांती शांत  ठेवणे, स्थीर ठेवणे हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे हे ध्यानात घ्या व ती  राखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करा. जसे की योग, प्रार्थना, ध्यान, संगीत,  वाचन, खेळ, छंद इ.

१०.      घडून गेलेल्या अप्रिय घटनेमूळे आपले एकदा नुकसान झालेले आहे,. परत परत ती  घटना आठवून व राग करून आपण पुन्हा एकदा आपले नुकसान करून घेत आहोत. जे  की चांगले नाही. हे समजून घ्या व घडून गेलेल्या अप्रिय घटनेची उजळणी करणे सोडा.

     वरील बाबी लक्षात घेतल्यानंतर मला खात्री आहे की आपण राग करत असाल तर ते करणे सोडून दयाल.  जीवनात शांती व आनंद प्रस्थापित कराल. तर मग चला राग करणे सोडूया, आनंद देवूया व आनंद घेवूया.

@महेश भा. रायखेलकर

८६६८७७४१७४


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

Previous Article

भारतीय संविधानाची जडणघडण: भाग १ (१७७३-१८५८)

Next Article

२५ जानेवारी 

You may also like