आनंदाचे डोही…

Author: Share:

कळा लागली जिवा..
ओढ चंद्रभागेतीरी
मन उधाण बागडे
तान्ह्या पोरापरी

तू देवाचा देव
भक्तीचा कडेलोट करी
अगम्य प्रीतीचे सख्य
भीतीचा लवलेश नाही

कुणी म्हणती सखा मित्र
कुणी काही उपमान
अणुहूनही लहान
मणाहूनही महान

या भक्तांच्या लीला
तू पाही स्थिरचित्ती
भक्त पायाशी लोळता
करिशी त्याही स्थिरचित्ती

अद्वैताचा अनुभव
किती सहजी तू देशी
भक्ता गळा भेटुनीया
त्याचे अद्वैत करिशी

करूनीया तुझे कर्म
तरी तू अलिप्त
गीतेचा कर्मयोग
कधी तुझ्याही निमित्त

आनंद विधान
अनुपमेय उपमान
तुझ्या पायाशी म्हणून
मिळे ब्रम्हांडाचे ज्ञान..

म्हणे हर्षद बापुडा
घ्यावे कडेवरी आता
महाराष्ट्र धर्माचा
मांडू सोहळा भगवंता..

हर्षद माने 

Previous Article

खडकमाळेगाव येथील रायतेवस्ती जिल्हा परिषद शाळेची आषाढी दिंडी उत्साहात साजरी

Next Article

लोकनेते व जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

You may also like