Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

तीन तलाक; मूलभूत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा विजय – अमित शहा

Author: Share:

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल ऐतिहासिक असल्याचं मत नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क मिळेल, तसंच महिला सबलीकरणासाठी या निर्णय योग्य ठरला आहे, असंही ट्विट त्यांनी केलं आहे.

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा सल्ला कोर्टाने दिला आहे. या निर्णयावर विविध स्तरांतून प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. भाजपचे अध्यक्ष यांनी तर ही नव्या युगाची सुरुवात आहे, असे मत व्यक्त केले आहे.

“मुस्लिम महिलांसाठी स्वाभिमानपूर्ण आणि समानतेच्या नव्या युगाची सुरुवात म्हणून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे पाहिलं जाईल. हा निर्णय जय-पराजयाचा नाही. हा मुस्लिम महिलांच्या समानतेचा अधिकार आणि मूलभूत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा विजय आहे, असे अमित शहा म्हणाले आहेत.

Previous Article

संसदेने तीन तलाकविषयी सहा महिन्यात कायदा करावा: ऐतिहासिक निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाचा संसदेला आदेश

Next Article

मुस्लिम कट्टरतेला सुप्रिम कोर्टाचा तलाक

You may also like