नांदगाव-येथील महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Author: Share:

नांदगाव ( प्रतिनिधी) येथील मविप्र संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचिमेचे पुजन प्राचार्य.डॉ.एस.आय.पटेल,उपप्राचार्य प्रा.संजय मराठे कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.आर.टी.देवरे अखिल भारतीय मानवी अधिकार संघ नांदगाव तालुका माजी अध्यक्ष प्रा.पी.एन.अहिरे जेष्ठ प्रा.एस.एम.नारायणे प्रा.दिनेश उकिर्डे, प्रा.व्ही.पी.गढरी, दिलीप अहिरराव, अनिल हातेकर व सतिष पुणतांबेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना उत्तम व सर्वसमावेशक स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व , सर्वधर्म समभाव, राजकिय व राष्ट्रीय एकात्मता या आदर्श मुल तत्वांचा समावेशात्मक राज्यघटना दिल्यामुळे आज भारतीय जनता खऱ्याअर्थाने सुखी झाली आहे व बाबासाहेबांनी दलीतांना शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला त्यामुळे आज दलीत समाजाची उन्नती व प्रगती बाबासाहेबाच्या मुळे झाली असे विचार प्रा.एस.एम.नारायणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Article

असिफा बलात्कार: हिंदू असण्याची लाज वाटते का?

Next Article

बालक, पालक आणि शिक्षक – डॉ. मो. शकील जाफरी

You may also like