Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नस्तनपुर येथे एडस ग्रस्त मुलांना श्री शनिमहाराज ट्रस्टकडुन मदत

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – नस्तनपुर ता. नांदगांव येथे स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था (बालश्रम) व युवा फाउंडेशन नांदगांव यांच्या पुढाकारातुन एड्सग्रस्त मुलांना हक्काचे व सुखी जीवन मिळावे म्हणुन त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाचा स्वीकार करून श्री शनि महाराज मंदिर संस्थान नस्तनपुर मंदिराच्या निसर्गरम्य वातावरणात त्या गोड मुलांना बघुन आयुष्य किती व कसे जगायचे व आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण हा आपला व तो आनंदात कसा जगायचा.

खरे तर आज तो प्रसंग त्या अकरा बालकांच्या हास्यावर आम्हाला सर्वाना दिसला अशा या चांगल्या कामासाठी श्री शनि महाराज मंदिर संस्थान नस्तनपुर यांच्या कडुन स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था खांडगाव ता.संगमनेर जि. अहमदनगर बालश्रमास बाजरी, तेल व पाच हजार रु चेक रुपी देण्यात आले हे पुण्याचे कामाला हातभार लावण्यासाठी दर्शन आहेर,संस्थानचे विश्वस्त,युवा फाउंडेशनचे सदस्य आणि स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी युवा फाउंडेशनचे सदस्य व बालश्रम चे पदाधिकारी सदस्य यांचा दर्शन आहेर व संस्थानचे विश्वस्त यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला नागरिकांनी देखील या संस्थेला मदत करावी ही विनंती.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

स्वच्छता अभियान या विषयावर खेड्याकडच्या तरुणाने बनवलेली शॉर्ट फिल्म पाहा

Next Article

जे. टी . के. हायस्कूलचे टेबल टेनिस व कुस्ती खेळात यश

You may also like