असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline
सगळीच मुलंमुली कालांतरानं वयात येतात.वयात आल्यावर शरीरात बदल होतो. त्यानुसार शरीराचं आकर्षण वाढु लागतं.मुलींना मुलगा आवडायला लागतो. मुलाला मुलगी आवडायला लागते.प्रत्येकाला प्रेम करावसं वाटते. मग तो मुलगा कसा आहे कसा नाही याचा इतिहास जाणुन न घेता मुलगी प्रेमात पडते. मुलगाही तसाच विचार करुन मुलीशी प्रेम करायला लागतो. कारण ते वयच तसं असतं.
अलिकडे खरं प्रेम उरलेलं नाही. ह्या प्रेमात स्वार्थ निर्माण झालेला आहे.संसारगाठ बांधु म्हणणारा मोठमोठे आश्वासन देणारा हा काळ. मुलींच्या शरीराचा वासनेच्या दृष्टिकोणातुन उपभोग घेणारा हा काळ. अर्थात शरीरसंबंधांसाठीच काही काही मंडळी प्रेम करीत असतात. एकदा का शरीरसंबंध संपले की ती कुठली हे तो तरुण आठवतही नाही. पण याची झळ सर्वात जास्त पोहोचते ती तरुण मुलींना.
शरीरसंबंधासाठी त्याही उत्सुक असतात. त्यामुळे की काय विवाहाचं आश्वासन मिळाल्यावर विवाह करण्यापुर्वीच त्या शरीरसंबंध प्रस्थापीत करतात. काही तर फक्त विवाहाचं आश्वासन नाही मिळाले तरी फक्त कामवासना पुर्ण करण्यासाठी शरीरसंबंध प्रस्थापीत करतात.शरीरसंबंध संपले…..कामनासना पुर्ण झाली की हे दोन्ही घटक एकमेकांपासुन दूर जातात. तद्नंतर दुस-या कोणाशी शरीरसंबंध प्रस्थापीत करतात.केवळ कामवासना पुर्ण करण्यासाठी…….कामवासना पुर्ण करण्यासाठी एकाचवेळी अनेकांशी शरीरसंबंध. तोही राजीखुशीनं.कामवासना पुर्ण करण्यासाठी हा भातुकलीचा खेळ…..पण जेव्हा याचे परिणाम दिसायला लागतात. तेव्हा मात्र नेमका कोण हेच कळत नाही.
केवळ आनंदासाठी व शरीराची शारिरीक भुक भागविण्यासाठी हा कामवासनेचा कौमार्य बिघडवणारा खेळ.या खेळात हारते फक्त स्री. पुरुष हारत नाही.कारण या खेळातुन मुलीच गर्भार राहतात. मुलं नाही. मुलीला जेव्हा गोळ्या खावुनही मासीक पाळी येत नाही.तेव्हा ती घाबरते. ती एवढी घाबरते की आपले काय होईल या धाकाने ती आत्महत्या करते. तर काही काही मुली ह्या आपल्या प्रियकराला स्वतःवर घडलेला प्रसंग सांगतात,त्याने नकार देताच मायबापाला स्वतःवर घडलेला प्रसंग सांगतात. काहींना हे अपत्य नेमके कोणाचे हे माहीतच नसते कारण त्या मुलीचे शरीरसंबंध एकाच मुलाशी नसतात. तरीही एखाद्याला गृहीत धरुन ती मुलगी जेव्हा आपल्या प्रियकराला म्हणायला जाते की तुझं बाळ माझ्या पोटात वाढते तेव्हा मात्र तो मुलगा…..ज्याच्यावर ती निरतीशय प्रेम करीत असते. तो स्पष्ट नकार देतो.म्हणतो,’ तू इकडे तिकडे तोंड मारायला गेली असेल, हे पाप दुस-याचं अाहे आणि माझ्यावर लावते काय?’ तो तिला धुडकावुन लावतो.शिवाय यानंतर मला तोंड दाखवायचे नाही. असेही म्हणतो.
ज्याच्यावर निरतिशय प्रेम केले तो प्रेमी, कधी लग्नाचे आमीष दाखवुन तर कधी ते आमीष न दाखवता भोळ्या भाबड्या मुलींना फसवतो.वारंवार बलत्कार करतो. कधी मुलीही कामवासना पुर्ण करण्यासाठी त्या आमीषाला बळी पडतात. स्वतः बलत्काराच्या शिकार ठरतात.परिणामाचा विचार न करता. अशावेळी गर्भ राहिल्यास बदनामी तर होते. पण एफ आय आर दाखल करुनही असा मुलगा पैसेवाला जर असेल तर तो पोलिस ठाण्यापासुन तर न्यायालयापर्यंत सगळी जुळवाजुळव करुन मोकळा सुटतो. मुलीलाच कुलथा ठरविलं जातं, म्हणुन मुलींनीच सावधान राहण्याची गरज आहे. प्रेमाला भातुकलीच्या खेळासारखे समजु नका. शरीरसंबंध प्रस्थापीत करतांना प्रथम मायबापाचा विचार करा. प्रेम करीत असाल तर मायबापांना सांगा. शरीरसंबंध प्रस्थापीत करण्यापुर्वी लग्न करा. त्याचा पुरावा घ्या.
अलिकडे शरीरसंबंध ठेवण्याची प्रथाच निर्माण झाल्यासारखी वाटते.लग्न झाल्यानंतरही पुरुष आणि महिला याच कामवासनेच्या आहारी जावुन आपला संसार उध्वस्त करतात.लग्न करुन मिळविलेला पतीदेव त्याला देवाचा दर्जा न देता त्यांची हेळसांड करुन त्याला माहीत न करता स्रीया शरीरसंबंध का ठेवतात ते कळत नाही. पुरुषही आपल्या कर्मनिष्ठ पत्नीला माहीत होऊ न देता असेच विवाहबाह्य संबंध कसे प्रस्थापीत करतात ते कळायला मार्ग नाही. अगदी मुलं बाळं असतांना या विवाह बाह्य संबंध ठेवण्याने संसाराचे नुकसान होत असले तरी अगदी बाल्यावस्थेत असल्यासारख्या या महिला वागतात. हे विवाहबाह्य संबंध माहीत झाल्यावर व त्यांना रोक लावण्याचा प्रयत्न केल्यावर त्या पतीलाच उलट उत्तर मिळते. तो माझा बायफ्रेंड आहे. कशाला बायफ्रेंड हवा पती असल्यावर. तरीही……पुरुष तर याबाबतीत एक पाऊल पुढेच असतो.तो तर चक्क पत्नीने असा विरोध करताच या स्रीसोबत दुसरीकडे राहायला जातो वा तिला जबरदस्तीने आपल्या घरी आणतो. हे बरोबर नसले तरी हा जागतिक चिंतनाचा विषय बनत चालला आहे. याचा परिणाम मुलाबाळावर होत असुन यामुळे घटस्फोटाचेही प्रमाण वाढत चालले आहे. स्रीयाही ऐकायला तयार नाहीत.पुरुष तर नाहीच नाही. मात्र यात जन्मास येणा-या बाळांचं अतोनात नुकसान होत आहे. शरीरसंबंध ही काही मुलांपुढे तेवढी महत्वाची गोष्ट नाही तरीही मायबापाचे विवाहबाह्य शरीर संबंध ठेवणे ही न पचणारी गोष्ट आहे.
एक प्रकरण सांगतो. एक महिलेची कहानी आहे.तिचा पती व्यसनाधीन असुन दारुच्या आहारी गेला होता. तिला एक मुलगीही होती.तिची काळजी न करता त्या मुलीने आपल्या पतीला सोडले. केवळ विवाहबाह्य शरीरसंबंधासाठी.तिने तो व्यसनाधीन आहे. म्हणुन त्याला सोडले. बहुतेक या महिलेचं प्रेम त्याला माहित होतं. म्हणुन तो ते विसरण्यासाठीच दारु पीत होता. तिने घरी परत यावे म्हणुन तो नेहमी भांडण करायचा.पण ती जात नव्हती. सारखी ती तो दारु पितो म्हणुन सांगायची. आपल्या विवाहबाह्य शरीर संबंधाविषयी सांगायची नाही.. तिचं खरंही वाटायचं. पण काळानुसार वेळ गेली. तो पती सांगायचा की तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. पण कोणाला विश्वास वाटायचा नाही. यातच एक दिवस तिला घरच्यांनी रंगेहाथ पकडायचं ठरवलं. कारण जावई दारु पीत होता. अशी तक्रार मुलीची होती. आई मुलीच्या बाजुनं होती. तर बाप आणि भाऊ हे थोडे विरोधात.यातच जावई मारहाण करतो अशी मुलीची तक्रार.
आधुनिक तंत्रज्ञानानुसार मोबाइल तंत्रज्ञान निघालं. मग व्हाट्सअप, फेसबुकच्या आहारी गेलेली पिढी त्यांचं कोणावर कशाप्रकारचं प्रेम आहे हे मोबाईल तंत्रज्ञानावरुन सहज समजतं.तसं पाहिल्यास व्हाट्सअपवर आलेले मेसेज कोणाला आपला स्वभाव कळु नये म्हणुन पटकन नष्टही करतात. पण एक दिवस याच महिलेचा मोबाइल तिच्याजवळ नसतांना भावाने तपासला. त्यात व्हाट्सअपवर हिने एका पुरुषाला मी प्रेम करतो(I love you) हे इंग्रजीत लिहिलेलं. त्याचंही मी प्रेम करतो हे इंग्रजीत लिहिलेलं. नंतर हिने त्याला चुंबणाचा व्हिडीओ पाठवलेला. त्यानेही बोट सापडल्यागत अश्लिल व्हिडीओ पाठवलेले. चोरी पकडली गेली.
बहुतेक व्हाट्सअपवर आलेल्या त्या गोष्टी ती नष्ट करायला विसरली असेल. तो व्हिडीओ त्याने भीत भीत बाबांना दाखवला. थोड्या वेळाने ती आली. चेह-यावर राग होता.पण राग न दाखवता बापाने सुरुवात केली. त्याच्या नावाचा उल्लेख करुन विचारणा झाली. तर मुलीचं उत्तर आश्चर्यात टाकणारं होतं. ती म्हणत होती की तो तिचा बायफ्रेंड आहे. त्याला सोड म्हटल्यावर ती सोडायला तयार नव्हती. वाटल्यास ती घर सोडुन देईल पण बायफ्रेंड सोडणार नाही अशी धमकी. यातच जर बायफ्रेंडने ठुकरावले तर आत्महत्या करणार अशी ही धमकी. अर्थात तिच्या पोटच्या मुलीचं आयुष्य बेकार. वाया गेल्यागत.
लग्न झाल्यावरही असं शरीराचं आकर्षण. काय गरज आहे अशा विवाहबाह्य बाह्य संबंधाची. तेही पती सोडुन. पतींना व्यसनाला लावुन.पुरुष मंडळीही असे विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवतात. मुलाबाळांचा विचार न करता. तसेच बायकोचा विचार न करता…….ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
हे असे शरीरसंबंध अलिकडे वाढत चाललेले दिसुन येत असुन व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातुन ते अगदी घनिष्ठ होत चाललेले आहेत.याला जनसामान्यांचा विरोध असला तरी जो तशा स्वभावाचा आहे, त्याला तसे संबंध चांगले वाटतात. पण यात किती नुकसान होते हे शरीरसंबंध प्रस्थापीत करण्यापुर्वी कोणीही लक्षात घेत नाही. बिचारी मोनीका ही मैत्रीणीच्या याच शरीरसंबंधाच्या प्रेमात मरण पावली.
अरुणा शानबाग याच शरीरसंबंध संबंधातुन कोमात गेली. बिचारी निर्भयाही तशीच.फरक एवढाच की त्यांच्याशी झालेला शरीरसंबंध हा बलत्कार स्वरुपाचा होता. असे कितीतरी प्रकरणं झाली आहेत. पण तरीही अजुन कोणाचे डोळे उघडलेले नाहीत. आजचा काळ एखाद्या मुलीचे जर प्रेम असेल तर तिच्या प्रेमाचा फायदा घेत तिला अज्ञात ठिकाणी बोलावले जाते व तिथे स्वतःची कामवासना तृप्त न करता सामुहीक भोजन समजुन मित्रांचीही कामवासना पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा सामुहीक बलत्कारच असतो.पण प्रकरणाची वाच्यता कुठेच केली जात नाही, जेव्हापर्यंत समस्या निर्माण होत नाही. कारण हा बदनामीचा विषय ठरतो. ही वाच्यता तेव्हाच होते जेव्हा या मुलींना दिवस जातात. लग्न झालेल्या महिला जर पतीजवळ राहात असतील तर हे पातक खपतं. पण जर राहात नसेल तर खपत नाही. म्हणुन विवाह झाल्यावर असो की विवाह होण्यापुर्वी असो असे कामवासना पुर्ण करणारे शरीरसंबंध नकोत.
लेखक: अंकुश शिंगाडे लेखक, नागपुर
संपर्क: ९३७३३५९४५०
असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline
- Tags: शरीरसंबंध