मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट अंपायर डॉ. प्रकाश वझे यांचे अपघाती निधन

Author: Share:

मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट अंपायर डॉ. प्रकाश वझे यांचे ठाणे येथे अपघाती निधन झाले. ठाण्यातील आनंदनगर चेक नाका परिसरात ट्रकने दिलेल्या धडकेत डॉ. वझे यांचा खड्ड्यामुळे मृत्यू चा दुर्दैवी प्रसंग ओढवला. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहाय्यक नागप्पा हेडगे गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावर असलेला खड्डा चुकवताना डॉ. वझे यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. वझे यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या अनेक प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम केले होते. त्यांनी नवोदितांसाठी मोफत क्रिकेट अंपायर प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली होती. डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानतर्फे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी टेनिस, डबल विकेट क्रिकेट, बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन सुद्धा केले जाते. याशिवाय स्थानिक पातळीपासून फिडे रेटिंग बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करून डॉ. वझे यांनी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील उदयोन्मुख बुध्दिबळपटूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.

Previous Article

बापूराव पेंढारकर

Next Article

खादी व ग्रामोद्योग : उद्योगाची संधी…!

You may also like