Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

अभिराम भडकमकर यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहिर

Author: Share:

सुप्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ नृत्यांगना संध्या पुरेचा आणि तबलावादक योगेश समसी या महाराष्ट्रातील कलाकारांना २०१७ सालचा `संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर सावनी शेंडे आणि आदित्य खांडवे यांची उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

मणिपूरमध्ये झालेल्या बैठकीत देशभरातील ४२ कलाकारांची तर उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी ३४ कलाकारांच्या नावांची निवड करण्यात आली आहे. संगीत, नृत्य, नाटय़ आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱया कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. या वर्षी २०१७ च्या नाटय़ अकादमी पुरस्कारासाठी संगीत, नृत्य, नाटय़ आणि लोककला या श्रेणींमध्ये देशभरातील ४२ कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

Previous Article

लासलगाव येथे आज उन्हाळ कांद्याला 1373 रुपये भाव मिळाला

Next Article

वांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची प्रवासातील सुरक्षा

You may also like