आला श्रावण

Author: Share:

मेघांचे हिंदोळे

धरेचे डोहाळे

शालूचे सोहळे

मनात वसंत

रानास झोंबत (घुमवित अलगुज)

आला श्रावण…

झर्‍यांची झुळझुळ

पालवी सळसळ

अनोखीऒ हुरहूर

गर्जत घनघोर

नाचत मनमोर

अमृत बरसत

आला श्रावण…

                            

मातीचे लेणे हे

देवाचे देणे हे

मधुगंध उधळत

कळ्यांना झुलवत

पाकळ्या फुलवत

फुलांनी सजत

आला श्रावण…

इवलासा अंकूर

देतसे हुंकार

धरतीचा शृंगार

आलेले अंबर

मेघांचे झुंबर

इंद्राचा धनुभार

आला श्रावण…

सागरा उधाण

अंबारा उधाण

मनाला उधाण

सुखाला उधाण

प्रेमाला उधाण

तनमन सुखवत

आला श्रावण…

नेत्रात हासत

मनात साठत

आनंद लुटीत

उधळीत दैलत

पाचूंच्या बेटात

तेजात न्हावून

आला श्रावण…

लाजर्‍या धरेला

ह्रदयी लावत

पाऊस उन्हात

लाटांशी खेळत

थाटाने ऐटीत

करीत रुबाब

आला श्रावण…

कविता: सौ. आशा कुलकर्णी

 

Previous Article

वाहून गेलेली माती आणि माणसे !

Next Article

आनंदाचे निधान

You may also like