Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

रूप ‘तीचे’ पाहता

Author: Share:

स्त्रीची आई म्हणून पूजा केली जाते. बहिणीची रक्षा केली जाते. मैत्रीण किंवा पत्नी म्हणून सुद्धा जे काही करावं ते केलं जातं. कवींनी तिच्या प्रत्येक रुपाला अनेक उत्तमोत्तम उपमा दिलेल्या आहेत. पण जेव्हा तिच्या ‘सौंदर्याचा’ विषय येतो, तेव्हा काही अपवाद वगळता आजचे कवी तिला योग्य न्याय देऊ शकलेले नाहीत असं मला वाटतं. ती फक्त एक उपभोगाची वस्तू आहे किंवा आपली नैसर्गिक गरज आहे असंच तिचं वर्णन केलं जातं.

कुणी ती सुंदर आहे म्हणून तिला ‘झिलसी, मदहोश, नशीली, गुलाबी, आँखे’; ‘ज़ालिम, कातिल, बेरहम अदाएँ’ अशी विशेषणं लावतं. मग कुणाला बाई आणि बाटली मधला फरकच कळत नाही म्हणून तो म्हणतो

“शबाब पे मैं जरासी शराब फेंकूँगा”

अरे ‘शबाब’ म्हणजे ‘कबाब’ वाटला काय जो वाईन सॉस बरोबर शिजवून खायचा आहे?

तिच्या सौंदर्याबद्दल हे असं लिहणं गैर आहे असं मी म्हणत नाही. कारण ‘भाव तोची देव’! पण या विशिष्ट चष्म्याच्या पलीकडं एक सुद्धा एक दिव्यदृष्टी आहे. अध्यात्मिक दृष्टी! ज्यातून तिला पाहिलं तर ती खूपच वेगळी दिसते. आता जेवढी वाटते त्याहूनही अधिक सुंदर!

माझ्या माहितीनुसार ‘देव आणि मनाला भावणारी सुंदर स्त्री’ या कल्पनेवर फारच कमी काव्य आढळतं. अगदी चित्रपट संगीतामध्ये सुद्धा फार कमी उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ बैजू बांवरा मधलं रफी साहेबांनी गायलेलं ‘ओ दुनिया के रखवाले’ हे एक खूप सुंदर गीत. प्रेमिकेच्या विरहात देवाला आर्ततेनं हाक मारणारा प्रियकर देवाकडं मृत्यूची याचना करत म्हणतो

“जीवन अपना वापस लेले
जीवन देने वाले”

या कल्पनेहून एक वेगळी आणि सुंदर कल्पना सावन को आने दो चित्रपटात के. जे. येसुदासांच्या स्वरात आहे. गीतकार आहेत इंदिवर. स्त्रीच्या सौंदर्यावरून प्रत्यक्ष परमेश्वराच्या सौंदर्याची कल्पना करताना कवी म्हणतो

“तुझे देखकर जगवाले पर
यकीं नहीं क्यों कर होगा
जिसकी रचना इतनी सुंदर
वो कितना सुंदर होगा”

मला इंदीवरांची ही कल्पना खूप भावते, कारण त्यात फक्त प्रेयसी किंवा स्त्री सौंदर्याचाच नाही तर ज्यानं सारं काही निर्माण केलं त्या ईश्वराचा पण उल्लेख आहे. त्यामुळं व्यक्त होणारं प्रेम हे इंद्रियांची भावना किंवा वासना न राहता ते ईश्वरीय आणि जास्त पवित्र वाटतं. यावरून माझ्यासारख्या हौशी जुगाडु माणसाला पण लिहावसं वाटलं. आज आषाढी एकादशी च्या दिवशी (विक्रम संवत् २०७२, शिवशक ३४३) मला सुद्धा काही ओळी सुचल्या त्या खालीलप्रमाणे:

मनमोहक रूप, मोहनाने रचले ।
तृष्ण होते नयन, तृप्त झाले ।
जे मी वांछिले, आज ते लाभले ।
तुला पाहता, मन ‘विठ्ठल’ बोलले ।

लेखक: प्रणव देशपांडे

Previous Article

अनेक घटनांचा पट

Next Article

पेपरस्टॉलवरची मैफिल आता सुनी सुनी…

You may also like