आचार्य विनोबा भावे अर्थात विनायक नरहरी भावे

Author: Share:

जन्म: ११सप्टेंबर १८९५| स्मृतिदिन :१५ नोव्हेंबर १९८२

आचार्य विनोबा भावे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक पूजनीय नाव आणि भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात.  महात्मा गांधींनी १९४०मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली.

रायगड जिल्ह्यातील पेण मधील ‘गागोदे’ या गावी विनोबा भावे यांचा जन्‍म झाला. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथे झाले. वाराणसी येथे हिंदुविश्वविद्यालयातील एका समारंभात त्यांनी ऐकलेल्या महात्मा गांधीच्या भाषणाचा खोल परिणाम त्यांच्यावर झाला आणि त्यातूनच गांधीजींची ७ जून १९१६ रोजी भेट घेऊन, सत्याग्रहासाठी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता आले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आचार्य महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल १९३२मध्ये त्यांना तुरुंगवाससुद्धा घडलेला आहे. वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वता यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्रशांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे यांचेही अध्ययन केले. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृतान्त त्यांनी महात्मा गांधींना कळवला. त्या पत्राच्या उत्तरात म. गांधींनी म्हटले    “ए गोरख, तूने मच्छिंदरको भी जीत लिया है !

१९२१ साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून म. गांधीनी विनोबांना वर्ध्यास पाठवले. १९५१ ते ७३ पर्यंतची भूदानयात्रा सोडल्यास त्यानंतर आचार्य या वर्ध्याच्या आश्रमातच राराहिले. दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले.

१९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली.

प्रत्येक माणसाने रोज शरीरश्रम करावे अर्थात ‘शरीरश्रमनिष्ठा’ हे त्यांच्या जीवनाचे महत्त्वाचे तत्वज्ञान आहे. शरीरश्रमांबरोबरच मानसिक आणि आधात्मिक साधनाही त्यांनी केली.

१९३२ सालच्या सविनय कायदेभंगासाठी धुळे येथे कारागृहामध्येच गीताप्रवचने त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही  आणि इतर कैदी रविवारच्या सभेत या प्रवचनांसाठी उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल वजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी ही मंडळी होती.

या प्रवचनांचा मुख्य दृष्टिकोन ‘गीता ही साक्षात भगवंताची उक्ति होय’, असा होता. त्या उक्तीला पूर्ण प्रमाण मानूनच, त्यासंबंधी कसलीही साधकबाधक चर्चा न करताच त्यांनी ती १८ प्रवचने दिली.

मार्च १९४८ मध्ये भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी दिल्ली, पंजाब, राजस्थानमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता पंडितजींनी विनोबांना  बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्‍भावना निर्माण करण्याचा प्रयत्‍न विनोबांनी केला.

सतत सात दिवस प्रायोपवेशन करून दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात आचार्य विनोबा भावे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी आपला देह ठेवला.

पुस्तके

 • अष्टादशी (सार्थ)
 • ईशावास्यवृत्ति
 • उपनिषदांचा अभ्यास
 • गीताई
 • गीताई-चिंतनिका
 • गीता प्रवचने
 • गुरुबोध सार(सार्थ)
 • जीवनदृष्टी
 • भागवत धर्म-सार
 • मधुकर
 • मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती – मराठी)
 • लोकनीती
 • विचार पोथी
 • साम्यसूत्र वृत्ति
 • साम्यसूत्रे
 • स्थितप्रज्ञ-दर्शन

चरित्रग्रंथ

 • आमचे विनोबा (राम शेवाळकर आणि इतर)
 • दर्शन विनोबांचे (राम शेवाळकर)
 • महर्षी विनोवा (राम शेवाळकर)
 • महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार विनोबा भावे (लेखक : किसन चोपडे.) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
 • विनोबांचे धर्मसंकीर्तन ((राम शेवाळकर आणि इतर))
 • विनोबासारस्वत (राम शेवाळकर आणि इतर)
 • साम्ययोगी विनोबा (राम शेवाळकर)

संदर्भ: विकिपीडिया 

Previous Article

जागतिक युथ कॉमनवेल्थ वेटलिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक विजेती निकीता काळेचे मनमाड येथे स्वागत

Next Article

मराठा म्हणजे नक्की कोण?

You may also like