Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

रिझर्व्ह बँकेचा अहवाल: ९९% जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

Author: Share:

८ नोव्हेंबर ला करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटाबंदीनंतर, काळा पैसा बाहेर येईल असे आश्वासन दिल्यानंतर, आज रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार ९९% जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याने, केवळ १% काळा पैसा मिळाला का? असा प्रश्न विचारला जात आहे. माजी वित्तमंत्री पीचिदंमबरम यांनी रिझर्व्ह बँकेला १६००० कोटी मिळाले आणि नवीन नोटा छापण्यावर २१००० खर्च झाले, अर्थशास्त्रज्ञांना नोबेल मिळाले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. १००० रुपयांच्या १.३ % नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आले नाहीत असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सरकारकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या असा प्रश्न सातत्याने विरोधी पक्षांकडून आणि जनतेकडून विचारला जात होता. आज रिझर्व्ह बँकेने त्यावर उत्तर दिले आहे. हा आकडा ३० जून २०१७ पर्यंतचा असल्याचे कळते.

नोटबंदीनंतर १५.८४ लक्ष नोटा बाजारामध्ये होत्या. यापैकी १५.२८ लक्ष नोटा परत आल्या आहेत. नोटबंदीपूर्वी ५८८.२ कोटीच्या जुन्या नोटा होत्या, तर १००० च्या ६३२. कोटी रुपयाच्या नोटा अर्थव्यवस्थेमध्ये होत्या.

“९९% नोटा कायदेशीर रित्या हस्तांतरित झाल्या. नोटबंदी ही काळा पैसे पांढरा करण्याची योजना होती का ?”अशीही टीका चिदंबरम यांनी केली आहे.

Previous Article

नांदगाव-साकोरा येथे महाअवयवदान महोत्सव जनजागृती रँली

Next Article

नांदगाव-मुळडोंगरी येथे मुलांनी रोखून धरली बस

You may also like