Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

२६/११ सारख्या हल्ले थांबवण्यासाठी महत्वाचे पाऊल: तटरक्षक दलासाठी ३१,७४८ कोटी मंजूर

Author: Share:

भारताला लाभलेल्या ७५०० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावरून भारताला समुदमार्गे परकीय आक्रमणाचा नेहमीच धोका राहीला आहे. हा धोका २६/११ च्या हल्ल्यावेळी प्रत्यक्षात उतरलेला दिसून आला होता.  

या हल्यानंतर तटरक्षक दलाचे महत्व वाढले आहे. याकडे विशेष लक्ष देत सागरी सुरक्षेत महत्वाची भूमिका असलेल्या तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने ३१,७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

पुढील पाच वर्षात तटरक्षक दल अधिक बलवान आणि सशक्त करण्यासाठी तटरक्षक दलाची क्षमता वाढविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाईल. यासाठी पाच वर्षांचा कृती आराखडा बनवण्यात आला आहे . नवीन हॅलिकॉप्टर्स, बोटी,  नौका,  विमाने आणि अन्य आवश्यक उपकरणे यांची खरेदी केली जाईल. या महिन्यात झालेल्या बैठकीत खरेदी व्यवहारांना मंजुरी देण्यात आली.

समुद्र सुरक्षेच्या दृष्टीकोनाने तटरक्षक दलाच्या ताफ्यात २०२२ पर्यंत  १७५ बोटी, ११० विमानांचा समावेश करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 

Previous Article

पु. भा. भावे ह्यांच्या फाळणीवरील कथांचे रविवारी पार्ल्यात अभिवाचन

Next Article

तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

You may also like