तीन भारतीय…

Author: Share:

काल मी तीन भारतीय बघितले,

होय तीन भारतीयच बोललो मी, संध्याकाळची वेळ होती साधारण 7 वाजले असावे, सिग्नल लाल असल्यामुळे मी थांबलेलो होतो पुढे सर्कल वर कसला तरी गोंधळ चालू होता मी जरा डोकावून बघितलं तर कसलं तरी आंदोलन चालु आहे असं समजलं. पण वाहनांच्या वर्दळीमुळे नक्की काय आहे ते नाही दिसलं.

तीन लोक दिसत होते त्यात दोन तरुण आणि एक काका होते. दोघांच्या हातात फलक आणि काकांकडे भारताचा ध्वज होता, सिग्नल हिरवा झाल्यामुळे मी पुढे निघालो आणि जवळ जाऊन ते फलक वाचण्याचा प्रयत्न केला, त्यावर लिहिलेलं “कुलभूषण जाधव यांची सुटका झालीच पाहिजे” हे वाचल्या नंतर अंगावर गर्वाने शहारे आले, वा खरंच खूप छान वाटलं, पण ते तिघेच का? मी का नाही आणि हे बाकिचे सुदधा त्यांना बघून निघून जाताय ते का नाही, स्वतःवर लाज वाटली,

आम्ही नाही आहोत का भारतीय, आपल्या सुरक्षतेसाठी ते पाकिस्तानात गेले आणि पकडले गेले मग त्यांची सुटका व्हावी असे नाही का वाटत आपल्याला? पण काय करणार आपण वैयक्तिक आयुष्यात इतके गुंतलोय ना कि आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही, आपण ना फक्त एवढंच म्हणू शकतो “सुटका व्हायला पाहिजे राव” बस या पलीकडे आपण काहीच करणार नाही कारण त्यांची सुटका होण्याने आपल्याला प्रत्यक्षरीत्या काही फायदा होणारच नाहीये.

आम्हाला भारतासाठी काय करायचं आहे, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट ला ध्वजरोहण करायचं आणि त्या दोन दिवसांमध्ये ध्वजाचा अपमान नाही होऊ द्यायचं, नशिबाने आम्ही फक्त एवढंच करु ]शकतो,
। सलाम त्या तीन भारतीयांना ।

@अक्षय अंबादास गमे


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

माझी(च) मानसिकता

Next Article

न्यायपालिकेची प्रतिष्ठा राखा

You may also like