Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

२४ ऑगस्ट विशेष: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रांगणात चमकल्या तीन रत्नश्रेष्ठांचा आज दिवस

Author: Share:

आजचा दिवस अतिशय विशेष आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रांगणात चमकल्या तीन रत्नश्रेष्ठांचा आज दिवस आहे.

  • क्रिकेटमहर्षी देवधर, ज्यांच्या नावाने आज देवधर ट्रॉफी खेळवली जाते, त्यांची आज पुण्यतिथी आहे.
  • प्रसिद्ध साहित्यिक न.चिं. केळकर यांचा आज जन्मदिन आहे आणि
  • प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक डॉ. रामकृष्ण भांडारकर ज्यांच्या नावाने पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र बांधले गेले त्यांची आज पुण्यतिथी आहे.

क्रिकेटमहर्षी दिनकर बळवंत देवधर स्मृतिदिन

२४ ऑगस्ट १९९३

जन्म १४ जानेवारी १८९२ – स्मृतिदिन २४ ऑगस्ट १९९३

जानेवारी १४, इ.स. १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. ते पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकले. १९०६ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी कँपमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे नायकपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले.

अधिक वाचा http://smartmaharashtra.online/dinkar-deodhar/

 नरसिंह चिंतामण केळकर

जन्मदिन २४ ऑगस्ट १८७२

न. चिं. केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्‍या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जाते.

अधिक वाचा:  http://smartmaharashtra.online/n-c-kelkar/

डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर

स्मृतिदिन २४ ऑगस्ट १९२५

डॉ.भांडारकरांचा जन्म जुलै ६, १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.

अधिक वाचा: http://smartmaharashtra.online/dr-ramkrushna-bhandarkar/

Previous Article

दिनकर बळवंत देवधर

Next Article

२४ ऑगस्ट

You may also like