Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

१९ ऑगस्ट: मानवाच्या इतिहासात महत्वाची कामगिरी बजावल्या तीन शास्त्रज्ञांचा दिन

Author: Share:

आजचा दिवस म्हणजे विशेष विज्ञान संयोग आहे.

मानवाच्या इतिहासात महत्वाची कामगिरी बजावल्या तीन शास्त्रज्ञांचा दिन आहे. 
  • फ्रेंच गणिततज्ज्ञ पास्कलचा स्मृतिदिन (१६६२)
  • वाफेच्या इंजिनचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅट स्मृतिदिन (१८१९)
  • विमान संशोधक ऑर्व्हिल राइट यांचा जन्मदिन (१८७१)

पास्कल (मृत्यू : १९ ऑगस्ट १९६२)

फ्रेंच गणितज्ञ पास्कल हा फिजिक्स विषयातीलही जाणकार होता. त्याने तरुणवयात कॅल्क्युलेशन्स करणाऱ्या यंत्राचा शोध लावणे सुरु केले. ५० प्रयत्नानंतर त्याने २० मशिन्स बनवल्या. त्याला पास्कल कॅल्क्युलेटर्स म्हटले जाते. प्रोजेक्टिव्ह भूमिती वर त्याने शोधनिबंध लिहिले, आणि नंतर फर्मेट सोबत प्रोबॅबिलिटी वर काम केले ज्याने अर्थशास्त्र आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये मोठी कामगिरी बजावली आहे. १६५४ पासून त्याने तत्वज्ञान आणि धर्मावरही लिहायला सुरुवात केली. एरिस्टोटलच्या जगात पोकळी अशक्य आहे या विधानाला त्याने प्रयॊग करून दुजोरा दिला. ‘लेटर्स प्रोव्हिन्सीलीस’ आणि पेन्सिस हे त्याचे प्रसिद्ध लिखाण आहेत.

द्रवाशी संबंधित विज्ञानात पास्कलचे काम महत्वाचे राहिले आहे. पास्कल बॅरेल हा त्याचा प्रयोग प्रसिद्ध आहे. सर्व बाजूने बंदिस्त असलेल्या द्रवाच्या एका बिंदूवरील दाब वाढवला किंवा कमी केला गेला असता, त्याच्या इतर बिंदूंववरील दाबही त्याच प्रमाणात कमी किंवा जास्त होईल, या त्याच्या प्रसिद्ध सिद्धांताला पास्कल लॉ असे म्हणतात.

\Delta P=\rho g(\Delta h)\,

पास्कलच्या सन्मानार्थ पुढे बँकेला एका संगणकीय प्रोग्रॅम भाषेला त्याचे नाव दिले गेले. (संदर्भ: विकिपीडिया)

 

जेम्स वॅट (मृत्यू : २५ ऑगस्ट १८१९)

 हा एक स्कॉटिश संशोधक होता.  त्याचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अध्ययन केले.  उपकरण निर्मिती विषयातील त्यांचं रुचीला वडिलांच्या कार्यशाळेत प्रोत्साहन मिळाले.

 त्यानंतर ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक (गणितीय) उपकरणांच्या निर्मितीविषयीचे प्रशिक्षण घेतले. १७५७ साली ग्लासगोला परत आल्यावर वैज्ञानिक उपकरणनिर्माते म्हणून त्यांनी ग्लासगो विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली. तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली.

आधीच्या इजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविलेले वाफेचे इंजिन हे औद्योगिक क्रांतीत महत्वाचा शोध मानला जातो.  त्याची कथा फार मजेशीर आहे. एकदा तो स्वयंपाकघरात बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती. जेम्स त्या वाफेवर कप आणि चमचा धरून, वाफेच्या जोराने ते कसे खालीवर होतात, याचे निरीक्षण करत होता.

जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेत एकदा न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. कारण, न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे. ज्यात दट्ट्या असतो त्या सिलिंडराच्या घनफळाच्या ३-४ पट वाफ असली, तरच तिच्यामार्फत दट्ट्या सिलिंडराच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल, असे त्याला दिसून आले. अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते, हे त्यांच्या लक्षात आले.

न्यूमनच्या इंजिनातील दोषांवर उपाय शोधताना जेम्सला  इंजिनाला स्वतंत्र असा संघनक (वाफेचे द्रवात-पाण्यात-रूपांतर करणारे साधन) जोडण्याची कल्पना सुचली. सिलिंडरातून बाहेर पडणारी वाफ सिलिंडरात नेऊन तेथे तिचे संघनन होते. यामुळे सिलिंडरात पाण्याच्या फवार्‍याने संघनन करताना सिलिंडर व दट्ट्या थंड होत असे आणि ते परत तापविण्याकरिता वारंवार जादा उष्णता लागते असे. संघनकामुळे ही उष्णता वाचते. याशिवाय सिलिंडर व दट्ट्या गरम राहण्यासाठी त्यांनी सिलिंडराभोवती आवेष्टन घालून त्यात वाफ सोडण्याची व्यवस्था केली. यामुळे उष्णतेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन इंजिन अधिक कार्यक्षम झाले.

जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनात मूलभूत सुधारणा केल्या. वाफेच्या इंजिनाचा शोध त्यांनी लावला हा प्रचलित समज चुकीचा आहे. याच्या सुधारणांमुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले; ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले व अधिक शक्तिशाली वाफ इंजिने बनविता येऊ लागली. यामुळे कागद गिरण्या, कापड गिरण्या, पिठाच्या गिरण्या, लोखंडाचे कारखाने, भट्‌ट्या, पाणीपुरवठा इ. असंख्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ लागला. व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाचे औद्योगिक क्रांतीला चांगलीच चालना मिळाली.

वॅट याने जॉन रोबकसोबत वाफेची इंजिने बनविण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला (१७६८) आणि १७६९ साली त्यांनी या इंजिनाचे पेटंट घेतले. मात्र या धंद्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही. पुढे तो १७७४ साली बर्मिगहॅमला गेला आणि तेथे मॅथ्यू बोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफ एंजिने बनविण्याचा उद्योग सुरू केला. ही भागीदारी मात्र २५ वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला. १७७६ साली त्यांनी दोन वाफ एंजिने उभारली. पैकी एक दगडी कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले. यामुळे वाफ इंजिनांना मागणी वाढली व धंद्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली.

बोल्टन यांच्या सूचनेवरून १७८८ साली वॉट यांनी एंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गतिनियंता शोधून काढला व १७९० साली त्यांनी दाबमापक शोधला. यामुळे वॉट एंजिन जवळजवळ परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले .

इंजिनाची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्याची घोड्याच्या शक्तीशी तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर (अश्वशक्ती) ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले.

वाफ एंजिनाशिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयांतही त्यांनी संशोधन केले होते कार्यालय उबदार ठेवण्यासाठी वाफेच्या वेटोळ्यांचा वापर (१७८४)  इंधनाची बचत करणारी भट्टी, दाब देऊन मजकुराच्या प्रती काढावयाचे यंत्र व प्रतिलिपी शाई, शिल्पाची (पुतळ्याची) पुनःनिर्मिती करणारे यंत्र, अम्लतेची चाचणी घेणारे दर्शक, नियामक झडप, क्लोरीनचा वापर करून विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करण्याचे तंत्र वगैरे त्यांचे शोध महत्त्वाचे आहेत. शिवाय पाणी हे मूलद्रव्य नसून संयुग आहे, असे सुचविणारे ते एक पहिले संशोधक होते.

वॅट यांना त्यांच्या संशोधनकार्याबद्दल  अनेक मानसन्मान मिळाले. त्यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले. (संदर्भ: विकिपीडिया)

ऑर्व्हिल राइट यांचा जन्मदिन (१९ ऑगस्ट १८७१).

विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधूपैकी एक. १९०३ मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित, अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि १९०५ मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले.

ऑर्व्हिल यांचा ओहाओ तील डेटन येथे झाला. शिक्षण उच्च माध्यमिकपलीकडे गेले नाही. त्यांनी स्वतःच त्या काळच्या तंत्रविद्याविषयक साहित्याचा व गणिताचा अभ्यास केला. वर्तमानपत्राची घडी घालणाऱ्या यंत्राचा अभिकल्प (आराखडा) तयार करून व एक मोठे मुद्रणालय उभारून त्यांनी प्रारंभीच आपले यांत्रिक कौशल्य दाखवून दिले होते. बरीच वर्षे मुद्रणव्यवसाय केल्यानंतर त्यांनी १८९२ मध्ये सायकलींची विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्या राइट सायकल कंपनीची स्थापना केली व पुढील १० वर्षे सायकलीचे अभिकल्प, उत्पादन व विक्री यशस्वीपणे केली.

टो लीलिएंटाल या जर्मन संशोधकांनी उड्डाणविषयक केलेल्या प्रयोगासंबंधी व १८९६ मध्ये ग्लायडिंगमधील अपघातात झालेल्या त्यांच्या मृत्यूसंबंधी वाचल्यानंतर राइट बंधूंनी विमानविद्येचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविले. लीलिएंटाल यांनी उड्डाणासाठी हँगग्लायडरचा उपयोग केलेला होता आणि त्याचे नियंत्रण शरीराला इष्ट त्या दिशेने हेलकावा देऊन गुरुत्वमध्याचे (ज्यातून गुरुत्वाकर्षणाची परिणामी प्रेरणा कार्य करते त्या बिंदूचे) स्थान बदलून साध्य केले होते. राइट बंधूंनी या पद्धतीऐवजी दृढ द्विपंखी विमान वापरावयाचे ठरविले.

बझर्ड पक्षी उडताना हवेत आपला समतोल कसा साधतो याचे निरीक्षण केल्यावर विल्बर (बंधू) यांना असे कळून आले की, विमान यशस्वीपणे उडण्यासाठी तीन अक्षांवर त्याचे कार्य होणे आवश्यक आहे. पक्ष्याप्रमाणे उडणाऱ्या यंत्राच्याही बाबतीत एका वा दुसऱ्या बाजूला तिरपे होणे, वर चढणे वा खाली उतरणे, उजव्या वा डाव्या बाजूस वळणे आणि आवश्यकतेप्रमाणे एकाच वेळी या क्रियांपैकी दोन वा सर्व क्रिया करता येणे आवश्यक आहे.

सर्व अभ्यासावरून १९०३ मध्ये त्यांनी पहिले शक्तिचलित विमान तयार केले आणि त्याकरिता त्यांनी वापरलेले १२ अश्वशक्तीचे इंजिन व प्रचालक (पंखा) यांचा अभिकल्प आणि उत्पादन त्यांनीच केलेले होते. या विमानाने १७ डिसेंबर १९०३ रोजी किलडेव्हिल हिल्सनजीक चार यशस्वी उड्डाणे केली. त्यांतील पहिल्या उड्डाणात ऑर्व्हिल हे चालक होते . त्यांनी १२ सेकंदात ३६ मी. अंतर कापले. शेवटच्या सर्वांत जास्त काळ झालेल्या उड्डाणात विल्बर हे चालक होते व त्यांनी ५९ सेकंदांत ५५ मी. अंतर कापले.  हे विमान किटी हॉक याच नावाने लोकप्रिय झाले आणि १९४८ रोजी वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्यात आले.

राइट बंधूंनी आपल्या विमानात व ते चालविण्याच्या आपल्या कौशल्यात सुधारणा करण्याकरिता पुढील पाच वर्षे खर्च केली. १९०५ मध्ये त्यांनी बांधलेले तिसरे विमान हे जगातील पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान ठरले. त्याच वर्षी त्यांनी आपले पेटंट व संकलित केलेली वैज्ञानिक माहिती अमेरिकेच्या युद्ध खात्याला देऊ केली; पण तिचा स्वीकार झाला नाही.

विमानाचा पहिला उपयोग युद्धात होण्याची खात्री पटल्याने राइट बंधूंनी परेदशी बाजारात आपल्या विमानासाठी ग्राहक शोधण्यास सुरुवात केली. अनेक नकारांनंतर १९०८ मध्ये फ्रान्समधील व्यापारी संस्थांनी व अमेरिकेच्या सरकारने त्यांच्याकडून विमाने घेण्याचे करार केले. त्याच वर्षी फ्रान्समध्ये राइट कंपनीची स्थापना झाली.  १९०९ मध्ये ऑर्व्हिल यांनी फोर्ट मायर येथे आपल्या ‘राइट ए’ या नवीन विमानाचे यशस्वी उड्डाण केले व त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या लष्कराचे कंत्राट मिळून त्यांचे विमान जगातील पहिले लष्करी विमान ठरले. १९०९ सालाच्या अखेरीस अमेरिकन राइट कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर राइट बंधूंनी आपले लक्ष इतरांना उड्डाणाचे तंत्र शिकविण्याकडे व राइट कंपनीचा कारभार पहाण्याकडे वळविले. (संदर्भ: मराठी विश्व्कोश)

Previous Article

आसाममध्ये पुराचे थैमान : ‘काझीरंगा’ अभयारण्यातील २२५ प्राण्यांचा मृत्यू

Next Article

१९ ऑगस्ट

You may also like