Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

अंबर्जे गावासाठी दीड कोटींची पाणी योजना मंजूर

Author: Share:

भिवंडी प्रतिनिधी : शहापूर तालुक्यातील अंबर्जे ग्रामपंचायत मध्ये नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात पाणी पुरवठा कमिटी सह ग्राम पंचायतीला यश आले असून एक कोटी 1 कोटी 48 लाख रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे दरम्यान ही योजना मंजूर करण्यास विशेष सहकार्य केल्या बद्दल ग्रामपंचायत कमिटीने आमदार पांडुरंग बरोरा यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले

अंबर्जे ग्रामपंचायत मध्ये 1984 साली मंजूर झालेली पाणी योजना अत्यंत जीर्ण झाली होती, त्यामुळे ग्रामस्थांना अनेक वेळा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते, सन 2017 मध्ये नवीन पाणी योजना मंजूर करण्याचे आश्वासन देणाऱ्या ग्राम विकास पॅनलला अंबर्जे ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीची  सत्ता दिली.ही योजना मंजूर होण्यासाठी पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र परटोले ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध ठिकाणी पत्र व्यवहार करून आमदार पांडुरंग बरोरा यांना ही योजना मंजूर करण्यासाठी आग्रह धरला,कागद पत्रांची योग्य वेळी केलेली पूर्तता आणि आमदार पांडुरंग बरोरा यांचा पाठपुरावा या मुळे या गावाला सुमारे दीड कोटींची पाणी योजना मंजूर झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या योजनेचा पाठपुरावा करणारे आमदार पांडुरंग बरोरा यांची भेट घेऊन सरपंच पांडुरंग मुकणे, उपसरपंच हर्षला गोतरने,पाणी पुरवठा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र परटोले,माजी सरपंच कृष्णा परटोले, ग्राम पंचायत सदस्य मीराबाई परटोले,किरण परटोले, सुरेखा जाधव, तसेच आदींनी  त्यांचे आभार मानले आहेत.

Previous Article

माणूस

Next Article

मुंबईचा राष्ट्रीय तेजोमय समाजरत्न पुरस्काराने निलेश राणे यांचा गौरव

You may also like