Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मुबंईत जे जे मार्गातील इमारत कोसळली

Author: Share:

मुंबईत पावसाच्या हाहाकारातून मुंबई पूर्वपदावर येत असतानाच मुबंईत एक मोठी दुर्देवी घटना घडली आहे मुंबईत जे जे मार्ग परिसरातील ३ मजली इमारत कोसळली आहे . सकाळी ८ ते ८:३० वाजण्याच्या सुमारास हि इमारत कोसळल्याची माहिती मिळत आहेत. हुसैनीवाला असं या इमारतीचं नाव असून ही इमारत 100 ते 125 वर्ष जुनी असल्याचीही माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 35 माणसे अडकल्याची शक्यता येत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. महापालिका प्रशासनातील अधिकाऱीही याठिकाणी पोचले आहेत. इमारत पडण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.मुंबईमध्ये इमारत कोसळल्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

Previous Article

लष्करी जवान व अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन

Next Article

नांदगाव-मनमाड मधील महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी व वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य अभियंतांशी चर्चा

You may also like