Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना परदेशात राहूनच मतदान करता येण्याची सोय

Author: Share:

भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना सुद्धा आता परदेशात राहूनच मतदान करता येण्याची सोय भारत सरकार उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी हि सोय असेल. केंद्र सरकार कडून निवडणूक कायद्यातील बदलाला हिरवा कंदील मिळाला असून, संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले जाईल. सध्याच्या कायद्यानुसार केवळ भारतीय सैन्यातील कर्मचाऱ्यांनाच मतदान केंद्रात न येता बाहेरून मतदान करण्याची मुभा आहे.

नवीन तरतुदीनुसार, त्यांना प्रत्येक निवडणुकीसाठी त्यांचा ‘मतदान प्रतिनिधी’ म्हणून एका व्यक्तीची निवड करता येईल. प्रत्येक निवडणुकीच्यावेळी नव्याने प्रतिनिधीची नेमणूक करावी लागेल.

सध्या अनिवासी भारतीयांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करायचे असेल तर भारतामध्ये यावे लागते. त्यामुळे अनेक अनिवासी भारतीय मतदान करू शकत नाहीत. यापूर्वीदेखील अनिवासी भारतीयांना प्रातिनिधीक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे मतदान करता यावे यासाठी निवंडूक आयोगाने आराखडा तयार केला होता. आता त्याला कायदेशीर संमती मिळण्याची प्रक्रिया सुरु होईल.

मतदानाचे प्रमाण त्यामुळे निश्चित वाढेल. सध्या नरेंद्र मोदींची क्रेझ भारताबाहेरसुद्धा असल्याचे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिसून आल्याने, भाजपला याचा फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंजूर झाल्यास २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत  याचा उपयोग केला जाऊ शकेल.

Previous Article

सुधारित मुंबई विकास आराखड्याची बांधकाम व्यवसायास चालना मिळण्याची शक्यता!

Next Article

सावरकरांची काव्यप्रतिभा

You may also like