Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पॅन कार्ड आधारला लिंक करण्यासाठी आज यासाठीचा शेवटचा दिवस आहे

Author: Share:

तुम्ही आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक केलत का….? नसेल केल… ? तर मग आज नक्की करा. कारण आज यासाठीचा शेवटचा दिवस आहे. आज ही लिंक केल नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. तसेच कर भरण्याच्या प्रक्रियेतही अडचणी निर्माण होऊ शकतात. ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आली होती. यापुढे ही मुदत वाढवली जाण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे हे काम तुमच्याकडून राहीले असेल तर ते त्वरीत करुन घ्या. आता आधार कार्ड केवळ गॅसची सबसिडी मिळविण्यासाठी, बँकेचे खाते उघडण्यासाठी आणि मोबाईल फोनचे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी उपयोगी ठरते. आता ते आयकर भरण्यासाठीही सक्तीचे करण्यात येत आहे.
आयकर विवरणपत्र भरले असेल आणि त्याची प्रक्रिया झाली नसेल तर किती दंड भरावा लागेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर हे समजून घेणे गरजेचे आहे. ज्यांची विवरणपत्र प्रक्रिया झाली नाही ते नॉन फायलरमध्ये जातील. आयकर विभागाकडून या लोकांना दंडाबरोबरच नोटीसही पाठविण्यात येणार आहे. मात्र दंडाची रक्कम अद्याप सांगण्यात आलेली नाही. बँकेशी निगडीत असणारे व्यवहार करणे अवघड होणार आहे. तुम्हाला डिमॅट अकाऊंट सुरु करायचे असेल तसेच म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदी करायचे असतील, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे.

Previous Article

ब्राह्मण लक्षण

Next Article

लष्करी जवान व अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन

You may also like