Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पहिली जागतिक मराठी परिषद (१२ ऑगस्ट १९८९)

Author: Share:

पहिली जागतिक मराठी परिषद दि. १२ ते २० ऑगस्ट १९८९ या कालावधीत मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृह- १२-१३ ऑगस्ट , रवींद्र नाट्यमंदिर- नाट्यमहोत्सव, नेहरू सेंटर-चित्रपटविषयक प्रदर्शन, ग्रंथजत्रा, स्मरणयात्रा आणि कलावंतांच्या मुलाखती या स्वरूपात पार पडली. उद्या आज त्याला २८ वर्षे पूर्ण झाली.

त्यात भाग घेण्यासाठी मराठी जगतातील तारेतारका महाराष्ट्रातून, बृहन्महाराष्ट्रातून आणि जगभरातून मुंबईत अवतीर्ण झाले होते. १२ ऑगस्टचा षण्मुखानंदमधील उद्घाटन सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी कविवर्य कुसुमाग्रज होते. उद्घाटक म्हणून नरसिंहराव यांची योजना झाली होती. प्रमुख पाहुण्या मॉरिशसच्या मंत्री शीलाबाय बापू होत्या. स्वागताध्यक्ष मुख्यमंत्री शरद पवार होते. पु. ल. देशपांडे वक्ता म्हणून उपस्थित होते. सभागृहात साडेतीन हजार निमंत्रितांची खचाखच गर्दी झाली होती.

बाहेर पाऊस पडत होता, आत स्वरांची बरसात सुरू झाली होती. स्वागतगीत गाण्यासाठी दस्तुरखुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मीना, उषा, हृदयनाथ ही भावंडे उपस्थित होती. सुरात सूर मिसळून जेव्हा ते सर्वजण ‘ महाराष्ट्रगीत ‘ गाऊ लागले तेव्हा प्रत्यक्ष देवगंधर्व तिथे उतरल्याचा भास झाला. मराठी माणसांच्या या महामेळाव्याला जणू काही त्यांचे आशीर्वादच मिळाले.

शरद पवारांनी ‘ जागतिक मराठी परिषदेची ‘ संकल्पना स्पष्ट केली. ” मराठी भाषेच्या, मराठी भाषिकांच्या व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित प्रयत्न करणे हा या परिषदेचा मूळ उद्देश आहे. अशा प्रयत्नांसाठी जगातील विविध क्षेत्रांतील मराठी भाषिकांचे प्रतिनिधी पहिल्यांदाच या परिषदेच्या रूपाने एकत्र येत आहेत. मातृभाषा हे व्यक्तीच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम मानून आम्ही या ठिकाणी विचारविनिमय करणार आहोत.

कुसुमाग्रजांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या सद्य:स्थितीविषयीची आपली मते मांडली. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, की ” कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचं दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे.”

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, डॉ. रवी बापट, बी. के. देसाई, माधव गडकरी अशा काही विचारवंत स्नेह्यांनी जागतिक मराठी परिषद भरवण्याची अनोखी कल्पना सुचली . तोपर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी होत असेच, पण ते केवळ साहित्य जगताला वाहिलेले होते.

जागतिक मराठी परिषदेची संकल्पना त्याहून वेगळी होती. जगभरातल्या मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करायचे होते. त्यांत साहित्यिकांसोबत, कलाकार, चित्रकार, शिल्पकार, गायक, वादक, नर्तक, संगीतकार, नाट्य-चित्रपटकलावंत, व्यापारी-उद्योजक, कारखानदार, धडाडीचे नेते आणि कार्यकर्ते, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतले पुढारी आणि सर्वसामान्य रसिकजन या सर्वांना एकत्र आणून त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी हे व्यासपीठ मदत करणार होते. भव्य कल्पना मुख्यमंत्री शरद पवारांनी उचलून धरली. त्यांना मनोहर जोशी यांची साथ मिळाली आणि केवळ तीन महिन्यांच्या अविश्रांत मेहनतीनंतर ती कल्पना प्रत्यक्षातही उतरली.

संदर्भ: मैत्री अंकात १२ ऑगस्ट २०१४ रोजी  प्रसिद्ध झालेला या विषयाचा मृदुला जोशी आणि अनुपमा जोशी यांचा लेख

Previous Article

लवकरच!

Next Article

पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डावरून कट: प्रसून जोशी फिल्म सेन्सॉर बोर्डाचे नवीन अध्यक्ष

You may also like